' एका मराठी माणसाचे बोट धरून नरेंद्र मोदी राजकारणात आले...

एका मराठी माणसाचे बोट धरून नरेंद्र मोदी राजकारणात आले…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी हे नाव आज जगभरात वादळासारखं गाजत आहे. जगभरातून मोदींना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगातल्या शक्तिशाली पंतप्रधानांमध्ये मोदींची गणना होते.

या वादळाचा राजकारणातला प्रवास सगळ्यांना माहितच आहे मात्र मोदींना सक्रिय राजकारणात आणणार्‍या व्यक्तिचं नाव खूप कमीजणां माहित आहे. हे मराठ मोळं नाव आहे लक्ष्मणराव इनामदार.

 

modi inmarathi

 

तुम्ही त्यांचा द्वेष करा की त्यांच्यावर प्रेम करा तुम्ही त्यांचा उल्लेख टाळूच शकत नाही. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या उल्लेखाशिवाय भारतीय जनतेचा, त्यांच्या चाहत्यांचा आणि विरोधकांचा दिवस गेल्या पाच सहा वर्षांत ना उगवतो ना मावळतो.

असं हे व्यक्तिमव आज भारतीय राजकारणाचा अविभाज्य भाग बनलं असल तरीही या नावाचा राजकारणतला प्रवास सुरू होण्यासाठी एक मराठमोळं व्यक्तिमत्व कारणीभूत ठरलं. या व्यक्तिचं नाव आहे, लक्ष्मणराव इनामदार.

 

laxman 1 inmarathi

 

संघ परिघात वकील साहेब म्हणून परिचित असणारे लक्ष्मणराव गुजरातमधील संघस्थापकांपैकी एक होते. वकिलसाहेबांचं संघ स्वयंसेवक नरेंद्रचं पंतप्रधान मोदींना घडविण्यात योगदान खूप मोठं आहे. केवळ राजकीय जीवनातच नाही तर वकीलसाहेबांनी मोदींच्या खाजगी आयुष्यातही मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.

मोदी गुजरातमधील मेहसणा जिल्ह्यातील वडनगरमधे राहत असताना प्रथम वकील साहेबांशी त्यांचा परिचय झाला. वकिलसाहेब मुळचे  महाराष्ट्रातले, त्यांनी शिक्षणानंतर स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, संघ परिवारात सामील झाले. त्यानंतर संघ विस्ताराच्या प्रसाराच्या कामासाठी ते गुजरातला रवाना झाले होते. संघाच्या पुनरूज्जीवनाचं काम ते बघत होते.

तरूण नरेंद्रचे त्यांच्या वडिलांशी संबंध फ़ारसे सलोख्याचे नसल्यानं त्यांना लक्ष्मणरावांत आपले वडिल दिसले. तारूण्यात ज्या आधाराची , मार्गदर्शनाची गरज असते ते लक्ष्मणरावांनकडून मिळत गेल्यानं नरेंद्र त्यांच्या भावनिकदृष्ट्या निकट गेले. खाजगी आयुष्य आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर नरेंद्र लक्ष्मणरावांचं मत घेत वाटचाल करू लागले.

 

rss inmarathi
boomlive.in

 

संघासाठी काम करत असताना आपल्या या मुलासमान शिष्यालाही लक्ष्मणराव घडवत होते. या मुलांतली चमक आणि त्याचं भविष्य त्यांना स्पष्टपणे दिसत होतं. संघाचं भविष्य असणार्‍या चेहर्‍यांपैकी एक चेहरा नरेंद्रचा होता हे लक्ष्मणरावांच्या पारखी डोळ्यांनी हेरलं होतं.

केवळ चमक असून भागणार नाही तर राजकारणात किंवा एकूणच सिस्टीममधे वरच्या पायर्‍यांवर जायचं तर तशा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हे लक्ष्मणरावांसारखा अनुभवी स्यवंसेवक जाणून होता. त्यातूनच त्यांनी जिथे जिथे शक्य होतील तिथे मोदींसाठी संधी उपलब्ध करून दिल्या.

 

modi 22 inmarathi

 

मोदी जेंव्हा एकट्यानंच तडफ़दारपणे काम करत होते तेंव्हा लक्ष्मणरावांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला, जर बदल घडवायचे असतील तर एकट्यानं वाटचाल करून चालणार नाही. ज्या सिस्टिमला बदलायचं आहे तिचा भाग बनता आलं पाहिजे.

१९७१ साली त्यांनी मोदींना बांगलादेश मुक्ती सत्याग्रहात सहभागी होण्याचा सल्ला दिला. स्वयंसेवक मोदींचं हे पहिलं राजकीय पाऊल होतं. या सत्याग्रहातील सहभागामुळे त्यांची रवानगी तिहार जेलमधे करण्यात आली.

 

modi 23 inmarathi

 

आणीबाणीच्या काळातही वकीलसाहेबांनी मोदींना मदत आणि मार्गदर्शन केले. दिल्लीच्या राष्ट्रकूल संकुल संसदीय परिषदेत पत्रकं वाटण्याचं काम असो किंवा जॉर्ज फ़र्नांडीस यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याचं काम असो (मोदींचि शिख आणि संन्यासी वेषातली छायाचित्रं याच काळातली आहेत) मोदींनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली.

आणीबाणीनंतर इनामदारांनी मोदींवर आणखीन एक महत्वाची जबाबदारी सोपविली, संघाच्या प्रतिकारांच्या दस्ताऐवजाच्या समन्वयाचं काम. यानंतर वडोदरा येथे मोदींची प्रभारी प्रचारक आणि त्यानंतर संभाग प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

laxman inmarathi

मोदी जसजसे राजकारणात आणि संघकार्यात व्यग्र होत गेले तसतसा त्यांचा आणि वकीलसाहेबांचा संपर्क कमी कमी होत गेला. मात्र मोदी कधीच आपल्या पितृतुल्य गुरूला विसरले नाहित. जमेल तसं ते वकिलसाहेबांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करत.

वेळ मिळाला की थेट लक्ष्मणरावांचं घर गाठत आणि त्यांच्यासोबत तास न तास घालवत असत. मात्र भावी काळातली जबाबदारीच इतकी मोठी होती की वकिलसाहेब मागे राहिले आणि मोदी पुढच्या राजकीय प्रवासासाठी पुढे निघून गेले.

१९८७ साली संघानं मोदींना भाजपमधे पाठवेपर्यंत वकिलसाहेबांनी इहलोकीचा प्रवास संपविला होता. त्यांचं मार्गदर्शन आणि इच्छेमुळेच मोदींनी सक्रिय सहभाग घ्यायला सुरवात केली आणि भाजपनं बघितलेलं देशभरात कमळ फुललेलं बघायचं स्वप्न मोदींच्या नेतृत्वानं पूर्ण केलं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?