' ‘फिल्मसाठी काहीपण’ : या अभिनेत्रीने केलं चक्क स्वतःच्या डिलिव्हरीचं खरंखुरं शूटिंग! – InMarathi

‘फिल्मसाठी काहीपण’ : या अभिनेत्रीने केलं चक्क स्वतःच्या डिलिव्हरीचं खरंखुरं शूटिंग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीचं लग्न झालं की तिचं करियर संपतं असं म्हणलं जात असे. नव्वदीच्च्या दशकातल्या अभिनेत्रींच्या पिढीनं मात्र हा समज खोटा ठरवत लग्नानंतरही चित्रपटांतीन भूमिका साकारल्या.

काहिंनी गर्भावस्थेतही चित्रपटात काम केलं मात्र एक अभिनेत्री अशी आहे जिनं चक्क प्रसव काळातही शुटिंग करून खळबळ माजवली होती.

चित्रपटातील प्रसंग खरेखुरे वाटावेत यासाठी दिग्दर्शक काहीही प्रयत्न करायला तयार असतात. जगप्रसिध्द दिग्दर्शक नोलान यासाठी शेत खरेदी करून तिथे मक्याची शेतीच करतो तर अमिरखान धोबी घाटावर जाऊन कॅमेरे लावतो.

 

christopher nolan corn farming inmarathi

 

कलाकारही भूमिका जिवंत वाटावी अशी साकार करण्यासाठी काहिही करायला तयार असतात. गजनीसाठी अमिरनं कष्टानं सिक्सपॅक कमावले तर दंगलसाठी कुस्तिवीराइतकं वजन वाढविलं.

अतुल कुलकर्णीनं नटरंगसाठी शरीर कामवलंही आणि नाच्याच्या भूमिकेत शोभण्यासाठी ते प्रचंड उतरवलंही. विद्या बालननं डर्टी पिक्चरमधे सिल्कच्या भूमिकेत शिरण्यासाठी आणि शोभण्यासाठी प्रचंड वजन वाढविलं. याच यादीतलं एक नाव आहे, दक्षिणेकडील अभिनेत्री, श्वेता मेनन.

काही वर्षांपूर्वी श्वेता मेन या मल्याळम अभिनेत्रीनं खळबळ उडवून दिली होती आणि कारण होतं तिचे प्रसुतीकाळातील फोटो. अनेकांनी याला नाकं मुरडत हा विचित्र प्रकार असल्याची टिका केली. प्रसुतीकाळातही प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट अशा शेलक्या शेर्‍यांनी तिच्यावर प्रचंड टिका करण्यात आली होती.

shweta menon inmarathi

 

नंतर मात्र या शुटींगमागचं खरं कारण जगासमोर आलं. वास्तवात एका चित्रपटाच्या शुटींगचा भाग म्हणून तिच्या प्रसववेदना आणि प्रसुतिचं शुटिंग करण्यात आलं होतं.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या कालीमन्नू या चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून हे चित्रीकरण करण्यात आलं होतं. महिला केंद्रित या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ब्लेसी.

प्रसुतीचा प्रसंग जिवंत वाटावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असला तरिही या घटनेची जशी चर्चा झाली तसा तो पैशांसाठी किंवा प्रसिध्दीसाठी केलेला प्रकार अजिबात नव्हता.

श्वेता पाच महिन्यांची गर्भवती असल्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात करण्यात आली होती. तिन तासांच्या या चित्रपटात प्रसुतिचा प्रसंग ४५ मिनिटांचा आहे. यासाठी जिथे श्वेताची प्रसुती होणार होती त्या खोलीत तिन कॅमेरे सज्ज करण्यात आले होते.

डॉक्टर्स, नर्स यांच्याव्यतिरिक्त प्रोडक्शन टिमचे तीन सदस्यही याठिकाणी उपस्थित होते. श्वेताच्या या निर्णयात तिच्या पतिचाही अर्थातच होकार होता. चित्रपटात या प्रसंगाचं वास्तव चित्रीकरण करता यावं यासाठी चित्रिकरणाचं शेड्युल सहा महिने लांबविण्यात आलं होतं.

 

shweta menon delivery inmarathi

 

हा चित्रपट अशा तरुणीच्या आयुष्याभोवती गुंफला गेला होता जिचा पती ब्रेन डेड म्हणून घोषित केलेला असतो आणि तिला त्याच्याकडून गर्भधारणा करुन हवी असते. कथानकाची मागणी असल्यानं नायिका यात गर्भवती दिसणं आणि तिची प्रसुती होणं आवश्यक होतं.

श्वेता या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान गर्भवती असल्यानं तिला खोट्या पोटाचा कधीच आसरा घ्यावा लागला नाही तसेच गरोदरपणात स्त्रीचा चेहरा बदलतो, त्यावरची नैसर्गिक तकाकीही या चित्रपटात आपल्याला दिसते.

या चित्रपटात तिचं जे पोट दिसतं ते वास्तवातही ती वागवत होती. म्हणूनच तिच्या प्रसुतीचं वास्तव चित्रीकरण करण्याचा धाडसी निर्णयही घेण्यात आला.

 

shweta menon live delivery inmarathi

 

मात्र ही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष जी कार्तिकेयन यांनी महिला संघटनांनाच आव्हान केलं होतं.

जाहिरातींमधून स्त्रियाचं असभ्य चित्रीकरण होतं त्यावर टिका करणार्‍या संघटना, प्रसुतीसारख्या खाजगी क्षणांचं असं बाजारू चित्रीकरण करून चित्रपटात ते फुटेज वापरण्याबात का गप्प आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला होता.

मात्र या सगळ्या विरोधाचा सामना श्वेतानं धीरानं आणि कणखरपणे करत सर्जनशिल विचारांवर नैतिक सेन्सॉरशिप नको असं ठणकावून सांगितलं होतं.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?