' व्हॉट्सॲप अकाउंट कुलूप लावून सुरक्षित करण्याची किल्ली तुमच्या हातात येणार! – InMarathi

व्हॉट्सॲप अकाउंट कुलूप लावून सुरक्षित करण्याची किल्ली तुमच्या हातात येणार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आजकाल तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं आहे त्यामुळे आपलं दैनंदिन जीवन देखील सुखकर होत आहे. डिजिटल क्रांतीमुळे तर आपण आता घरबसल्या मोबाइल पासून ते टीव्ही फ्रिज पर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवू शकतो. तंत्रज्ञानाचे फायदे जितके आहेत तितके तोटे देखील आहेत. आजकाल सायबर क्राईम प्रकार वाढत चालला आहे.

एखाद्या नंबर वरून कॉल येऊन तुमची आणि तुमच्या बँक खात्याची माहिती विचारली जाते, जवळजवळ सर्वच बँकांनी आपापल्या ग्राहकांना सतर्क केले असले तरी काही जण अशा कॉल्सना फसतात, म्हणून डिजिटल व्यवहार करताना तो काळजीपूर्वक केला पाहिजे अन्यथा आपल्यालाच नुकसान होऊ शकते.

 

online fraud inmarathi

आजचं जग हे खुशाली विचारणारं जग राहिलेलं नसून ते आता व्हॉट्सॲप जग बनलं आहे. अगदी फोटो पाठ्वण्यापासून ते अगदी पैसे पाठ्वण्यापर्यंत सर्व काही गोष्टी व्हॉट्सॲप वर होतात. आज जगभरात करोडो लोक हे अँप वापरतात त्यामुळे ते सुरक्षित ठेवणे हे देखील कंपनीचे कर्तव्य आहे म्हणूनच आता एक नवी संकल्पना ते घेऊन येत आहेत, काय आहे ती संकल्पना जाणून घेऊयात…

व्हॉट्सॲपचे नवे फिचर आहे तरी काय?

आपण जे व्हॉट्सॲप व्हर्जन वापरतो ते आहे E2E इन्स्क्रिप्टेड आहे, ज्यात मेसेज पाठवणारा आणि ज्याला मेसेज मिळाला आहे तो अशा दोनच व्यक्ती हे चॅट बघू शकतात, मात्र आपण जेव्हा या चॅट्सचे बॅकअप गूगल ड्राईव्ह अथवा अँपल क्लाऊडवर सेव्ह करतो तेव्हा ते इन्स्क्रिप्टेड राहत नाही. त्यामुळे कोणतीही अनोळखी व्यक्ती हे चॅट्स बघू शकते आणि त्याचा गैरवापर करू शकते.

 

whatsapp inmarathi

 

गुगल ड्राईव्ह आणि अँपल क्लाऊडवरचा बॅकअप सुरक्षित कसा राहणार?

व्हॉट्सॲपकडून असे सांगितले गेले आहे की, E2E बॅकअप अधिकच सक्षम आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एन्क्रिप्शन की ही एक नवी संकल्पना आणली आहे. ही प्रणाली अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीमध्ये काम करु शकते. जेव्हा E2E बॅकअप सक्षम कराल तेव्हा एक युनिक इन्स्क्रिप्टेड की जनरेट होईल. लोकं मॅन्युअली किंवा पासवर्डद्वारे तिला सुरक्षित करू शकता.

 

google drives inmarathi
securitynewspaper.com

 

जेव्हा कोणी पासवर्डचा पर्याय निवडेल तेव्हा एचएसएम या हार्डवेयरने तयार केलेल्या बॅकअप की वॉलेटमध्ये ही की साठवली जाईल. या पद्धतीने हार्डवेयर प्रामुख्याने सुरक्षेच्या कारणासाठी तयार केले गेले आहे.

इन्क्रिप्टेड व्हाट्सअप चॅट बॅकअपचा एक्सेस कस कराल?

व्हॉट्सॲपच्या म्हणण्यानुसार एखाद्या यूजरला जर बॅकअप चॅट हवा असेल तर त्याने इन्स्क्रिपशन की ने तो  शकतो अथवा एचएसएम बॅकअप की वॉलेटमधून पासवर्ड वापरून इन्स्क्रिपशन की मिळवू शकतो आणि बॅकअप घेऊ शकतो.

 

whats app inmarathi

 

एचएसएम की नक्की आहे तरी काय?

व्हॉट्सॲप असं दावा करत आहे की, एचएसएम बॅकअप की वोल्ट हि यंत्रणा पासवर्ड व्हेरिफिकेशनमध्ये प्रयत्न करण्यासाठी लागू केली जाईल. तसेच पासवर्ड टाकण्याचे काही प्रयत्न अयशस्वी झाल्यास ही की कायमची लॉक होईन जाईल. फक्त व्हॉट्सॲपला ही की एचएसएममध्ये आहे कि नाही हे माहिती असेल.

 

whats app inmarathi 1

चॅट बॅकअप कशाप्रकारे सुरक्षित आहे?

आपल्या चॅट बॅकअपला ६४ डिजिट एन्क्रिपशन की चा वापर करून एन्ड टू एन्ड इन्क्रिप्ट केले जाऊ शकते. आपल्या चॅटचा बॅकअपदेखील पासवर्डसह सुरक्षित केला जाऊ शकतो. तसेच काही वेळा हीच की एचएसएम प्रणालीमध्ये सेव्ह करू शकतो.

 

whats app inmarathi 3

 

जुन्या चॅटचा बॅकअप कसा घ्याल?

आपल्याला जर बॅकअप हवा असल्यास आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा मग तो बॅकअप की वॉलेटमध्ये जाऊन तो तपासाला जाईल.

तपासणीनंतर तो योग्य असल्यास बॅकअप की यूजरला इनस्क्रिप्ट की पाठवले, यूजरला की मिळाली की तो बॅकअप घेऊ शकतो.

 

whats app inmarathi 2

 

आजचा जमाना कितीही बदलला तरी प्रत्येक गोष्टींची सुरक्षा करणे गरजेचे आहे, आज अनेक गाड्यांच्या कंपन्या बाजारात कि लेस गाड्या अनंत आहेत, केवळ बटनावर तुम्ही गाडी सुरु करू शकता.

तंत्रज्ञानांतील हा एक खूप मोठा बदल जरी असला तरी देखील हेच तंत्रज्ञान कधीतरी खराब होऊ शकते म्हणूनच आपल्याजवळ त्यावर काहीतरी उपाययोजना हवीच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?