' ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्या' हाच ध्यास घेतलेल्या २ भावांबद्दल...

ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्या’ हाच ध्यास घेतलेल्या २ भावांबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोव्हीड आला आणि मागच्या वर्षापासून सगळ्या जगावरच त्याचा परिणाम झाला. जिच्यात कोव्हीडमुळे बदल झाला नाही एकही गोष्ट शिल्लक राहिली नाही.

जागतिक अर्थव्यवस्था , लोकांची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था ह्यावर तर या जागतिक महामारीमुळे गंभीर परिणाम झालेच पण आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जिचे तर मागच्या वर्षीपासून स्वरूपच बदलून गेले आहे. ती गोष्ट म्हणजे शिक्षणव्यवस्था होय.

 

student-studying-online-inmarathi

 

आधी विद्यार्थी शाळेत – कॉलेजमध्ये जायचे, आता शाळाकॉलेज विद्यार्थ्यांच्या घरी आले. जरी कोव्हीडमुळे शिक्षण बंद पडलं नसलं तरी त्याचं स्वरूपच पूर्णतः बदलून गेलं आहे. गेले दीड वर्ष घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.

एकही दिवस शाळेत न जाता मुलांच्या परीक्षा देखील पार पडल्या आणि मुलं पुढच्या वर्गात गेली सुद्धा! भारतात शिक्षणाचे डिजिटायझेशन तसे हळू हळू होत होतेच. पण या जागतिक महामारीमुळे एका रात्रीत शाळा कॉलेज ऑनलाईन झाले आणि या डिजिटायझेशनला अधिक गती मिळाली.

 

online education inmarathi

अर्थात जे विद्यार्थी अजून लहान वर्गांत आहेत त्यांना या ऑनलाईन शिक्षण व परीक्षांचे जास्त टेन्शन नव्हते, पण ज्यांची महत्वाची वर्षे होती त्यांचे तर भविष्य आणि जीव सुद्धा टांगणीला लागला आहे.

परीक्षा होणार का, कशी होणार, कधी होणार, ऑनलाईन होणार की ऑफलाईन या  प्रश्नांमुळे विद्यार्थी व पालक यांची रात्रीची झोप उडाली आहे. तरीही शाळा, कॉलेज व प्रशासन तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, त्यांच्या शिक्षणावर अधिक परिणाम होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत आणि हे काम सुरळीत पार पडावे म्हणून पुण्याची ही भावंडं मदत करत आहेत.

 

anupam 2 inmarathi

 

व्यावसायिक म्हणून काम करणारे पुण्याचे अनुपम मंगुडकर हे २०११ पासूनच ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत आणि तेव्हापासुनच ते कॉलेज आणि विश्वविद्यालयांना शिक्षणाच्या डिजिटायझेशनसाठी मदत करत आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांचे बंधू उत्कर्ष मंगुडकर व माजी सहकारी रामकृष्ण कुलकर्णी यांच्या साहाय्याने WeShine Tech Pvt Ltd ची सुरुवात केली. हे एक स्टार्ट अप आहे जे परीक्षा प्रक्रिया म्हणजेच एग्झाम प्रोसेसच्या ऑटोमेशन सोल्युशनसाठी काम करते.

या कंपनीचे प्रमुख प्रॉडक्ट म्हणजेच फ्लॅगशिप प्रॉडक्ट UniApps हे आहे. यात ऍप्लिकेशन्सचा संपूर्ण सूट आहे. विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रिया ऑटोमॅटिक करण्यात हे सॉफ्टवेअर मदत करते. विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते सर्टिफिकेट तयार करणे इथपर्यंत हे ऍप्लिकेशन वापरता येते. म्हणजेच संपूर्ण स्टुडन्ट स्कुल मॅनेजमेंटसाठी हे ऍप्लिकेशन उपयोगी आहे.

अनुपम हे २००८ साली एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असताना त्यांना इंटर्नल ट्रेनिंग असेसमेंट इव्हॅल्युएशन प्लॅटफॉर्म वापरताना काही अडचणी आल्या. त्याच वेळी एमबीए साठी घेण्यात येणारी प्रसिद्ध कॅट परीक्षा सुद्धा ऑनलाईन झाली आणि ती परीक्षा घेण्यात व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देण्यात अनेक अडचणी आल्या.

तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शिक्षणाचे डिजिटायझेशन भविष्यात होणे अटळ आहे आणि त्यात शाळा, कॉलेज, विद्यापीठे व विद्यार्थी यांना अडचणी येणार. त्याच अडचणींतून मार्ग काढण्याची कल्पना त्यांच्या मनात आली.

त्यांच्या स्टार्ट अपच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगताना ते म्हणतात की त्यांच्या टीमने एका ऑनलाईन परीक्षेसाठी काम करायला सुरुवात केली. त्याच वेळी योगायोगाने पुणे विश्वविद्यालयाने त्यांच्या काही अभ्यासक्रमांमध्ये एमसीक्यू (मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स) परीक्षा घेण्यास सुरुवात केली.

 

anupam 3 inmarathi

 

अनुपम व त्यांच्या टीमने त्यांच्या सॉफ्टवेअरची माहिती पुणे विद्यापीठाला दिली व त्यांना प्रात्यक्षिक दिले. त्यासाठी त्यांनी काम करणे सुरु केले व अशा रीतीने त्यांचे पहिले प्रॉडक्ट लाँच झाले. हे सॉफ्टवेअर एमसीक्यू पद्धतीच्या परीक्षांसाठी होते.

त्यानंतर त्यांच्या टीमने अनेक शैक्षणिक संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. प्रश्नपत्रिका तयार करणे, इतर बाबी मॅनेज करणे, विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणे, प्रश्नपत्रिका ऑनलाईन तपासणे, ऑनलाईन मूल्यांकन यासंबंधित अनेक गोष्टींवर त्यांनी काम केले आणि शैक्षणिक संस्थांना तांत्रिक साहाय्य केले.

या सगळ्या बाबी ज्या सॉफ्टवेअर्सने शक्य होतात ती सगळी ऍप्लिकेशन्स आता WeShine ने एकत्र केली आणि UniApps Suite या एकाच छताखाली ही सगळी ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत.

 

anupam 4 inmarathi

 

ऑनलाईन एग्झामिनेशन सिस्टीमशिवाय UniApps Suite मध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन ऍडमिशन, प्रश्नपत्रिका मॅनेज करणे , परीक्षांचे ऑनलाईन मार्किंग आणि निकाल तयार करणे या बाबी करता येतात. ह्यासाठी विद्यार्थ्यांचा व परीक्षांचा सर्व डेटा ऍमेझॉन क्लाउडवर सुरक्षित पद्धतीने होस्ट केला जातो.

WeShine ऍमेझॉनच्या खाजगी क्लाऊडचा वापर करतात आणि सगळा डेटा त्यांच्या ग्राहकांच्या मालकीचा असतो. परीक्षा किंवा एक सेशन पूर्ण झाल्यानंतर ते हा सगळा डेटा त्या त्या ग्राहकांना त्यांना ज्या फॉरमॅटमध्ये हवा असतो त्या फॉरमॅटमध्ये बॅकअप म्हणून स्वाधीन केला जातो.

हे स्टार्ट अप शिक्षणसंस्थांना सब्स्क्रिप्शन देऊन ऍप्लिकेशन सूट देते. प्रश्नपत्रिकांची संख्या, परीक्षांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या ह्यांवर त्यांचे शुल्क ठरते. शैक्षणिक संस्था व विश्वविद्यालये संपूर्ण सूटचे सब्स्क्रिप्शन घेऊ शकतात किंवा त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एखादे विशेष मोड्यूल घेऊ शकतात. सध्या WeShine ची टीम पाच राज्यांतील २० विश्वविद्यालयांबरोबर काम करत आहे.

 

mumbai university inmarathi

 

संपूर्ण भारतात त्यांचे काम हळूहळू वाढते आहे आणि कोव्हीडमुळे त्यांचे काम दिवसेंदिवस वाढते आहे. मुंबई विश्वविद्यालय, गोवा विश्वविद्यालय, गुजरात प्रौद्योगिकी विश्वविद्यालय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांबरोबर ते काम करत आहेत.

हे स्टार्ट अप सुरु करण्यासाठी सुरुवातीला दीड लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आणि त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतो आहे आणि सध्या ते आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डांशी हे ऍप्लिकेशन वापरण्यासाठी चर्चा करीत आहेत. ही महामारी आटोक्यात आल्यावर शाळा कॉलेज ऑफलाईन सुरु झाले तरीही डिजिटल शिक्षण हे भविष्य आहे आणि त्यासाठी WeShine Tech आत्तापासूनच तयारीत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?