' बलुचिस्तानमध्ये आजही 'मराठा' ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!

बलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपण हे तर जाणतोच की पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हा काही मराठे हे त्याच पानिपतच्या भूमीवर स्थायिक झाले आज त्यांना हरयाणामधील रोड मराठा समाज म्हणून ओळखले जाते.

त्यांच्याबद्दल आपण एका लेखाद्वारे विशेष माहिती घेतली होती. ( तो लेख इथे क्लिक करून वाचू शकता – मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज! )

 

paannipat inmarathi

 

आज आपण अजून एका मराठी पूर्वजांबद्दल जाणून घेणार आहोत, जे देखील पानिपतच्या युद्धामधील पराभवानंतर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला परागंदा झाले. पण त्यांनी पानिपतच्या मातीमध्ये स्थिरस्थावर न होता थेट बलुचिस्तान गाठले आणि आज ३०० वर्षांनंतरही तेथे हा आपला मराठी बांधव अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहे.

हे बलुचिस्तान आहे आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये.

चला तर मग जाणून घेऊया या पाकिस्तानमधील मराठा समाजाबद्दल!!

 

balochista-maratha-marathipizza01

 

१७६१ साली रणकंदन माजले पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे आणि या वेळेस आमने सामने होते मराठे आणि अफगाण! मराठ्यांचे वर्चस्व मुघलांना सोसवत नव्हते, म्हणून त्यांच्या कायमचा बंदोबस्त करावा या उद्देशाने दिल्लीच्या सम्राटाने अफगाणी शासक अहमदशाह अब्दालीची मदत मागितली होती.

मराठ्यांनी देखील या संघर्षाचा कायमचा निकाल लावावा आणि मुघल सत्ता उलथवून संपूर्ण हिंदुस्तान काबीज करावा या उद्देशाने नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भूमीपासून अगणित अंतरावर असलेल्या उत्तर भारताच्या दिशेने कूच केले.

अफगाणांना वेळीच रोखावे म्हणून मराठे बलाढ्य अफगाण सेनेला थेट सामोरे गेले आणि पानिपत येथे मराठे व अफगाण यांची गाठ पडली.

 

panipat inmarathi

हे ही वाचा – मराठा आरमार उभारणारा, इंग्रजांकडून खंडणी वसूल करणारा मराठा शूर-वीर

पण जणू या वेळी नशिबाने साथ दिली नाही आणि मराठ्यांना त्याच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. पण हरता हरता मराठ्यांनी अफगाणी सेनेची जी काही हानी केली, त्याचा धसका घेऊन पुन्हा कधीही अब्दालीने भारतात पाय ठेवला नाही.

(हे देखील वाचा : मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!)

इतिहासकार सियार उल मुत्ताखिरीन हे म्हणतात की,

पानिपतच्या युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबचलांब रांगा केल्या गेल्या आणि त्यांना अफगाणी सैन्यासोबत दिल्ली, मथुरा या शहरांमध्ये पाठवण्यात आलं. युद्धानंतर जे मराठे वाचले, त्यातल्या पुरुष, महिला आणि मुलांना गुलाम बनवण्यात आलं.

 

balochista-maratha-marathipizza02

 

पानिपतच्या युद्धातल्या विजयानंतर अहमदशाह अब्दालीनं २ महिन्यांनंतर तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांना घेऊन अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केली. पण अब्दालीचा ताफा जेव्हा पंजाबमध्ये पोहोचला, तेव्हा शीख लढवय्यांनी युद्धकैदेत असलेल्या अनेक महिलांची सुटका केली.

भारताची सीमा पार केल्यावर आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांत संपल्यावर बलुचिस्तानातलं डेरा बुगती हे क्षेत्र सुरु होतं. याच ठिकाणी अहमदशाह अब्दाली युद्धकैद्यांसोबत पोहोचला.

 

ahmad shah abdali

 

पानिपतच्या युद्धामध्ये बलुची शासकाचे काही सैनिक अब्दालीच्या बाजूनं लढले होते. त्यामुळे अब्दालीला त्या मदतीचचा मोबदला द्यायचा होता.

