' गणपती बाप्पासाठी घरी आणलेल्या दुर्वा तुम्हालाही आरोग्याचं वरदान देतात, वाचा!

गणपती बाप्पासाठी घरी आणलेल्या दुर्वा तुम्हालाही आरोग्याचं वरदान देतात, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

घराघरात बाप्पा आले. कोरोनाचं सावट असलं तरीही यावर्षी सुद्धा सगळेच गणपतीच्या स्वागतासाठी तितकेच उत्सुक आहेत. सजावट करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत.

गणपती बाप्पा विराजमान होणार आणि समाजावरील सर्व संकटांचं निवारण करणार हा लोकांचा ठाम विश्वास आहे. लोकांनी उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी या वर्षी झालेला समाधानकारक पाऊस हे सुद्धा एक कारण आहे.

प्रत्येकजण गणपतीच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी कागदावर किंवा मोबाईल वर घेऊन बाहेर पडतोय.

गणपतीच्या पुजेसाठी ‘दुर्वा’ ही सर्वात आवश्यक गोष्ट मानली जाते. दुर्वा सोडून इतर एखादी वस्तू राहिली तरी चालेल, पण २१ दुर्वा असायलाच पाहिजे हा प्रत्येक घरातला नियम आहे.

 

ganpati inmarathi
patrika.com

 

दुर्वांचं महत्व हे पारंपरिक आहे की,

‘अनलासुर या राक्षसाला वध केल्यानंतर गणपतीच्या पूर्ण अंगाची आग होत होती. ती आग शांत करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. पण, काही केल्या ती आग शांत होत नव्हती. तेव्हा ८८ हजार ऋषींनी प्रत्येकी २१ दुर्वा वाहिल्या होत्या आणि मग गणपतीला शांत वाटलं होतं.’

अशी ती आख्यायिका आहे. या दुर्वांना वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्व आहे.

या गोष्टीला आता इंग्रजी मीडिया सुद्धा कवर करतोय. काय आहेत फायदे? जाणून घेऊयात :

 

१. ऍसिडिटी पासून मुक्ती :

 

durva juice inmarathi

 

पोटदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दुर्वांचा ज्युस सेवन करावा असं डॉक्टर सांगतात. या ज्युस मध्ये काही प्रमाणात आलं मिसळावं आणि सकाळी काही खायच्या आधी हा ज्युस प्यावा.

दुर्वांमध्ये असलेल्या alkaline गुणधर्मामुळे acidity चा नाश होतो. दुर्वांचा ज्युस नियमित प्यायल्याने पोटाचे सर्व विकार नाहीसे होतात आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते.

 

२. रोग प्रतिकारक क्षमता :

 

immune system inmarathi
gutmicrobiotaforhealth.com

 

दुर्वा शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. Cynodon Dactylon Protein Fractions (cdpf) हे दुर्वांमध्ये असतात जे की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात.

दुर्वा ह्या antiviral आणि anti-microbial असल्याने त्यांच्या वापराने शरीर निरोगी बनतं आणि कोणताही आजार आपल्या जवळ फिरकत नाहीत.

 

३. साखर प्रमाणात ठेवणे :

 

diabetes-inmarathi02
jadipani.com

 

दुर्वांमध्ये असलेल्या Cynadon dactylon मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते. दुर्वा या डायबेटिस च्या पेशंट ला सुद्धा प्रतिकार करण्यास उपयुक्त ठरतात.

दुर्वा आणि कडुनिंब पानाच्या ज्यूस ने क्रोनिक डायबेटिस च्या पेशंट ला सुद्धा रक्तातील साखरेचं प्रमाण नियमित ठेवण्यासाठी मदत होते.

 

४. किडनीचे आजार :

 

kidney pain

 

युरिन इन्फेक्शन च्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी दुर्वांचा ज्यूस हा उपयुक्त आहे. योगर्ट सोबत दुर्वांचा ज्यूस घेतल्याने स्त्रियांना मासिक पाळी मध्ये नियमितता आणण्यास मदत होऊ शकते.

आणि मासिक पाळी चा त्रास कमी आणि कालावधी नियमित ठेवण्यासाठी मदत होत असते. दुर्वांचा ज्यूस आणि मध हे दिवसातून ३ – ४ वेळेस घेतल्याने बरेच आजार कमी होऊ शकतात.

 

५. बद्धकोष्ठता निर्मूलन :

 

constipation inmarathi
rediff.com

 

दुर्वांच्या नियमित ज्यूस सेवनाने बद्धकोष्ठता पासून निर्मूलन होते. शरीरात तयार होणारे सर्व जंतू हे दुर्वांमुळे मारले जातात आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होते. ‘पिकू’ या सिनेमात आपण हा त्रास किती अवघड असतो हे बघितलंच आहे.

 

६. वजन कंट्रोल करणे :

 

weight gain inmarathi
telegraph.com

 

वजन कमी करण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असतो. तुम्ही जर का दुर्वांचा ज्यूस दिवसातून दोन वेळेस घेतला तर वजन कमी होण्यास मदत होते.

डीकॉक्शन म्हणजेच दुर्वा, मिरे आणि चवीपुरती जिरे पुड हे ज्यूस मध्ये वापरल्यास वजन कमी करण्यास मदत होते. नारळ पाणी किंवा ताकासोबत घेतल्यास सुद्धा हे उपयुक्त ठरते.

 

७. रक्त शुद्धीकरण :

 

Blood.marathipizza3
blogspot.com

 

दुर्वांमध्ये असलेल्या अल्कालाईन नेचर मुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यास दुर्वा मदत करतात आणि अनेमिया हा रोग होण्यापासून आपल्याला वाचवतात.

कोणत्याही जखमेतून आणि मासिक पाळीतून रक्तस्त्राव कमी व्हावा यासाठी दुर्वांचा ज्यूस मदत करतो.

 

८. अल्सर पासून बचाव :

 

mouth ulcer featured inmarathi
express.co.uk

 

फ्लेवोनोइड्स चं प्रमाण असल्याने दुर्वा या अल्सर ला दूर ठेवण्यास मदत करतात. दातांची बळकटी वाढवण्यासाठी सुद्धा दुर्वा उपयुक्त आहेत. दुर्वांच्या वापराने तोंडातून येणारा वास सुद्धा नाहीसा होत असतो.

आपण इतक्या वर्षांपासून नियमितपणे हाताळणाऱ्या दुर्वांचे इतके फायदे असतील हे फार कमी जणांना माहीत असेल.

आपली संस्कृती आणि आपल्या गोष्टींचं उगीच जगभर कौतुक होत नाही. आपल्याला त्यांच्यामागचं फक्त शास्त्र सांगितलं जायचं आणि वैज्ञानिक फायदे नाही इतकाच काय तो फरक आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?