' व्यायामाचा अतिरेकही ठरू शकतो घातक; हे गंभीर परिणाम लक्षात ठेवा!!

व्यायामाचा अतिरेकही ठरू शकतो घातक; हे गंभीर परिणाम लक्षात ठेवा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तुम्हाला ती म्हणं माहिती आहे का? की, ‘अति केल आणि हसू आल’.  मुद्दा हा आहे की कोणतीही गोष्ट असो ती अति केली की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच ! काही दिवसांपूर्वी हँडसम हंक, मॉडेल,अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे, हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने निधन झाले. इतका तंदुरुस्त असूनही त्याच्याबाबतीत हे असे काही अनपेक्षित घडले.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Bigg boss १३ winner sidharth shukla) याचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसला आहे. कारण स्वतः सलमान खानसारखा कलाकार सिद्धार्थ शुक्लाच्या फिटनेसचे कौतुक करत असे.

 

sid inmarathi

 

जरी सिद्धार्थ वयाने ४० वर्षांचा होता पण दिसायला मात्र आजही तो ३० वर्षांच्या एखाद्या तरण्याबांड मुलासारखा होता. केवळ मुलीच नाही तर मुलं देखील त्याच्या टोन्ड बॉडीचे फॅन होते. आज प्रत्येकजण सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त करत आहे. पण यामागे अनियमित जीवनशैली आणि अति व्यायामाचे वेड होते हे जर कोणी म्हणाले तर? होय मित्रांनो,

आजकाल ‘कार्डियाक अरेस्ट’ च्या वाढलेल्या घटनांमगे अति व्यायाम हे ही एक कारण आहे. जसे व्यायाम न करण्याचे तोटे आहेत,तसेच अति व्यायाम करण्याचे ही तोटे आहेत.

 

tablets medicine inmarathi 1

 

औषधं प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपलं शरीर आणि तब्येतीवर होतात. तसंच प्रमाणापेक्षा जास्त व्यायामही शरीराला हानिकारक ठरू शकतो. एका संशोधनामध्ये ही गोष्ट समोर आली आहे.

प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे कार्डिओ आणि हृदयाच्या समस्या निर्माण होतात. ऑस्ट्रेलियाच्या ‘बेकर आयडीआय हार्ट अँड डायबिटिक इन्स्टिट्यूटनं’ याबाबतचं संशोधन केलं आहे.

मीडियातून व्यायाम आणि त्याच्या फायद्याबद्दल वाढवून सांगतिलं जातं, अशी प्रतिक्रिया संशोधनकर्त्यांनी दिली आहे. तसंच अती व्यायामावर भाष्य केली, तरी आमच्यावर टीका होते, अशी खंतही संशोधनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 

hritik-exercise-inmarathi

 

‘घातक अतिव्यायामाचे हे गंभीर परिणाम तुम्हाला माहीत हवेच!’ संशोधनकर्त्यांनी केलेलं हे संशोधन आता कॅनडियन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. काय आहेत अति व्यायाम केल्याचे तोटे ? चला जाणून घेवूयात..

अति व्यायाम केल्याने होणारे दुष्परिणाम :

१. व्यायाम व्यवस्थित न केल्यास सांधेदुखी होऊ शकते.

bones inmarathi

 

२. सवय नसताना अति व्यायाम केल्यास अनेकदा स्नायूंवर ताण पडून मसल पेन होतं.

 

muscle inmarathi
Times of india

 

३. अति व्यायामाचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे प्रचंड शिणवटा. यालाच ‘मसल सोअरिंग’ म्हणतात.

 

muscle 1 inmarathi

 

४. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने स्नायू काही काळासाठी दुखावले जाऊ शकतात. काही काळानंतर आराम वाटला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

 

doctors 2 inmarathi

 

५. चुकीच्या व्यायामाचा फटका शरीराच्या कोणत्याही भागाला बसून तो भाग काही काळासाठी दुखावला जातो.

 

pain inmarathi

 

६. अनेक अॅथलिट आणि अगदी सर्वसामान्यांनाही अति व्यायामामुळे होणारा त्रास म्हणजे मस्क्युलर स्पाझम. यात स्नायू प्रचंड आखडतात.

 

mus inmarathi

 

७. सवय नसताना किंवा शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होऊन हृदयाचे विकार होतात.

 

heart-attack-inmarathi

 

८. अति व्यायामामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊन या संबंधित आजार होण्याची भीती असते.

 

dehydration 5 InMarathi

 

 

९. चुकीच्या व्यायामामुळे किंवा ट्रेनरचा सल्ला न घेता केलेल्या व्यायामामुळे हाडं आणि लिगामेंट डॅमेज होऊ शकतं. याशिवाय थकवा आणि कणकणही वाटू शकते.

 

trainer inmarathi

 

मित्रांनो, कोणतीही गोष्ट, मग तो व्यायामही का असेना, प्रमाणात करणे किती गरजेचे असते ते तुम्हाला लक्षात आले असेलच! लेख कसा वाटला ते नक्की कळवा आणि नवनवीन विषयांसाठी आपल्या इनमराठी ल अवश्य फॉलो करत रहा.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?