अब्दालीनं सारे मराठी युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट स्वरुपात दिले. जे अखेरपर्यंत तिथेच राहिले. मराठा युद्धकैद्यांना बलुचिस्तानमध्येच सोडण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे,

मोठ्या प्रवासामुळे मराठा युद्धकैदी अशक्त झाले होते, त्यामुळे अशा युद्धकैद्यांचं काय करायचं? असा प्रश्न अब्दालीला पडला होता आणि म्हणूनच पिच्छा सोडवण्यासाठी अब्दालीनं युद्धकैद्यांना बलुचिस्तानातच सोडलं.

मीर नासीर खान नूरीने तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली. त्याने सैनिकांची वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागणी केली. त्यात बुगती, मर्री, गुरचानी, मझारी आणि रायसानी कबिल्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजमात कायम आहे.

 

Baloch_tribes

 

तेव्हापासून युद्धकैदी म्हणून येथे वावरलेल्या मराठी पूर्वजांनी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या प्रांतांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानच्या मातीला कवटाळीत नव्या जीवनाचा आरंभ केला. पण या मातीत आपल्या मराठी संस्कृतीची पाळेमुळे रुजवायला मात्र ते विसरले नाहीत.

या लढवय्या मराठ्यांचा सुरुवातीचा काळ कठीण होता. जिथं त्यांना सोडण्यात आलं, त्या भागात ना शेती होती, ना पाणी…! अखेर पाण्याची जागा शोधून मराठ्यांनी शेती करणं सुरु केलं आणि त्यानंतर कुठे खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरुवात झाली.

 

balochista-maratha-marathipizza03

 

मराठी युद्धकैद्यांचे वंशज आज मुस्लिम झाले आहेत, पण आजही त्यांच्या राहाणीमानामध्ये मराठी संस्कृतीची छाप दिसते. बलुचिस्तानमधल्या मराठी अंशाचे पुरावे त्यांच्या जातीतल्या उपनामावरूनही दिसून येतात.

इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू यांचं नाव बुगती मराठ्यांच्या उपजातीला देण्यात आलं, इतकंच नाही, तर पेशव्यांशी जवळीक साधणारं पेशवानी हे नावही बलुची मराठ्यांमध्ये प्रचलित आहे.

शाहू मराठ्यांनी भलेही इस्लामचा स्वीकार केला असला, तरी त्यांच्या लग्नांमध्ये मराठी संस्कृतीची झलक दिसून येते. आपल्याकडे जशी लग्नापूर्वी हळद लागते, हळदीनंतर स्नान होतं, माप ओलांडणे आणि गाठ बांधणे, या साऱ्या प्रथा बुगती मराठ्यांच्या लग्नांमध्ये होतात.

केवळ संस्कृती आणि चालीरीतीच नाही, तर बलुचींची भाषाही मराठी भाषेशी नातं सांगते. शाहू मराठा जमातीमध्ये मातेसाठी मराठमोळा आई हाच शब्द वापरला जातो. या शब्दाला मूळ बुगती समाजानंही स्वीकारलंय. इथल्या महिलांची कमोल, गोदी अशी मराठी नावंही आहेत.

सर्वाधिक मराठा वंशज हे बुगती जमातीमध्ये आहेत. १९६० च्या दशकात ब्रिटिश लेखिका सिल्विया मॅथेसन यांनी लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या पुस्तकात बुगती मराठा समाजाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.

 

baguti maratha samaz inMarathi

 

९० च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेली तिरंगा ही फिल्म बलुचिस्तानात खूप गाजली होती, या फिल्ममध्ये नाना पाटेकरनं पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यात –

मै मराठा हूँ…. और मराठा मरता नहीं….मराठा मारता है!

असा डायलॉग नाना पाटेकरांनी उच्चारताच थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडायचा.

एवढंच नाही, तर बलुचिस्तानमधला बुगती मराठा आजही द ग्रेट मराठा ही हिंदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून आपल्या नव्या पिढीला त्यांचा पूर्व इतिहास सांगतो.

असा हा आपला मराठी बांधव आजही हजारो किमी दूर राहून परमुलुखात मराठी संस्कृती रुजवून ताठ मानेने जगतो आहे. त्यांच्या या मराठी बाण्यास मानाचा मुजरा!

===

हे ही वाचा – भारतावर २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्भुत कथा

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

6 thoughts on “बलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!

