' या १० अभिनेत्रींनी लग्नाआधीच (!) केला होता 'आई' होण्याचा प्रताप...

या १० अभिनेत्रींनी लग्नाआधीच (!) केला होता ‘आई’ होण्याचा प्रताप…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मातृत्व अर्थात आई होण्याचा हा अनुभव जगातील कोणत्याही स्त्री साठी अत्यंत मोलाचा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. आपल्यात एक जीव वाढतोय ही भावनाच अगदी आनंदाची असते. मातृत्वाची चाहूल लागताच ती स्त्री अगदी सजग होते स्वतःपेक्षा आपल्या बाळाला ती जास्त जपते.

एखादी स्त्री जेव्हा आई होते, तेव्हा मोठा जल्लोष केला जातो. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा समाजाचे ‘अलिखित नियम’ तिने पाळलेले असतात!

लग्नाआधी जर एखादी स्त्री मातृत्वाचा अनुभव घेत असेल, तर त्या मागचं कारण जाणून न घेता, समाज तिला दुषणे देऊ लागतो आणि तिच्यावर अत्यंत भयानक परिस्थिती ओढवते. अशात जर जोडीदाराने साथ दिली तर सगळंच सुरळीत होतं, पण नाही दिली तर त्या स्त्रीला पुढचा सगळा प्रवास आपल्या बाळाबरोबर एकटीलाच करायचा असतो.

 

mala aai whaychay inmarathi

 

अशा काही अभिनेत्री सुद्धा आहेत ज्यांनी लग्नाआधी मिळालेलं मातृत्व स्वीकारलं आणि जबाबदारीची जाणीव ठेऊन ते शिवधनुष्य आयुष्यभर पेलून सुद्धा नेलं. कोण आहेत त्या अभिनेत्री आणि काय आहेत त्यांच्या गोष्टी, जाणून घेऊया…

१. नेहा धुपिया

अलीकडेच नेहा धुपियाने आपल्या मुलीला जन्म दिला. अंगद बेदीशी लग्न झाल्यावर अवघ्या काही महिन्यातच त्यांना ही गोंडस मुलगी झाली. त्या दोघांनी नंतर हे कबूलही केलं, की लग्नाआधीच नेहा गरोदर होती आणि तिची ही बातमी समजल्यावर तिचे आई-वडिल प्रचंड चिडले होते. पण त्यांनी लग्न केलं आणि एका छोट्या परीला जन्म दिल्यानंतर सगळं सुरळीत झालं.

 

neha dhupiya angad bedi inmarathi

 

२. दिया मिर्जा

दिया मिर्जाचं, बिझनेसमन वैभव रेखीशी झालेलं लग्न, हे तिचं दुसरं लग्न आहे. त्या आधी प्रोड्युसर साहिल सांघा याच्याशी तिचा विवाह झाला होता. वैभव रेखी यांच्यापासून दिया मिर्जाला लग्नाआधीच दिवस गेले असून त्यांनी अलीकडेच लग्न केलं आहे.

 

dia mirza and vaibhav rekhi inmarathi

 

वैभव रेखीचं सुद्धा हे दुसरं लग्न, आधीच्या पत्नीपासून त्यांना समायरा नावाची एक मुलगी सुद्धा आहे.

३. नीना गुप्ता

नीना गुप्ता यांनी २०१८ साली, बधाई हो नावाच्या चित्रपटात, ५० व्या वर्षी गरोदर असलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती तेव्हा त्यांचं सगळ्यांनीच खूप कौतुक केल होतं. पण खऱ्या आयुष्यात सुद्धा नीना गुप्ता या तितक्याच धाडसी आहेत. एक सिंगल मदर राहून आपल्या मुलीला, म्हणजे मसाबा गुप्ता हिला त्यांनी उत्कृष्टपणे वाढवलं.

 

neena and masaba gupta inmarathi

 

नीना गुप्ताची मसाबा ही वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यापासून लग्नाआधीच झालेली मुलगी आहे. त्या काळात हे सगळं, समाजात राहून हे आव्हान पेलून नेणं काही सोपं नव्हतं. पण नीनाने ते करून दाखवलंय.

४. श्रीदेवी

श्रीदेवी ही अनेक कारणांमुळे अत्यंत चर्चेत राहिलेली अभिनेत्री होती. आपल्याला लग्नाआधीच गरोदरपण आलंय, हेदेखील तिने मीडिया समोर मान्य केल होतं.

श्रीदेवीच्या बोनी कपूर सोबतच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर मधून जान्हवी कपूरचा जन्म झाला आहे. आपली पहिली पत्नी, मोना हिच्याशी घटस्फोट घेऊन बोनी कपूर आणि श्रीदेवीने लग्न केलं. आपल्या लग्नात ती ७ महिन्यांची गरोदर होती.

 

English vinglish shridevi sridevi inmarathi

५. महिमा चौधरी

महिमा चौधरीचं बाळंतपण हे तिच्या लग्नासारखंच अचानक आलं होतं. २००६ साली तिचं बॉबी मुखर्जीशी लग्न झालं आणि लगेच काही महिन्यात तिने एका मुलीला जन्म दिला. तिच्या या बातमीने सगळे अचंबित झाले होते आणि तिलासुद्धा लग्नाआधी दिवस गेल्याचे बोलले जात होते.

 

mahima chaudhary inmarathi

 

६. सारिका

कमल हसनची दुसरी पत्नी सारिका, हीसुद्धा ते दोघे लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना, लग्नाआधीच गरोदर राहिली होती. कमल हसन यांची पहिली कन्या श्रुती हसन आणि दुसरी कन्या म्हणजे अक्षरा हसन. अक्षरा ही सारिका आणि कमल हसन यांची मुलगी आहे.

 

kamal sarika and akshara hasan inmarathi

 

७. कोंकना सेन

कोंकना सेन आणि रणवीर शोरे हे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. सप्टेंबर २०१० मध्ये त्यांनी सिक्रेट पद्धतीने लग्न केलं आणि मार्च २०११ साली त्यांचा मुलगा जन्माला आला. म्हणजे लग्नात कोंकना ही ३ महिन्यांची गरोदर होती. त्यांचं नातं काही फार काळ टिकू शकलं नाही, आणि रणवीर आणि कोंकना हे २०२० मध्ये वेगळे झाले.

 

konkana sen sharma inmarathi

 

८. कल्की कोचलीन

कल्की कोचलीन सुद्धा आपल्या लग्नाआधीच आलेल्या मातृत्वामुळे फार चर्चेत होती. बॉयफ्रेंड गाय हर्षबर्ग यांच्यापासून तिला पाहिलं अपत्य झालं. एका वर्तमानपत्रातून उघडपणे ही बातमी देणारी ती दुसरी अभिनेत्री ठरली.

 

kalki koechlin inmarathi

९. अनुष्का शंकर

सतार वादक रविशंकर यांची ही कन्या, जी स्वतः सुद्धा एक उत्तम सतार वादक आहे, लग्नाआधीच गरोदर राहिली होती. ब्रिटिश फिल्ममेकर जो राईट यांच्यापासून तिला दिवस गेले होते. बातमी समजताच त्या दोघांनी लग्न केलं.

 

anoushka shankar inmarathi

 

१०. सिलीना जेटली

दुबईतील हॉटेलीयर पीटर हाग, यांच्यापासून सिलीनाला दिवस गेले आणि त्यांनी त्वरित लग्न केलं. २०१२ साली तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

 

celina jaitley inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?