' गरिबीवर मात करून श्रीमंतीचं शिखर गाठणाऱ्या ५ जगप्रसिद्ध व्यक्ती! – InMarathi

गरिबीवर मात करून श्रीमंतीचं शिखर गाठणाऱ्या ५ जगप्रसिद्ध व्यक्ती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणून नाव कमवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, जरी तुम्ही जन्माने श्रीमंत असलात तरी ती श्रीमंती टिकवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागते आणि जर तुम्ही जन्माने गरीब असाल तर अस्सल श्रीमंती मिळवण्यासाठी देखील तुम्हाला मेहनतच करावी लागते. आज जगात अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यांचा यशाच्या शिखरापर्यंतचा प्रवास आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतो. आज आपण अश्याच काही प्रसिद्ध व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अतिशय गरीब परिस्थितीमधून वर येत यशाचे शिखर काबीज केले आहे.

 

१) स्टीव्ह जॉब्स

steve-jobs-marathipizza01
forbes.com

अॅपल कंपनीचे संस्थापक आणि एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाणारे स्टीव्ह जॉब्स यांना आपल्या जीवनात अतिशय संघर्ष करावा लागला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानविषयक कल्पना आजमावून बघण्यासाठी पैसे नसायचे, तेव्हा पैसे मिळवण्यासाठी ते उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करायचे. पदवी शिक्षण पूर्ण करताना ते इतके गरीब होते की त्यांनी मित्रांच्या रूमवर जमिनीवर झोपून दिवस काढले होते. कोकची बॉटल विकून ते आपले पोट भरायचे. पण त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर जगामध्ये आपले नाव कमावले.

 

२) जॅक मा

jack-ma-marathipizza02
cnbc.com

काहींच्या जीवनामध्ये इतके कठीण प्रसंग येतात की शेवटी नशिबाला दोष देत ते हार मानतात, अशीच काहीशी स्थिती जॅक मा यांच्या जीवनात आली होती, पण त्यांनी आपल्या अपयशातूनच बलाढ्य साम्राज्य उभे केले. जॅक मा यांना त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात तब्बल ३० कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला होता. शरीर बळकट नसल्याने त्यांना पोलीस खात्यामध्ये देखील स्थान मिळाले नव्हते. केएफसी मध्ये नोकरीसाठी आलेल्या २४ उमेदवारांपैकी २३ जणांना निवडले, पण जॅक मा यांना मात्र निवडले नव्हते. एवढेच काय हार्वर्ड युनिव्हर्सिटीने १० वेळा त्यांना परत पाठवले होते. या सर्व काळात त्यांची परिस्थिती अतिशय खराब होती. नोकरीसाठी ते वणवण भटकत होते. जीवनात इतक्या अपयशांना तोंड देणारा माणूस आज अलिबाबा या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा मालक आहे.

 

३) लिओनार्डो दि कॅप्रीओ

leonardo-marathipizza03
knowyourmeme.com

हॉलीवूडचा आजचा हा सर्वात प्रसिद्ध अभिनेता एकेकाळी अतिशय गरीब होता. तो अश्या भागामध्ये वाढला जेथे वेश्या आणि ड्रग्ज डीलर्सचे वास्तव्य होते. त्यांच्या सोबत राहिल्याने त्याचे संपूर्ण बालपण खराब झाले होते, त्याची आर्थिक स्थिती देखील अतिशय हलाखीची होती. पण अश्याही परिस्थितीमध्ये न डगमगता तो जीवनाशी लढत राहिला आणि त्यावर विजय मिळवत त्याने आपल्या मेहनतीने संपूर्ण हॉलीवूडवर राज्य केले.

 

४) जे. के. रोलिंग

JKRowling-marathipizza04
harrypotter.wikia.com

जे. के. रोलिंग म्हणजे हॅरी पॉटरच्या मूळ लेखिका. त्याचं बालपण म्हणावं तितकं चांगल गेलं नाही. त्यांना वडील नव्हते, केवळ आईने त्यांचा सांभाळ केला. घरची स्थितीही चांगली नव्हती. एक वेळ तर अशी आली की निराशेमध्ये आणि दु:खामध्ये त्या इतक्या बुडाल्या होत्या की त्यांनी जीव देण्याचा विचार केला, परंतु अश्या परिस्थितीमध्येही स्वत:ला सावरत त्यांनी संकटाशी दोन हात केले आणि एक एक पायरी पार करत आज जगातील सर्वात प्रसिद्ध लेखिका म्हणून त्यांनी नाव कमावले आहे.

 

५) चार्ली चॅप्लिन

charlie-marathipizza05
dailymail.co.uk

संपूर्ण जगाला हसवणाऱ्या या माणसाचं बालपण आणि तरुणपण जाणून घेताना मात्र डोळ्यात अश्रू येतात. त्यांना वडील नव्हते, आई होती पण ती वेड्यांच्या इस्पितळामध्ये होती. ते त्यांच्या भावासोबत राहत असतं. आर्थिक परिस्थितीशी ते नेहमीच झगडत राहिले. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी बराच खडतर प्रवास पार केला. याच प्रवासातून त्यांना एक शिकवण मिळाली ती म्हणजे कितीही कठीण संकटे येऊ दे माणसाने हसत हसत त्यांना सामोरे गेले पाहिजे, म्हणजे दुःखाची झळ बसत नाही.

……म्हणूनच शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, यश तुमचेच आहे..!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?