 • December 2, 2018 at 7:03 pm
  Permalink

  अफगाणिस्तानातील मराठे हे मावळे होते। त्यामुळे ते फक्त मराठे नव्हते तर महाराष्ट्रातील मावळे होते। म्हणजे बारा बलुतेदार होते।

  Reply
 • December 16, 2018 at 4:05 pm
  Permalink

  Now these Bugti Marathas should take revenge and support India in fight against terrorism

  Reply
 • July 8, 2019 at 1:58 pm
  Permalink

  They can now apply for reservation in their country.

  Reply
 • August 31, 2019 at 6:52 pm
  Permalink

  पानिपत युद्ध समयी बाजार बुणगे पण होते त्यात आणि सर्व कुटुंबांचा काफिला पण पानिपत मध्येच होता..केवळ पेशव्यांच्या हट्टा पायी एवढी मोठी मान हानी पत्करावी लागली मराठ्यांना.पानिपत युद्धात एक लाख पेक्षा जास्त माणूस होता त्या मध्ये बाजार बुणगे आणि त्यांची हजारो कुटुंबे पण होती. बाजार बुणगे म्हणजे व्यापारी धंदा करणारे विशिष्ट लोक जे उत्तर भारतात व्यापार करता येईल या साठी गेले होते. ज्यावेळी युद्ध मराठे हरले त्यावेळी मराठा सैनिक आणि बाजार बुणगे दोन्ही पकडले गेले म्हणजे १.५० लाख पैकी ५० हजार लोकांची युद्धात जीव गमावला किंवा हत्या करण्यात आली . आणि बाकीचे लोक उत्तर भारतात दिल्ली, मथुरा, पानिपत, अवध, पंजाब , लखनौ या ठिकाणी युद्धबंदी म्हणून ठेवले गेले त्यातील बरेच उत्तर भारतातील मुस्लीम शासक लोककडे गुलाम झाले आणि उरलेले सगळे अफगाणिस्तान मध्ये अब्दाली घेऊन गेला त्या मध्ये पण बलुचिस्तान नवाब ज्याने पानिपत युद्धात अब्दाली ची मदत केली होती त्याचाकडे यातील बरेच हजार गुलाम ठेवले व शेवटी स्वतः काही हजार गुलाम घेऊन काबुल मध्ये गेला. प्रत्येक मुस्लीम आक्रमण कारी व्यक्तीने व लुटारूंनी त्यात मुहमद बिन कशिम, मुहम्मद घोरी, मुहमध्द गझनी, खिलजी, अहमद शहा अब्दाली, इराणचा नदिर शहा यांनी ज्यावेळी आक्रमण केले त्या त्या वेळी त्यांनी लुटले तर होतेच जे म्हणतात मुस्लीम नी लुटले नाही त्यांनी हे लुटारू ब्रिटिश होते का स्पष्ट करावे ब्रिटिश आणि मुस्लीम दोघांनी भारत लुटला होता.मुस्लीम आक्रमण कारी अगोदर सैन्य युधबंडी करत त्यांचा धर्म बदलत आणि मग शासक बनत असत ते सैनिक युधबंदी केले व जबरदस्ती धर्म बदलत असत त्यांचा हे मुस्लीम शासक ज्या वेळी युद्ध जिंकत त्यावेळी जो धर्म स्वीकारून मुस्लीम होईल त्याला जीवदान देत जो स्वीकारत नाही त्याला हत्या करून मारून टाकत असत . नेताजी पालकर, प्रतापराव गुजर यांची मुले त्याचे उदाहरण आहे..या शिवाय धर्म बदलावा म्हणून जाझिया कर आकारात असत, लोक मुद्दाम गरिबीत ठेवले जात असत जेणे करून हताश होऊन मुस्लीम होतील . पानिपत युद्धात ज्यांनी धर्म बदलला ते उत्तर भारतातच दिल्ली, उत्तर प्रदेश ,पंजाब मध्ये मुस्लीम बनून राहिले , ज्यांनी बदल ला नाही त्यांना अब्दाली अफगाणिस्तान मध्ये घेऊन गेला तर काही लोक युद्ध सुरू असताना आसपासच्या प्रदेशात तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाले पण तेच लोक परत महाराष्ट्रात आले असते तरी त्यांना तोंड दाखवायला ही जागा नव्हती त्यामुळे शेजारच्या हिमाचल, हरियाणा,पंजाब, उत्तर प्रदेश राज्यातील एकदम दुर्गम भागात गेले आणि तिथल्या
