' या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही...!

या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारत लोकशाहीचा पुरस्कार करणारा देश असला तरीही इथला मूळ धर्म हिंदू आहे आणि या सनातन धर्माच्या नियमांचं पालन आजही केलं जातं. ज्याप्रमाणे जगभरातील प्रत्येक देशात एखाद्या धर्माचं पालन मुख्य धर्म म्हणून केलं जातं आणि त्यानुसार काही नियम काटेकोरपणे पाळले जातात तसेच ते भारतातही पाळले जातात.

बहुतांश हिंदू मंदिरं सर्वधर्मियांना दर्शनासाठी खुली असली तरीही काही ठिकाणी मात्र हिंदूव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि यासंबधीतल्या नियमांत फेरफार करण्याचा हक्क फक्त शंकराचार्यांनाच दिला गेला आहे.

भारतातील चारधाम ही पवित्र मानली गेलेली यात्रा स्थळं आहेत. प्रत्येक हिंदूच्या मनात एकदा तरी चारधाम यात्रा करण्याची इच्छा असते. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या चार धामांपैकी एक आहे ओरिसामधील पुरी येथील जगन्नाथाचं प्राचिन मंदिर.

 

jagannath puri inmarathi

 

केवळ हिंदूच नाही तर जगभरातून या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या मंदिराला केवळ धार्मिक महत्व नाही तर याचं स्थापत्य जगभरात कुतुहलाचा विषय आहे. या मंदिराच्या वास्तुकलेचं जगभरात कौतुक केलं जातं.

मात्र अशा या अत्यंत सुंदर आणि पवित्र मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करायचा तर तुम्ही हिंदू असणं अनिवार्य आहे. इतर अनेक नियमांबरोबरच या नियमाचंही काटेकोरपणे पालन केलं जातं आणि हे करत असताना समाजातल्या तुमच्या प्रतिमेचा, दर्जाचा विचार केला जात नाही.

तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा कितीही उच्चपदस्थ असा हिंदू नसाल तर या मंदिरात प्रवेश मिळणं अशक्य आहे. अशा सूचनेचा फलकही याठिकाणी लावण्यात आलेला आहे. याच नियमाला धरून अगदी भारताचे राष्ट्रपती कोविन्द यांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता. अर्थात ही काही पहिली घटना नाही.

भारतात ज्या कुटुंबाचं प्रस्थ आहे, जी अघोषित फर्स्ट फॅमिली आहे, स्वतंत्र भारताच्या नावाशी ज्या कुटुंबाच्या आडनावाची अतुट ओळख जोडली गेली आहे त्या कुटुंबालाही हिंदू नसल्याच्या कारणानं या मंदिरात प्रवेश नाकारलेला आहे. हे कुटुंब आहे, “गांधी कुटुंब”.

 

gandhi family inmarathi

 

गांधी आडनाव जरी हिंदू असलं तरी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींचं हे मूळचं आडनाव नाही. इंदिराजींनी पारशी धर्मातील फिरोज यांच्याशी लग्न केल्याने त्या पारशी बनल्या.

त्यांना १९८४ साली या मंदिरात प्रवेश नाकारला होता. गंमत म्हणजे ज्या पारशी धर्मात त्या लग्नानंतर गेल्या तो धर्मही आपल्या नियमांचं काटेकोर पालन करणारा म्हणून ओळखला जातो.

गांधी कुटुंबाला प्रवेशास मज्जाव केलेली मंदिरं –

केवळ जगन्नथाचं एकच मंदिर नाही जिथे गांधी घराण्यातील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. १९८४ साली स्व. राजीव गांधी पत्नी सोनिया यांच्यासह काठमांडूला पशुपतिनाथाच्या दर्शनास गेले असता त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यात आलं होतं.

 

sonia gandhi inmarathi

 

सोनिया ख्रिश्चन आणि इटालियन असण्याचं कारण देत हा प्रवेश नाकारण्यात आला होता. योगायोग म्हणजे नंतर लगेचच भारतानं नेपाळची आर्थिक नाकेबंदी केली. याचा मंदिर प्रेवेशाशी काही संबंध नसल्याचंही आवर्जून स्पष्ट करण्यात आलं होतं

यानंतर १९९८ साली सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला तेंव्हा त्या तिरुपतीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता त्यांना अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आलं. यामध्ये तुम्ही हिंदू आहात की नाही हे नोंदविणं गरजेचं असतं.

यात सोनियांनी,” मी माझ्या कुटुंबाच्या तत्वांचं पालन करते” असं नमूद केलेलं आहे. त्यावेळेस कॉंग्रेसचे सुब्बीरामी रेड्डी हे तिरूपती बोर्डाचे तत्कालिन प्रमुख असल्यानम त्यांनी सोनियांच्या प्रवेशाची सोय केली.

गांधीव्यतिरिक्त यांनाही नाकारला प्रवेश –

१९७७ साली जगप्रसिध्द इस्कॉन चळवळीचे संस्थापक भक्ती वेदांत स्वामी प्रभूपद यांनी पुरीला भेट दिली असता त्यांच्या भक्तांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. स्वित्झरलॅण्ड येथील एलिझाबेथ जिगलर यांना त्यांनी १.७८ कोटी रुपये दान करूनही हिंदू नसल्यानं प्रवेश नाकारला.

 

jagannath puri inmarathi 2

 

२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?