' "माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स सुद्धा घ्यावेत", वाचा शाहरुख अजून काय म्हणाला होता

“माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स सुद्धा घ्यावेत”, वाचा शाहरुख अजून काय म्हणाला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शाहरुख खान म्हणजे बॉलिवूडचा बादशाह, अनेक चाहत्यांचा अतिशय लाडका हिरो! कुणी त्याला किंग खान म्हणावं, तर कुणी डॉन म्हणून संबोधित करावं… बरं शाहरुखचे चाहते अनेक असतील, तसे त्याचा तिरस्कार करणारेही अनेक आहेत.

त्यामुळेच तो नेहमीच चर्चेत असतो, मग ती चर्चा चांगली-वाईट, विचार करण्यालायक किंवा क्षुल्लक कशीही असो.

 

shahrukh khan inmarathi

मुलगाही असतो चर्चेत…

शाहरुखची तुफान चर्चा रंगते, तर मग त्याच्या मुलाबद्दल गॉसिप्स आणि कट्ट्यावरच्या गप्पा होणार नाहीत, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. मात्र यावेळी शाहरुखचा मुलगा आर्यन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, ते म्हणजे शाहरुखची एक फारच विचित्र इच्छा.

 

shahrukh and aryan inmarathi

 

सहसा आपल्या मुलांनी संस्कारी असावं, चांगलं वागावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. पण शाहरुखने मात्र त्याच्या मुलाला वेगळाच सल्ला दिला होता. त्याने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत अशी इच्छा दस्तरखुद्द शाहरुखनेच व्यक्त केली होती. हे स्वतः शाहरुखने मान्य केलं आहे. तो असं नेमकं का म्हणाला होता? आणि काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात.

मला जमलं नाही पण…

शाहरुखच्या कमाईचा आकडा ऐकला तर आज भलेभले तोंडात बोटं घालतील. वर्षभरात ३०० कोटींहून अधिक माया जमावणाऱ्या शाहरुखला एका गोष्टीची खंत मात्र नक्कीच वाटते. तरुण वयात, ऐन उमेदीच्या काळात, इतर मुलं जशी काही प्रमाणात भरकटतात, चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतात ते शाहरुखला करता आलं नाही.

“मला तारुण्यात ज्या चुकीच्या, अनैतिक गोष्टी करता आल्या नाहीत, त्या माझ्या मुलाने जरूर कराव्यात” असं वाक्य किंग खान शाहरुखने एका मुलाखतीत उच्चारलं आणि सगळेच आश्चर्यचकित झाले.

 

young shahrukh khan inmarathi

त्यावेळी गौरीही सोबत होती…

ही गोष्ट आहे, १९९७ सालची, नुकताच शाहरुखचा मुलगा आर्यन याचा जन्म झाला होता, आणि शाहरुख गौरीसह सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये उपस्थित होता. मुलाविषयी काही प्रश्न विचारल्यावर शाहरुखने दिलेली उत्तरं मात्र सगळ्यांसाठीच अविश्वसनीय होती.

“सोयी-सुविधा नसल्यामुळे ज्या गोष्टी तरुणपणी मला करता आल्या नाहीत, त्या सगळ्या माझ्या मुलाने कराव्या अशी माझी इच्छा आहे.” असं म्हणत शाहरुखने याविषयी बोलायला सुरुवात केली होती. त्याचं म्हणणं असं होतं, की ३-४ वर्षांचा झाल्यावरच आर्यनला काही गोष्टी करण्याची परवानगी असेल.

 

shahrukh with little aryan inmarathi

 

“त्याने खुशाल मुलींच्या मागे फिरावं, ड्रग्स घ्यावेत आणि सेक्स सुद्धा करावा. मला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या आर्यनने लवकर सुरु केल्या तर उत्तम!” असं त्यावेळी शाहरुख म्हणाला होता.

एवढंच म्हणून तो थांबला नाही. तर त्याने आणखी एक विचित्र इच्छा सुद्धा बोलून दाखवली. आर्यन जेव्हा शाहरुखसोबत त्याच्या मित्रमंडळींसह असेल, त्यावेळी त्यांच्या मुलींनी शाहरुखकडे येऊन आर्यनची तक्रार करायला हवी, असंही शाहरुखचं म्हणणं होतं.

आपल्याला जे मिळालं नाही, ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी सगळेच पालक झटत असतात. ही अशी इच्छा व्यक्त करणारा पिता मात्र सगळ्यांना मिळत नाही. अर्थात, वडील असे असणं चांगलं की वाईट, शाहरुखची ही इच्छा योग्य की अयोग्य, हे ज्याचं त्याने ठरवावं. सुज्ञाला अधिक सांगणे न लगे…!!!

 

shahrukh khan inmarathi

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?