' खेळाडूंचं तर सोडाच, हे ८ अंपायर सुद्धा कमवतात एकेका वर्षात चिक्कार पैसे… – InMarathi

खेळाडूंचं तर सोडाच, हे ८ अंपायर सुद्धा कमवतात एकेका वर्षात चिक्कार पैसे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

विराट कोहली किंवा हार्दिक पंड्या यांच्या जीवनशैलीकडे बघून स्वत:ची जीवनशैली त्यांच्यासारखी असावी असं जर तरूण खेळाडूंच्या मनात आलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. क्रिकेट खेळात खेळाडूंची निव्वळ किंमत आणि त्यांचे वेतन याबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो.

करार झालेल्या आणि फ्रँचायझीसोबत असणाऱ्या खेळाडूंवर सगळ्यांच्याच नजरा असताना, आम्ही नेहमीच मैदानावरील सतत उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीला विसरतो. बरोबर, तो म्हणजे अंपायर! तेदेखील खेळाडूंबरोबर संपूर्ण दिवस मैदानावर घाम गाळतात आणि कधीकधी अंतर्गत कलह शांतपणे हाताळतात.

 

mahi with umpire inmarathi

 

कोणी या खेळाचा अंपायर होण्याचा विचार करतोय का? नीट लक्षात घेता असे लक्षात येते की मैदानावरील निर्णय घेणारे ही अंपायर मंडळी मॅच फी आणि वार्षिक फीच्या रूपात चांगले पैसे कमवतात. हे आकडे बघितल्यावर आत्ताची नोकरी सोडून क्रिकेटचे पंच होण्याचा मोह तुम्हाला नक्कीच पडेल.

आता प्रश्न असा पडतो की जरी तंत्रज्ञान त्यांना सहजपणे बाजूला करू शकत असेल, तरी प्रचंड टीका आणि अनेक चुका असूनही ते अजूनही खेळाचा एक आवश्यक भाग कसे आहेत! आणि त्याहूनही अधिक मनोरंजक म्हणजे त्यांनी क्रिकेट सामन्यांमधून केलेली एकूण कमाई!

आयसीसी पंचांना कसोटी सामन्यासाठी यूएस $ ३०००, एकदिवसीय सामन्यांसाठी $ २००० आणि टी-२० साठी $ १००० इतके मानधन मिळते. ही संख्यादेखील बदलती असते. पण याचा अर्थ असा नाही की एखादा पंच त्याला योग्य वाटतील तितके सामने स्वीकारू शकतो आणि त्याची कमाई वाढवू शकतो.

 

steve bucknor inmarathi

 

साधारणतः एक आयसीसी पंच एका वर्षामध्ये ८ ते १० कसोटी सामने आणि १० ते १५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने स्वीकारू शकतो.

याबाबतीत टी-२० चा आकडा मात्र अजूनही अनिश्चित आहे. या सर्व सामन्यांमधून पंच मंडळी ३२ लाखाच्या घरात त्यांचे वार्षिक उत्पन्न नेतात ज्यामध्ये त्यांचे वार्षिक शुल्क गृहित धरलेले नाही.

साधारणपणे सगळ्याच पंचांना खालीलप्रमाणे मानधन देण्यात येतं.

• कसोटी सामना पंच पगार (प्रत्येकी सामना) – रु. २ लाख

• एकदिवसीय सामना पंच पगार (प्रत्येकी सामना) – रु. १.५ लाख

• टीट्वेन्टी शुल्क (प्रत्येकी सामना) – रु. सत्तर हजार

प्रत्येक अंपायर एका वर्षात किती सामन्यात काम करू शकतो, याविषयी मात्र नियम असतात. त्यामुळेच प्रत्येक पंचांचं वार्षिक मानधन मात्र वेगवेगळं आहे.

आता एक नजर जागतिक क्रमवारीत उत्पन्नामध्ये सर्वांत जास्त कमावते क्रिकेट पंच कोण त्यावर टाकूया.

