' …आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने पाकिस्तानी फॅन्सची बोलती बंद केली! – InMarathi

…आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने पाकिस्तानी फॅन्सची बोलती बंद केली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

क्रिकेट म्हणजे भारतीयांचा अगदी जीव की प्राण असणारा विषय! क्रिकेटची आवड अजिबातच नसणारा भारतीय सहजासहजी शोधणं अशक्यच आहे. क्रिकेट भारतीयांच्या नसानसातून वाहतं  अजिबातच चुकीचं ठरत नाही.

एकेकाळी भारतीय टीममध्ये मुंबईकरांचा राबता असायचा. त्यामुळे मराठी मंडळींसाठी हा विषय अधिकच लाडका आणि जिव्हाळ्याचा… महाराष्ट्रातील लोकांचं क्रिकेटवेड गल्लीगल्लीत, एवढंच काय तर इमारतींच्या गच्चीवर, हॉल थोडा मोठा असणाऱ्या घरातही दिसून येतं, हे वेगळं सांगायला नको!

 

gully cricket inmarathi

क्रिकेटसारखाच आणखी एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा!

गणपतीच्या आगमनाची आतुरता, आनंदात साजरे केले जाणारे ते १० दिवस आणि मग त्याच्या निरोपाच्या क्षणी ‘एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्यात हसू’ अशी अवस्था, ही बाब मराठी माणसासाठी अगदीच सामान्य आहे. अगदी कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा नारा दिल्याशिवाय स्वस्थ बसेल, तो मराठी माणूस कसला?

 

ganpati bappa morya inmarathi

 

आता हा विचार करा, की क्रिकेट आणि बाप्पा हे दोन्ही जिव्हाळ्याचे विषय एकाच ठिकाणी एकाचवेळी हातात हात घेऊन आले तर, आणि तेही चक्क क्रिकेट स्टेडियममध्ये; भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात!

झालं असं होतं की…

ही घटना आहे, २०१८ मधली. आशिया कपचा सामना सुरु होता. रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा होती. भारतीय संघ आणि समोर पाकिस्तान, त्यात आशिया चषकासारखी महत्त्वाची स्पर्धा, म्हणजे मैदानावर आणि मैदानाबाहेरही मोठी ठशन असणार, यात काही शंकाच नाही.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करत या स्पर्धेत तुफान खेळ करत धमाल उडवली होती. रोहितच्या संघाने त्या सामन्यात पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवला होता. ९ गडी राखून मिळवलेला तो विजय आजही अनेकांच्या स्मरणात असेल. पण खरा गंमतीचा भाग हा नव्हताच!

 

rohit and dhawan inmarathi

 

या सामन्यात पाकिस्तानी चाहत्यांनी एक धाडस केलं. ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे द्यायचा प्रयत्न सुरु केला. स्टेडियममध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने हा नारा द्यायला सुरुवात केली, आणि इतरांनी त्याची साथ देण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यानंतर जे घडलं ते भलतंच होतं.

हे नारे जोर धरणार, असं वाटू लागलं एवढ्यात कुणी एका भारतीयाने वेगळाच जयघोष सुरु केला. ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी आरोळी स्टेडियममध्ये घुमली आणि एकामागोमाग एक अशी सगळ्यांनीच त्याला साथ दिली.

पुढच्या काही क्षणांमध्ये, पाकिस्तानी फॅन्स चक्क शांत झाले. त्यांचा आवाज नाहीसा झालाच, पण अवघ्या स्टेडियममध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’ हे तीनच शब्द ऐकू येऊ लागले!

भारत पाकिस्तान सामन्यात हे असे किस्से नेहमीच घडतात. फॅन्सचा राडा झाला नाही, तरच नवल! पण चक्क ‘गणपती बाप्पा मोरया’ या तीन शब्दांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा पार गपगार करून टाकला. नेमकं काय घडलं होतं, ते या व्हिडिओमध्ये पाहता येईल.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?