' "कंगनाला Y+ सुरक्षा आणि सोनूच्या ऑफिसवर धाड?", लोक असंही म्हणतायत की...

“कंगनाला Y+ सुरक्षा आणि सोनूच्या ऑफिसवर धाड?”, लोक असंही म्हणतायत की…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लॉकडाऊनच्या काळात ‘तो’ अनेकांच्या मदतीला धावून आला. आपापल्या गावापासून, आपापल्या राज्यांपासून दूर अडकलेल्या अनेक गोरगरिबांना घरी पोचवण्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आणि ती पारही पाडली.

कुणी त्याला देवपण बहाल केलं, कुणी त्याच्या माणुसकीची वाहवा केली, तर कुणी त्याच्या याच चांगुलपणाला ट्रोलिंगचा मुद्दा बनवलं. तरीही सोनू सूद थांबला नाही. तो त्याच्यापरीने मदतकार्य करतच राहिला. काल मात्र एक वेगळीच बातमी येऊन धडकली आणि सोनू पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला.

 

sonu sood inmarathi

 

त्याच्याकडे आजही मदतीसाठी लोकांची रीघ लागलेली पाहायला मिळते. अजूनही मदतकार्य करत असलेल्या सोनूला इनकम टॅक्सवाल्यांनी टार्गेट केलं आणि काल त्याच्या ऑफिसेसवर रेड पडल्याच्या बातम्या सुरु झाल्या.

सोनूकडे एवढा पैसा आला कुठून? असा प्रश्न विचारणारी मंडळी तेव्हासुद्धा होतीच… हीच शंका कदाचित त्यांच्याही मनात आली असावी, आणि त्यांनी सोनूच्या ऑफिसेसवर धाड टाकली.

नुकतीच सोनू सूदने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे, म्हणूनच सूड बुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी आवई विरोधकांनी उठवली आहे.

 

sonu sood and arvind kejriwal inmarathi

 

यात तथ्य किती याबद्दल ठोसपणे कुणीही काही सांगू शकणार नाही. पण सोशल मीडियावर मात्र याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. बघुयात नेटकरी नक्की काय म्हणतायत…

 

tweet 1

 

कंगनाचं वागणं लोकांना पटलेलं नाहीय, हे अजूनही दिसून येतंय. कंगना कशीही वागली तरीही तिला मात्र वाय प्लस सुरक्षा दिली जातेय आणि सोनू सूदला चांगली वागणूक मिळत नाहीये, हा राग लोकांनी व्यक्त केलाय.

आम्ही सोनू सूदच्या बरोबर आहोत असं म्हणणारा मोठा वर्ग पाहायला मिळतोय.

 

tweet 2

 

हा भाजपचा डाव असल्याचा थेट आरोप सुद्धा ट्विटरवर लोकांकडून होताना दिसतोय. तिथेही कंगना आणि सोनूची तुलना केलेली दिसतेय.

 

tweet 3

 

आयटी वाल्यांची रेड हा सोनू सूदचा सन्मान असल्याचं सुद्धा लोक इथे म्हणताना दिसतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना नाराज करणारी ही कृती असल्यामुळेच अशी कारवाई केली गेली आहे, असंही यात म्हटलेलं दिसतंय.

 

tweet 4

 

मोदीजींनी सांगितलं त्यानुसार थाळ्या न वाजवता गरजूंना मदत केली म्हणून सोनूवर इनकम टॅक्सवाल्यांनी कारवाईचा बडगा उगारला असंही म्हणणारी मंडळी आहेत.

 

tweet 5

 

हा उपरोधिक विचार सुद्धा थोडक्यात पण अगदी मुद्देसूद मांडलेला दिसतोय. थोडक्यात काय, तर यांनीही सरकारवरच निशाणा साधलेला दिसतोय.

 

tweet 6

 

या creativity ला सुद्धा दाद द्यायलाच हवी नाही का? एखादा चित्रपट बघून सोडून द्यायचा की मनात ठेऊन कुठेतरी चपखलपणे त्याचा वापर करायचा हे शिकण्यासारखं आहे नाही?

 

tweet 7

 

सोनू सूदला मसीहा म्हणणाऱ्यांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलंय बघा. अशा रेडची ही पहिली वेळ नाही, त्यामुळे तो याबाबतीत ‘सराईत गुन्हेगार’ असं कोर्टानेच सांगितलं असल्याचंही काहींचं म्हणणं आहे, असंही काहींचं म्हणणं असल्याचं स्पष्ट आहे.

थोडक्यात काय, तर सोनू सूदवर झालेली आयटीची रेड म्हणजे, भाजपचा डाव असल्याचं आणि सूड भावनेने सगळं केलं जात असल्याचं म्हणणाराच वर्ग मोठा दिसतोय.

या प्रकरणाविषयी तुमचं मत काय तेदेखील कमेंटमधून कळवायला  विसरू नका.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?