१. रिचर्ड केटलब्रो

यॉर्कशायरमधील केटलब्रो यांनी २००९ साली आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कारकिर्दीस सुरूवात केली ती आजतागायत सुरु आहे. आत्तापर्यंत ५८ कसोटी ८३ एकदिवसीय आणि २२ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये यांची नेमणूक झाली आहे.

गेल्या दशकातील उत्तम पंचांपैकी हे एक असून त्यांनी वर्ल्डकप २०१५ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चे अंतिम सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केले आहे. २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीसी अंपायर हा पुरस्कार प्राप्त केला आहे.

 

richard kettleborough inmarathi

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून एकूण मानधन रु. २५ लाख प्रतिवर्षी

२. इयान गोल्ड

हे पंचाच्या यादीतील एक अनुभवी नाव असून २००६ सालापासून त्यांनी शंभराहून अधिक एकदिवसीय सामन्यामध्ये अंपायर म्हणून काम पाहिले आहे. २००७, २०११, २०१५ आणि २०१९ या चारही वर्ल्ड कपमध्ये त्यांचा सहभाग होता.

१४० एकदिवसीय सामने, ७४ कसोटी सामने आणि ३७ टीट्वेन्टीज यांच्या नावावर आहेत. २०१९ च्या आयपीएल अंतिम सामन्यामध्येही त्यांचा अंपायर म्हणून सहभाग होता.

 

ian gould inmarathi

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून एकूण मानधन रु. २५ लाख प्रतिवर्षी

३. रिचर्ड इलिंगवर्थ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्तम अंपायर म्हणून त्यांनी नाव राखले आहे. इलिंगवर्थ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात २०१० मध्ये केली. स्वतःच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर २०१३ च्या आयसीसी एलिट पॅनल ऑफ अंपायरमध्ये स्थान पटकावले.

 

richard illingworth inmarathi

 

या माणसाने ४२ सकोटी, ६० एकदिवसीय आणि १६ टीट्वेन्टीजमध्ये पंच म्हणून काम बघितले आहे. २०१४ आणि २०१५ च्या आयपीएलमध्येही वीस सामन्यांमध्ये ते पंच होते.

• आयपीएल पंच शुल्क (२०१४ आणि २०१५) – दोन मालिका प्रत्येकी रु. १,७५,०००/- म्हणजे रू पस्तीस लाख

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून मिळणारं मानधन रु. २५ लाख प्रतिवर्षी

४. पॉल रायफल

क्रिकेट पंच होण्याआधी, व्हिक्टोरिआ येथे जन्मलेले पॉल यांची अष्टपैलू खेळाडू कारकिर्द उत्तम होती. ट्रान्स टास्मन डर्बीद्वारे रायफल यांनी २००९मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून आपले पहिले पाऊल टाकले.

आत्तापर्यंत ४३ कसोटी, ६५ एकदिवसीय आणि १६ टीट्वेन्टीज सामन्यांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या एका सामन्यावेळी भुवनेश्वरकुमारचा एक चेंडू यांच्या डोक्याला लागला होता. आयपीएल २०११ मध्ये अकरा सामन्यांमध्ये हे पंच होते.

 

paul reiffel inmarathi

 

क्रिकेटमधील एकूण मानधन रु. ३१,२१,००० प्रतिवर्षी

५. रॉड टकर

२००८ मध्ये पदार्पण केल्यापासून रॉड टकर क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह पंचांपैकी एक आहेत. पदार्पणानंतर अवघ्या दोन वर्षांत ऑस्ट्रेलियनला आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये बढती मिळाली. ते ५४ वर्षीय असून, आतापर्यंत ६७ कसोटी, ८० एकदिवसीय आणि ३५ टी – २० सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावली आहे.

त्यांनी २०११ च्या मोसमापासून ४६ आयपीएल सामन्यांचीही जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे टकरने अंपायरिंगमध्ये चांगले पैसे कमावले यात आश्चर्य वाटू नये.

