' बाबा राम रहीम सारखे ९ वादग्रस्त गुरू!

बाबा राम रहीम सारखे ९ वादग्रस्त गुरू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक- सुनील राजपूत ((२०१७ मधील पुनःप्रकाशित लेख )

===

२००२ साली निवावी पत्राद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीमुळे राम रहिम बाबा यांच्या वर असलेले लैंगिक अत्याचार व बलात्काराचे गुन्हे उजेडात आले, सिद्ध झाले.

देशात असे बाबागिरी करत आपल्या पवित्र धर्माला गालबोट लावणारे कितीतरी ढोंगी आहेत, जे संत या पवित्र शब्दाचा आधार घेऊन भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करताहेत, सेवेच्या नावाखाली त्यांचं शोषण करत आहेत. आणि देशातील जनता धर्म जोपासण्याच्या मोहापायी या अश्या ढोंगी बाबांवर डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत…

राम रहीम बाबा प्रकरण काही नवीन नाही याआधीही अशी कितीतरी प्रकरणे समोर आली आहेत तरीदेखील या देशातील जनतेच्या डोळ्यावरील पट्टी दूर व्हायचं नाव नाही. कदाचित या लोकानांच ती पट्टी काढायची नाहीये. लोकांना लुबाडून त्यांचं शोषण करून स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या बाबांची आपल्या देशात काही कमी नाही.

यातीलच काही ढोंगी बाबांची यादी आपल्या समोर मांडतोय…

१. चंद्रा स्वामी

 

baba01-marathipizza
hindi.boldsky.com

तांत्रिक गुरु तसेच चमत्कारी बाबा, सिद्धी प्राप्त असल्याचा दावा अशी या बाबाचंद्रस्वामींची ओळख. हे तत्कालीन मंत्री नरसिंम्हा राव यांचे आध्यात्मिक सल्लागार होते. नरसिंम्हा राव पंतप्रधान होताच दिल्लीला कुतुब मिनार जवळ त्यांनी आश्रम बांधले.

यासाठी इंदिरा गांधी यांनी खुद्द जमीन दिली होती आणि बरं का यांचे केवळ भारतातीलच नाही तर दुबई व ब्रुनेई येथील शेख खलिफा, ब्रिटन पंतप्रधान मार्गारेट थॅचर, दाऊद इब्राहिम ई. असे अनेक अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भाविक होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बाबा चंद्रस्वामी यांच्या उत्पन्नात आर्थिक अनियमितता आढळून आल्याने त्यांना सर्वोच्च न्यायलयाने ९ कोटी रुपयांचा दंडही आकरला होता. तसेच लंडन स्थित व्यापाऱ्याला फसवणूक केल्याची नोंद या बाबाचंद्रास्वामीच्या नावावर आहे.

फेमा कायद्याचे वारंवार उल्लंघन, तसेच यांचा राजीव गांधी यांच्या हत्येसाठी पैसे पुरविल्याचाही उल्लेख जैन कमिशन रिपोर्टमध्ये आहे. असे हे आंतरराष्ट्रीय बाबाचंद्रस्वामी २३ मे २०१७ रोजी अपोलो रुग्णालयात बहु अवयय निकामी झाल्यामूळे मरण पावले.

 

२. जयेंद्र सरस्वती

baba jayendra sarswati-marathipizza
frontline.in

हे म्हणजे ६९ वे शंकराचार्य कांची कामकोटीपिठ. कांची मठाची यांच्या काळात भरभराट झाली. तामिळनाडूची सर्वात लोकप्रिय अश्या मुख्यमंत्री म्हणजेच स्वर्गीय जयललिता यांच्यावर देखील या जयेंद्र सरस्वती बाबांचा मोठा प्रभाव होता.

शाळा-कॉलेज, आश्रम, दवाखान्याद्वारे ते सामाजिक कामही करत असत. मात्र यांच्यावर देखील कांची मठाचे व्यवस्थापक संकररामन यांच्या खुनाचा आरोप होता.

