' रॉयल इनफिल्ड बुलेट घ्यायचा विचार करताय? थांबा त्याआधी या ९ टिप्स वाचा!! – InMarathi

रॉयल इनफिल्ड बुलेट घ्यायचा विचार करताय? थांबा त्याआधी या ९ टिप्स वाचा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रॉयल इनफिल्ड बुलेट चालवणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. अहो कारण त्या बाईकचा थाटंच इतका निराळा आहे की त्यावरून राईड करताना कधीही न विसरता येणारी फिलिंग अनुभवता येते. अशी ही रॉयल इनफिल्ड बुलेट अगदी गेल्या २-३ वर्षांपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होती.

त्याचे कारण म्हणजे बाईकची महाग किंमत! पण आता मात्र रॉयल इनफिल्ड बुलेटच्या किंमती बऱ्याच उतरल्या आहेत.

त्यामुळे गेल्या वर्षभराच विचार करता, रॉयल इनफिल्ड बुलेटच्या विक्रीत देखील मोठी वाढ झाली आहे. (अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे सेल्फ स्टार्ट!)

रॉयल इनफिल्ड बुलेट तुमची देखील ड्रीम बाईक असेल आणि ती खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यापूर्वी ह्या गोष्टी नक्की माहित करून घ्या.

कारण ज्याप्रमाणे प्रत्येक सर्वोत्कृष्ट गोष्टीमध्ये काही न काही कमतरता असते.

तश्याच काही एक, दोन नाही तर तब्बल ९ कमतरता रॉयल इनफिल्ड बुलेट मध्ये आहेत, ज्यामुळे या बाईकचा अस्सल चाहता रॉयल इनफिल्ड बुलेट घेण्यापूर्वी दोनदा नक्कीच विचार करेल.

 

royalenfield-bullet-marathipizza00

 

१) आवश्यक फीचर्सची कमतरता

सध्याच्या आधुनिक युगामध्ये बहुतांश बाईक या तंत्रज्ञानासह अश्या रीतीने प्रेझेंट केल्या जातात जेणेकरून त्या वापरणाऱ्याला युजर फ्रेंडली वाटल्या पाहिजेत.

पण २०१७ वर्ष आलं तरीही रॉयल इनफिल्ड बुलेटमध्ये अजूनही ट्यूबलेस टायर, टेकोमीटर, ट्रीपमीटर आणि फ्युल गेज देखील नाही.

Cheap-Royal-Enfield-Alloy-Wheel InMarathi

 

रॉयल इनफिल्ड बुलेटच्या किंमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या इतर बाईक्स मध्ये या सर्व गोष्टी आढळतात.

बाकीच्या गोष्टी सोडा, पण सर्वात महत्त्वाचा फ्युल मीटर नसल्याने आपल्याला बाईक मध्ये नेमकं किती पेट्रोल शिल्लक आहे हे कळत नाही.

 

२) व्हायब्रेशन

रॉयल इनफिल्ड बुलेट अतिशय व्हायब्रेट होते. याचा तोटा असा होतो की जेव्हा तुम्ही ८० किंवा जास्तच्या स्पीडला रॉयल इनफिल्ड बुलेट पळवता, तेव्हा तुम्ही रियर व्ह्यू मिररमध्ये काहीहि पाहू शकत नाही.

 

royal-enfield-continental-InMarathi

 

इतके ते मिरर व्हायब्रेशनमुळे थरथरत असतात. हँडल बार आणि फुटपेग्ज्स देखील इतके व्हायब्रेट होतात की लॉंग ड्राईव्हवेळी भयंकर त्रास सहन करावा लागतो.

 

३) खराब ब्रेक्स

रॉयल इनफिल्ड बुलेटचे ब्रेक इतके खराब आहेत की ते सहज लॉक होतात, एबीएस सोडा, पण रॉयल इनफिल्ड बुलेट आणि क्लासिकमध्येही रिअर डिस्क देखील नाही.

 

bullets-have-bad-brakes InMarathi

 

याचा परिणाम असा होतो की दर १०० किमीच्या कन्टीन्यूअस राईड नंतर रिअर ब्रेक फिक्स करावे लागतात.

४) खराब हँडलिंग

जास्त वजनामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या घटकांमुळे रॉयल इनफिल्ड बुलेटची हँडलिंग इतर बाईक्सच्या तुलनेमध्ये अतिशय खराब ठरते.

royal-enfield-1 InMarathi

 

रॉयल इनफिल्ड बुलेट वापरणारे जेव्हा इतर एखाद्या बाईक वरून राईड करतात तेव्हा त्यांना देखील हा फरक लगेच लक्षात येतो.

