' नोकरदार वर्गाचा भविष्यातला सोबती “प्रॉव्हिडंट फंडचा” बॅलन्स एका क्लिक वर समजू शकतो! – InMarathi

नोकरदार वर्गाचा भविष्यातला सोबती “प्रॉव्हिडंट फंडचा” बॅलन्स एका क्लिक वर समजू शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुमच्या घरातली एखादी वडीलधारी व्यक्ती नोकरीवरून निवृत्त होताना त्यांना मिळणारी ग्रॅज्यूइटी, प्रॉव्हीडंट फंड अशी नावं तुम्ही त्यांच्या तोंडून किंवा घरच्यांच्या तोंडून ऐकली असतील!

तर ही जी रक्कम त्या व्यक्तीला मिळते, किंवा तो पीएफ फंड असतो तो नेमका काय असतो? आणि निवृत्त होणाऱ्याच व्यक्तीला तो मिळतो का नोकरीवर असताना सुद्धा तो मिळतो?

असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात!

तर पीएफ म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत काम करता मग ती खासगी असो वा सरकारी, ती कंपनी तुमचे एक वेगळे अकाऊंट काढते त्याचं नाव असतं पीएफ अकाऊंट!

आणि ह्या अकाऊंट मध्ये दरमहा तुमच्या पगारातून अमुक एक रक्कम त्या अकाऊंट मध्ये भरली जाते, आणि तितकीच रक्कम कंपनी स्वतःच्या खिशातून सुद्धा त्यात भरते!

 

epf inmarathi
indianmoney.com

 

आणि जेंव्हा तुम्ही ती कंपनी सोडता किंवा सेवानिवृत्त होता, तेंव्हा त्या पीएफ फंडातली रक्कम तुमच्या हातात पडते!

ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ती निवृत्त होतानाच काढू शकता, ती रक्कम तुम्हाला गरज असेल तेंव्हा मिळू शकते!

पण शक्यतो कंपनी किंवा नोकरी करणारी व्यक्ति त्या फंडाकडे भविष्यातल्या तरतुदींसाठी बघते! त्यामुळे उगाचच त्यातले पैसे काढणे हे निरर्थक ठरते!

सध्याच्या काळात एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाताना ते पूर्ण पीएफ अकाऊंट ट्रान्सफर होते जेणेकरून ती रक्कम तशीच सुरक्षित राहावी!

 

epfo inmarathi
businesstoday.in

 

सर्वांना हे ठावूक असते की, EPF (प्रॉव्हिडंट फंड) ऑनलाईन चेक करता येतो, पण बऱ्याच जणांना हे माहित नसते की तो ऑनलाईन कसा चेक करावा, खास त्यांच्यासाठी हा लेख!

EPF तुम्ही केवळ ऑनलाईनही बघू शकता असं नाही तर, तुम्ही पीएफ पासबुक पीडीएफमध्ये डाऊनलोडही करु शकता, EPFO (Employees’ Provident Fund Organization) ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

epfo inmarathi
thestatesman.com

 

आतापर्यंत वर्षातून एकदाच पीएफ स्लिप कंपनीतर्फे दिली जायची, तेव्हाच पीएफच्या खात्यात किती रक्कम जमा झालीय आणि त्यावर किती व्याज मिळालं ते कळायचं.

त्यानंतर मोबईलवर SMS मिळणं सुरु झालं, पण त्यात फक्त रकमेचा एक आकडा कळायचा. इतर डिटेल्स कळायचे नाहीत.

आता मात्र ईपीएफ अकाऊंटचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर मिळतात.

दर महिन्याला किती पीएफ जमा झाला? त्यात तुमचा वाटा किती?

तुमच्या कंपनीचा वाटा किती? तसंच ग्रॅच्युइटी किती जमा झाली हे सगळं रियल टाईममधे या पासबुकात पाहू शकता, डाऊनलोड करु शकता आणि फुरसतीत पाहण्यासाठी प्रिंट सुद्धा करु शकता.

सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी ना आणखी एक User ID लक्षात ठेवायची कटकट, ना आणखी एक password आठवत बसायची झंझट!

तुमचा पॅन नंबरही पुरेसा आहे आणि तुमचा पासवर्ड असेल तुमचा मोबाईल. तेवढा मोबाईल आणि तुमचा पीएफ नंबर जवळ असायला हवाच.

 

epf-marathipizza02
economictimes.indiatimes.com

 

१. आपला पीएफ पाहण्यासाठी पहिल्यांदा ईपीएफच्या वेब पोर्टलवर जा

२. तेथे उजव्या बाजूला खाली Activate UAN हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर रजिस्टर फॉर्म ओपन होईल. या फॉर्मवर तुम्हाला स्वत:ला रजिस्टर करावं लागेल.

तिथे दिलेली माहिती म्हणजे UAN नंबर, मेंबर आयडी, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पॅन आणि आधार कार्ड, पासपोर्ट नंबर या गोष्टींची माहिती भरा.

३. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पिन नंबर येईल, तो तिथं दिलेल्या रकान्यात भरा म्हणजे तुम्ही तुमच्या होमपेजला जाऊन पोचाल.

४. तिथे वर काही ऑपशन्स दिसतील, त्यात DOWNLOAD PASSBOOK सुद्धा आहे त्याला क्लिक करा.

५. राज्यात महाराष्ट्र क्लिक करा.

६. त्यानंतर आपल्या पीएफ ऑफिसचा कोड म्हणजे तुम्ही कुर्ला विभागात असाल तर MH- KURLA वर क्लिक करा.

 

epf-marathipizza03
pmjandhanyojana.co.in

 

७. मग तुमचा पीएफ नंबर रकान्यात भरा. तुमचा पीएफ नंबर MH/४८६२०/XXXX असेल तर त्यातील ४८६२० पहिल्या रकान्यात भरा, त्यानंतरचा रकाना ब्लँक सोडा आणि पीएफचे शेवटचे चार अंक शेवटच्या रकान्यात भरा.

८. त्या खाली दिलेला कोड सोबतच्या रकान्यात भरा

९. आणि  GET PIN वर क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या मोबाईलवर चार आकडी पिन नंबर येईल.

१०. साईटवरच्या रकान्यात तो पिन टाकला की तुमच्या पीएफ फाईलचं पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा आणि पाहा किती EPF जमा झालाय ते.

 

epf-marathipizza04
relakhs.com

 

दुसऱ्यांदा कधी पीएफ पाहायचा असेल तर पॅन कार्ड किंवा तुम्ही रजिस्टर केलेल्या ओळखपत्राचा नंबर आणि फोन नंबर टाकून थेट साईनइन करु शकता.

आणि हो आता नवीन येऊ घातलेल्या स्मार्टफोन मुळे तर अगदी बोटाच्या एका क्लिकवर तुम्ही तुमच्या या फंडाची माहिती कुठेही बसल्या मिळवू शकता!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?