 

rod tucker inmarathi

 

क्रिकेटमधील एकूण मानधन रु. २५ लाख प्रतिवर्षी

६. नायजेल लॉन्ज

क्रिकेट चाहत्यांसाठी अजून एक परिचित नाव, नायजेल लॉन्ज यांनी २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पदार्पण केले. तेव्हापासून ते २००७, २०१५ मध्ये खेळल्या गेलेल्या टी २० विश्वचषकाचा आणि २०१९ मधील क्रिकेट वर्ल्ड कपच्या उद्घाटनाचा एक भाग आहेत.

आतापर्यंत ५६ कसोटी, १२४ एकदिवसीय आणि ३२ टी -२० सामन्यात लॉन्ज यांचा सहभाग आहे. लॉन्ज २०१३ पासून आयपीएलच्या ३७ सामन्यांचाही भाग आहेत.

 

nigel llong inmarathi

 

• आयपीएल पंच शुल्क – रु. १,७५,०००/- गुणिले ३७ सामने = ६४,७५,०००

क्रिकेटमधील एकूण मानधन रु. ३१,२१,००० प्रतिवर्षी

७. अलिम दार

अगदी क्वचित क्रिकेट हा खेळ बघणाऱ्यांनाही हे नाव बहुतेक माहित आहे – अलीम दार, आतापर्यंतच्या सर्वांत यशस्वी क्रिकेट पंचांपैकी एक.

या पाकिस्तानी पंचांनी २००० मध्ये आंतरराष्ट्रीय अंपायरिंग पदार्पण केले आणि ते त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीच्या २१ व्या वर्षात आहेत. त्यांच्या काळात सर्वोच्च स्तरावर, दारने ५ विश्वचषकांमध्ये कामगिरी बजावली आहे. २००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासह, त्यांनी २००९, २०१० आणि २०११मध्ये सलग तीन वेळा आयसीसीचे अंपायर ऑफ द इयर जिंकले आहे.

 

aleem dar inmarathi

 

५१ वर्षीय दार यांनी आतापर्यंत १२५ कसोटी, २०० एकदिवसीय आणि ४३ टी – २० सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. अलीम दार यांनी २००८ ते २०१४ या कालावधीत आयपीएलमध्ये ३८ सामन्यांची कामगिरी बजावली आहे.

इतरांप्रमाणेच मानधन घेत असूनही, सर्वाधिक सामन्यात अंपायर म्हणून काम करत असल्याने, त्यांची कमाई सुद्धा बक्कळ आहे. ही कमाई सर्वाधिक असल्याचं म्हटलं जातं.

• आयपीएल पंच मानधन – रु. १,७५,०००/-गुणिले ३८ सामने = ६६,५०,०००

८. कुमार धर्मसेना

क्रिकेट अंपायरिंगमधील सर्वांत प्रसिद्ध नावांपैकी एक, कुमार धर्मसेनाने प्रत्यक्षात श्रीलंकेसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून सुरुवात केली. ते १९९६च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते आणि २००४ मध्ये खेळातून निवृत्त झाल्यानंतर अंपायरिंगकडे झेप घेतली.

धर्मसेना यांनी २००९ मध्ये अंपायरिंग पदार्पण केले आणि त्यांनी आतापर्यंत ६० कसोटी, ९७ एकदिवसीय आणि २२ टी – २० सामन्यात पंच म्हणून  भूमिका बजावली आहे. २००९ पासून खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यांच्या यादीत ते ९४ सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे.

 

kumar dharmsena inmarathi

 

या श्रीलंकन पंचाने २०१२ आणि २०१८ मध्ये दोन वेळा आयसीसी अंपायर ऑफ द इयर देखील जिंकले आहे.

आयपीएल पंच म्हणून मिळालेलं मानधन रु. १,७५,०००/- गुणिले ९४ = १,६४,५०,०००

हे आठ अंपायर वर्षभरात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत समाविष्ट आहेत. आलीम दार आणि कुमार धर्मसेना हे सर्वाधिक वार्षिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?