  एखाद्या समुदायाची ओळख सांगून ते तिथे राहिले आहेत आज पानिपत मध्ये रोड मराठा आहेत पण या शिवाय संपूर्ण उत्तर भारतात पण खूप मोठ्या प्रमाणावर मराठा लोक आहेत पण ते त्यांची ओळख विसरले आहेत. या शिवाय १६७४ ते १८५७ या कालावधीत मराठा आणि उत्तर भारतीय मुस्लिम शासक यांची हजारो युद्ध झाली आणि या काळात बरेच मराठा लोक उत्तर भारतात गेले आणि ज्या प्रदेशात गेले त्या प्रदेशातील ताकदवर जातीचे सदस्यता पत्करून राज्य करू लागले .उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब,हिमाचल प्रदेश या राज्यांत २ ते ३ कोटी मराठा वंशाचे लोक असतील आणि त्यातील ६०% लोक मराठा आहेत हेच माहित नसनारे किंवा थोडी फार जुना इतिहास माहीत आहे म्हणून ओळख टीकाऊन ठेवलेले किंवा आजूनही मराठा म्हणूनच राहत असलेले अश्या तीन प्रकारात वर्गीकरण होईल. उत्तर भारतात शिंदे,होळकर,पवार, गायकवाड ,नेवाळकर किंवा पेशवा यांची राज्य असताना महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर लोक ज्या भागात राज्य होते त्या त्या भागात २०० वर्ष प्रशासक म्हणून, गावचे वतनदार म्हणून,इनामदार म्हणून, व्यापारी म्हणून ,धंदा करणे साठी म्हणून गेले ज्या वेळी वतनदार यास एखादा प्रदेश वतन, राज्य, जहागीर म्हणून मिळत असत त्यावेळी शेकडो कुटुंबे त्या प्रदेशात बारा बलुतेदार म्हणून पण गेली.हीच गोष्ट दक्षिण भारतात तंजावर मध्ये मराठा राज्य २०० वर्ष टिकले शिवाय दक्षिण भारतातील आदिलशाही आणि निजामशाही मध्ये मातब्बर मराठा सरदार होते त्यांना कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळ नाडू या भागात बऱ्याच जहागीर मिळाल्या होत्या आणि जहागीर मिळाली की जहागीरदार सरदार बारा बलुतेदारी लोकांचे गट घेऊन तिथे वसाहती वास्वत असत शिवाय हे सरदार किंवा इनामदार बाहेरच्या राज्यातील शेती इनाम मिळाली म्हणून तेथूनच सैन्य म्हणून काम करत असत आणि तिथेच स्थायिक होत असतं .या शिवाय मराठा हे जात्याच सैनिक पेशाचे असल्याने केरळ, कर्नाटक,तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा इथले त्या प्रदेशातले राजे, सरदार , मुस्लीम शासक मराठ्यांना सैन्य म्हणून ठेवत असतं शिवाय गड किल्ले जर असतील तर मराठी कुटुंबे शेती इनाम म्हणून देऊन गड किल्ल्यांच्या सरक्षणा साठी ठेवली जात .या शिवाय मागच्या ५०० वर्षात दुष्काळ, महापूर, व्यापार, धंदा,मजुरी या साठी लाखो मराठी कुटुंबे दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी गेली या शिवाय नागपूर मध्ये भोसले राजघराणे असताना हजारो मराठी कुटुंबे लहान लहान वतनदार म्हणून छतीसगड,ओडिसा,बंगाल,बिहार,झारखंड मध्ये स्थाईक झाले काही ओळख विसरून गेले आहेत तर काही कडी तरी ओळख टिकुन आहेत. या शिवाय मागील ७० वर्षात ही महाराष्ट्रातून धंदा, उद्योग मजुरी या कारणासाठी बाहेर गेलेले खूप लोक आहेत. गरज आहे ती प्रत्येक प्रदेशात जाऊन परंपरा , सन ,उत्सव, मराठी भाषेतील शब्द , संस्कृती या गोष्टी मराठी लोकांशी किती जुळतात हे पाहून ओळख विसरलेल्या लोकांना ते अगोदर मराठी होते हे समजण्याची किंवा आपण सांगण्याची .

  Reply
 • September 17, 2019 at 4:26 pm
  Permalink

  Proud to be a maratha and proud to be associated with the valour and rich heritage of Maharashtra

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?