३. निर्मल बाबा

Nirmal Baba -marathipizza
nirmalbabaphoto.com

भारतीय उपखंडात व विदेशात प्रवचन करणारे विख्यात बाबा अशी यांची ओळख आणि ‘क्रिपा होगी’ हा त्यांचा फेव्हरेट डायलॉग. मध्यंतरी निर्मल बाबा हे अतिशय लोकप्रिय झाले. एवढंच काय तर त्यांचे प्रवचन खास चॅनेलवरुन देश-विदेशात प्रसारित देखील होते. निर्मल दरबार हा कार्यक्रम ४० वेगवेगळया चॅनेलवरुन प्रसारित होतो.

भाविक खाजगी, आर्थिक अडचणीत असतील तर बाबा मार्गदर्शन करतात पण त्यासाठी ते खुप पैसे घेतात असेही भाविक सांगतात. काळा जादू, भूत-पिशाच यांपासून बाबा सुटका करतात असा दावा आहे. आता तो किती खरा हे निर्मल बाबालाच माहिती.

४. इच्छाधारी संत

Ichchadhari-Sant-marathipizza
rvcj.com

इच्छाधारी संत या नावाने प्रसिद्ध असलेल्या स्वामी भीमानंद उर्फ राजीव रंजन उर्फ शिव द्विवेदी हा नागीण डान्ससाठी नेहमीच चर्चेत राहायचा. पण या इच्छधारी संतांचा खरा चेहरा तेव्हा समोर आला जेव्हा २०१० मध्ये त्याला सेक्स रॅकेट चालविण्याबद्दल पोलिसांनी अटक केली.

हा ढोंगी बाबा त्याच्या बाबागिरीच्या आड मुलींना फसवून सेक्स रॅकेटचा धंदा चालवत होता. एवढंच नाही तर या बाबाजवळ २५०० कोटीची संपत्ती असून त्याच्या या व्यवसायात ६०० हायप्रोफाईल तरुणी होत्या. या बाबाचा भांडा तेव्हा फुटला जेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला रंगेहात पकडल. १९८८ ला दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलचा सेक्युरिटी गार्ड आणि त्यानंतर मसाज पार्लरमध्ये काम करायचा हा इच्छाधारी बाबा.

५. स्वामी सदाचारी

swami om ji -marathipizza
indianexpress.com

स्वामी सदाचारी ओम जी महाराज, भविष्यकार अशी ओळख असणारा हा महाराज काही साधा सुद्धा बाबा नाही तर वेल क्वालिफाईड बाबा होता. स्वामी सदाचारी हा उच्च विद्या विभुषित होता, त्याने एस्ट्रोलॉजिमध्ये  पी.एचडी केली त्यासोबतच त्याचा संस्कृतवर देखील प्रभाव होता.

दिग्गज राजकिय नेते मंडळीही या बाबाच्या मार्गदर्शासाठी त्यांचेकडे येत असत. बिग बॉस या शोच्या १० भागात हे बाबा सहभागी झाले होते आणि त्यानंतर तर सर्व जगाने त्यांच्या भगव्या कपड्यांमागच्या ढोंगीचे दर्शन केले.  हे बाबाही सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आले आहेत.

६. स्वामी प्रेमानंद

swami premanand-marathipizza
You-Tube

मुळ तमिळ-श्रिलंकन असलेले महाराज अनाथाश्रम व मठ चालवित. श्रीलंकेतील नागरीयुद्धा दरम्यान भारतात ते आले. त्यांनी तिरुचिरापल्ली येथे पहिल्यांदा आश्रम सुरु केले. तब्बल १५० एकर परिसरात त्यांनी महिलांसाठी आश्रम आणि अनाथाश्रम उभारले. स्विट्झरलँड,बेल्जियम , युके इ. ठिकणी यांनी त्यांच्या शाखा देखील उघडल्या होत्या.

पण हेच स्वामी १३ बलात्कार प्रकरणी दोषी सिद्ध झाले. तसेच यांच्यावर रवी नामक व्यक्तीची हत्या करण्याचाही आरोप होता. या प्रकरणी त्यांना जन्मठेप व ६७ लाख दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. अशा या बाबाचा २०११ साली मृत्यू झाला.