 

५) पावरची कमतरता

रॉयल इनफिल्ड बुलेटमध्ये पावरची कमी आहे, जेव्हा तुम्ही १०० पेक्षा अधिक स्पीडवर राईड करता तेव्हा सारखं असं वाटतं राहतं की इंजिन तुटून पडतंय की काय.

royal-enfield-2 InMarathi

हे ही वाचा – पेट्रोलचा खर्च कन्ट्रोल करत दुचाकीचे ऍव्हरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स वाचा

इंजिन इतके विचित्र आणि घाबरवून सोडणारे आवाज काढतं की त्यामुळे इंजिन खराब वगैरे झालंय की काय असा विचार मनात येत राहतो.

रॉयल इनफिल्ड बुलेटचा कल्च देखील खूप जड आहे.

 

६) अतिशय वजनदार

रॉयल इनफिल्ड बुलेट ही मेटल पासून बनत असल्याने त्या अतिशय जड असतात. त्यामुळेच लोकांच्या मनात असा समज आहे की लुकडे लोक रॉयल इनफिल्ड बुलेट चालवू शकत नाही.

पण खरंच असं काही नाही, रॉयल इनफिल्ड बुलेट कोणीही चालवू शकतो.

फक्त प्रोब्लेम तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही ट्राफिकमध्ये, गर्दीमध्ये बुलेट चालवता, कारण अश्या वेळेस जर तुम्ही लुकडे असाल तर बाईक लगेच सावरण्याचे कसब तुम्हाला शिकून घ्यावे लागेल.

 

push- royal bullet InMarathi

 

रॉयल इनफिल्ड बुलेट जड असल्याकारणाने ती मेन स्टँडवर लावणे कठीण होऊन बसते.

 

७) गुणवत्तेची कमतरता

गुणवत्तेची कमतरता अश्यासाठी, कारण रॉयल इनफिल्ड बुलेट मेटल पासून बनलेली असल्याने तिच्यावर लवकर गंज चढतो. तसेच रॉयल इनफिल्ड बुलेटवर आंधळा विश्वास ठेवण्यासारखे देखील नाही.

कारण बऱ्याच वेळा किक मारून सुरु करताना खूप प्रयत्न घेऊन देखील ती सुरु होत नाही किंवा मध्येच बंद पडली तर पुन्हा सुरु करण्यासाठी कधी कधी बरीच मेहनत घ्यावी लागते.

 

royal-enfield-3 InMarathi

 

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रॉयल इनफिल्ड बुलेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते. अश्यावेळेस जर तुम्हाला मेकेनिकगिरी येत नसेल तर फारच कठीण आहे बुवा!

 

८) किंमत

मगाशी म्हटलं त्याप्रमाणे रॉयल इनफिल्ड बुलेटची किंमत पूर्वी महाग होती, आता काहीशी स्वस्त झाली आहे. पण तरीही तिची किंमत १ लाखांच्या वर आहे.

 

bullet-inmarathi

 

जर तुम्ही रॉयल इनफिल्ड बुलेट वगळता याच किंमतीमधील इतर बाईक्स पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की रॉयल इनफिल्ड बुलेट पेक्षा त्या बाईक्स एवढ्या किंमतीला घेणे उचित ठरेल.

 

९) आवाज

रॉयल इनफिल्ड बुलेटचा आवाज कसा हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. आवश्यकता नसताना त्या एवढ्या का आवाज करतात हा प्रश्न रॉयल इनफिल्ड बुलेट चालवणाऱ्यां व्यतिरिक्त त्याच्या आजूबाजूस उपस्थित असणाऱ्या सर्वाना पडतो.

बुलेट चालवणारा जरी या आवाजाची मजा घेत असला तरी आजूबाजूच्यांना मात्र बराच त्रास होतो.

(अनेक जण या कारणावर आक्षेप घेण्याची शक्यता आहे, कारण बहुतांश बुलेट लव्हर आवाजासाठीच रॉयल इनफिल्ड बुलेट खरेदी करतात असे कानावर आले आहे.)

 

royalenfield-bullet-marathipizza04

 

 

अनेक जणांनी याबाबतीत कंपनीकडे तक्रार देखील केली आहे.

तर अशी आहेत ही ९ कारणे! आम्हाला माहित आहे की असं काहीतरी लिहून आम्ही रॉयल इनफिल्ड बुलेटच्या डायहार्ट चाहत्यांचा राग ओढवून घेतला आहे.

पण खरंच या बाईकची ‘बदनामी’ वगैरे करण्याचा काहीही हेतू नाही. कदाचित हे मुद्दे तुम्हालाही पटले असतील.

नसतील पटले तर तुमचा राग शांत करण्यासाठी आम्ही रॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करावी?-१० कारणे हा लेख देखील लिहिला आहे.

ज्यामुळे रॉयल इनफिल्ड बुलेट विकत घेणाची इच्छा असणाऱ्यांना दोन्ही बाजू कळतील आणि ते कोणत्याही गोंधळा शिवाय रॉयल इनफिल्ड बुलेट खरेदी करायची कि नाही ते ठरवू शकतील!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?