' ५६,००० किलोचा अवाढव्य पूल एका रात्रीत गायब? आजपर्यंत गूढ उकलले नाही...

५६,००० किलोचा अवाढव्य पूल एका रात्रीत गायब? आजपर्यंत गूढ उकलले नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘चोरी’ हा शब्द ऐकल्यावर आपण काय काय कल्पना करू शकतो? दागिने, पैसे, मोबाईल, लॅपटॉप, बॅग अशाच वस्तू डोळ्यांसमोर येतात. गाडी, विमान, जहाजसुद्धा चोरीला जाऊ शकतं. हल्ली चोरीचं प्रकरण फारच वाढलंय.

दिवसा-ढवळ्या पण चोर्या होतात, पण आज तुम्हाला एका गंमतशीर चोरीची गोष्ट ऐकायला मिळणार आहे, ज्याची कोणी कल्पनासुद्धा करू शकत नाही. रशियामध्ये एक पूल चोरीला गेलाय म्हणे.

एखादी घटना अगदी शेवटच्या टोकाला गेली की आपण एक म्हण म्हणतो ‘पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय’, पण इथे तर आख्खा पूलच वाहून नाही पण चोरीला गेलाय काय आहे हा प्रकार बघुया. अहो खरंच ही काही चेष्टा नाही. ही घटना घडली आहे रशियामध्ये.

 

stolen bridge 2 inmarathi

रशियाच्या मरमंस्क प्रदेशातील उंब्रा नदीवर एक पूल होता. पण एनडीटीव्हीच्या मते, पण १६ मे रोजी हा पूल अचानक दिसेनासा झाला. तिथल्या स्थानिक लोकांना याचं फार आश्चर्य वाटलं.

बरं हा पूल म्हणजे काही लाकडी हलका-फुलका पूल नव्हता, तर तब्बल ७५ फूट लांब असा मेटलचा हा पूल होता. म्हणजे कोणी उचलून नेण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्याचं वजन तर इतकं जास्त होतं की तुम्ही ते ऐकाल तर हैराण होऊन जाल.

त्या पुलाचं वजन ५६ टन म्हणजेच ५६,०००  किलो होतो. अबब… ५६,००० किलो म्हणजे काय चेष्टा आहे का? आणि असा हा पूल मे महिन्यात अचानक गायब झाल्याची बातमी रशियातील ‘व्हीके’ नावाच्या रशियन सोशल मिडियावर पसरली.

१६  मे रोजी पूल अचानक गायब झाल्याची बातमी सोशल मिडियावर दिसली. आणि त्याचे फोटो दाखवले गेले. तेव्हा दाखविलेल्या प्राथमिक फोटोमध्ये तुटलेल्या पुलाचे काही भाग पाण्यामध्ये दिसले.

 

stolen bridge 3 inmarathi

 

म्हणजे त्या दिवशी ते छोटे भाग तिथे होते, परंतु आश्चर्य म्हणजे दहा दिवसांनी सोशल मिडियावर पुढची चित्रं प्रसारित झाली आणि त्यात या पुलाच्या तुटलेल्या भागाचा लवलेशही नव्हता. म्हणजे थोडक्या वेळातच ते तुकडे गायब झाले होते.

ही एक गूढकथाच म्हणायला हवी. पुलासाठी वापरलेली सामग्री पाण्यात विरघळणारी नक्कीच नव्हती. पण मग ते पुलाचं साहित्य गेलं कुठे? कारण नदीच्या तळाशीही काही कचरा दिसत नव्हता. पाणी स्वच्छ दिसत होतं.

मग असा हा पूल गेला तरी कुठे? मोठाच्या मोठा पूल गायब झाला हे खरोखरच आश्चर्य होतं. मग तपास सुरू झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

रशियातील स्थानिक लोकांना या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटत आहे. एखाद्या गूढकथेप्रमाणे ही घटना आहे. स्थानिक लोकांचा विश्वास आहे की, भूकंप किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती या घटनेस नक्कीच जबाबदार नाही.

मग हा पूल गेला तरी कुठे? तेथील रहिवाश्यांनी अशी कल्पना केली आहे की, हा मेटलचा पूल चोरांनी हळू हळू तुकडे करून पाण्याखाली आणला असावा. मेटल चोरी करण्याचा चोरांचा इरादा असावा.

पोलिसांनी असा कयास केला आहे की, त्यातून मिळणारे मेटल भंगारात विकून त्यातून पैसे मिळवणे हा चोरीचा हेतू असावा, पण ही चोरी कुणी केली आणि कशी केली याचा तपास अजून चालू आहे.

 

stolen bridge 4 inmarathi

 

ही गोष्ट ऐकल्यावर कोकणातील एक सण आठवतो. कोकणात शिमगा या सणाला लोकं वाट्टेल ते चोरतात म्हणजे आता जरा हा प्रकार कमी झालाय, पण पूर्वी फार होता.

होळीच्या आदल्या दिवशी रात्री बंब, बंबफोड, प्लास्टिकच्या बादल्या, जुने कपडे अगदी टमरेलसुद्धा ही लोकं सोडत नसत. त्यामुळे या दिवशी चमच्यापासून मोठ्या बॅरलपर्यंत सगळ्या वस्तू घरात घेण्याची सर्वांची मोठी धांदल उडत असे.

बरं हा सण असा आहे की त्यासाठी चोरी केली म्हणून कुणावर गुन्हाही दाखल करता येत नाही. कारण तो सण कोकणातला मोठा सण मानला जातो. तर सांगायचा मुद्दा हा की वाट्टेल ते चोरलं जायचं तसंच पूल ही काही चोरली जाण्याची गोष्ट आहे का?

उद्या आपण एखाद्या गावाला जायचं म्हणून ठरावीक रस्त्याने जायला लागावं आणि तो रस्ताच गायब झाला तर? गंमतीचा भाग सोडून द्या, पण खरोखरच अतिशय गंभीर गोष्ट आहे ना ही? या जगात काहीही होऊ शकतं.

एखादा पूल गायब झाला तसा उद्या रस्ता पण गायब होऊ शकेल.  आहे ना अचंबित करणारी गोष्ट?

चोरी कशाची करावी ही कल्पना सुद्धा भन्नाट आहे ना? कोणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली असेल? त्याचा हेतू काय असेल? किती लोकं या चोरीत सहभागी असतील कारण हे काम नक्कीच एकट्या-दुकट्या माणसाचं असू शकत नाही.

 

stolen bridge 1 inmarathi

 

हे काम किती दिवसांत केलं असेल? आत्ता तरी असं वाटतंय म्हणजे ‘व्हीके’ नावाच्या रशियन सोशल मिडियावर सांगितलं जातंय की एका रात्रीत हा पूल गायब झाला, पण खरंच असं असेल का? असंख्य प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळण्याची आपण वाट पाहू.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?