७. राधे मा

radhe maa-marathipizza
scoopwhoop.com

यांच्याबद्दल तर कुणाला सांगायची गरजच नाही. त्यांचं नावच पुरेसं आहे… ‘राधे मा’! सुखविंदर कौर उर्फ राधे मा ही चौथा वर्ग शिकलेली साध्वी. वयाच्या १७ व्या वर्षी लग्न व अर्थजनासाठी हातभार म्हणून कपडे शिवत असलेली ही आज जगभर प्रसिद्ध आहे.

राधे मा भक्तांना दिव्यदर्शन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर भक्तांना मिठी मारुन ती प्रसादही देते. तसेच अश्लिल हातवारे व बोलणे हेही तिच्या अष्टपैलू मधील एक गुण. काही महिन्यांपूर्वी एका महिलेला तिच्या सासरच्या संगनमताने जबरदस्तीने हुंडा मागण्यासाठी छळ केल्याचा आरोपही आहे या राधे मावर.

७.ओशो रजनीश

osho rajneesh-marathipizza
osho-acharyarajneesh.blogspot.in

सेक्स गुरु म्हणुन ओळख असलेले चंद्रमोहन म्हणजेच ओशो. हे ओशो रजनीश प्रस्थापित प्रथा परंपेवर टिका करत, लैंगिकतेचा खुले मनाने स्विकार करत, प्रचार करत. यामुळे ते प्रसारमाध्यमांच्या नेहमी चर्चेत राहिले.

८. असाराम बापु

asaram-marathipizza
firstpost.com

आसाराम बापू म्हणजे काही धर्मापेक्षा कमी नाही. त्यांचं प्रवचन आहे कळालं की त्या मैदानात पाय ठेवायलाही जागा नसायची एवढा अफाट जनसागर असायचा.

अध्यात्मिक गुरु तथा प्रवचनकार अशी ओळख असलेले आसाराम यांच्यावर २००८ मध्ये लहान मुलांच्या हत्तेचा संशय आहे, त्यांनी काळा जादू करून त्या मुलाची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच २०१३ साली १६ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

९. सत्य साईबाबा

swami satyasaai-marathipizza
atlantasaicenter.org

यांचे नाव घेतल्याशिवाय गुरु, बाबा, महाराज ही यादीच पूर्ण होत नाही. सचिन तेंडूलकर, मनमोहनसिंग, सोनिया गांधीपासून ते कित्येक बडेव्यक्ती त्यांचे भक्त असत. त्यांच्या आश्रमाकडून अनेक समाजउपयोगी कामेही केली जातात. तरी हे बाबादेखील टीकांपासून सुटू शकले नाही, त्यांच्यावरही लहान मुलांचे लैंगिक शोषण व अत्याचारचे आरोप होते. ब्रिटिश सरकारने याची दखल घेत बालकांना त्यांच्या आश्रमात जाऊ नये असा सल्ला देखील दिला होता.

विज्ञानाची कास धरायची सोडून आपला समाज हा अंधश्रद्धेच्या कवेत जात आहे. ढोंगी पाखंडी बाबा ह्या भोळ्या भाविकांना घाबरवून आपली दहशत बसवत आहे आणि आपण मुर्खासारखे त्यांच्या या भोंदूगिरीला बळी पडत आहोत. उच्च शिक्षित लोक यांच्यापुढे नतमस्तक होत आहे. आपण चमत्कार, करणी, नरबळी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. जेव्हा बाजारात जातो तेव्हा अगदी पाच रुपयांची कोथंबीरही पडताळून पाहतो, मग जो बाबा सांगेल ते डोळे झाकून का करतो? का त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवतो?

श्रद्धा असावी पण डोळस असावी. चूकिच्या व्यक्तिला पाठिंबा देणेही चुकीचं आहे. सर्व दिसूनही, कळूनही आपण या बाबांच्या भोंदूगिरीला का बळी पडतोय याचा जरा विचार करा.

कारण यामुळे कुणाचंही भलं नाही तर समाजाचे पतनच होणार आहे, बघा हे वाचून तरी तुमचे डोळे उघडतायेत का ते! नाहीतर यांचा धंदा तर असाच सुरु राहील आणि आपण असेच यांच्या आहारी जात राहू…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?