' इस्त्राईलच्या या 'मृत समुद्रात' माणूस ठरवून देखील बुडू शकत नाही...

इस्त्राईलच्या या ‘मृत समुद्रात’ माणूस ठरवून देखील बुडू शकत नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील कानाकोपऱ्यात प्राकृतिक सौंदर्याबरोबरच काही आश्चर्यकारक गोष्टी सुद्धा आहेत ज्या त्यांच्या वेगळेपणामुळे जगप्रसिद्ध आहेत.

अशा गोष्टी आपल्याला ऐकल्या तर आपण बुचकळ्यात पडतो.

त्यातलाच एक म्हणजे मृत समुद्र.

काय, आश्चर्य वाटलं ना?

आता तुम्ही म्हणाल की मृत समुद्ध या नावातच गोंधळ आहे.

पण इस्त्राईलमधला एक समुद्न नेमक्या याच नावाने ओळखला जातो.

उकाड्यात समुद्र किनारा आणि पाण्याचा आनंद आपल्याला प्रसन्न करून जातो.

 

madagascar-marathipizza

पण समुद्रात किंवा नदीमध्ये अंघोळ करत असताना आपण पाण्यात बुडायची भीती मनाच्या एका कोपऱ्यात घर करून असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण मृत समुद्र हा असा एक समुद्र आहे ज्यामध्ये कोणी ठरवून देखील बुडू शकत नाही.

 

dead inmarathi

एखाद्या समुद्रावर तुम्ही फिरायला गेले आहात, असा एखादा प्रसंग आठवा.

कुटुंबासह, मित्रांसह समुद्रात मनसोक्त डुंबण्याची इच्छा प्रत्येकलाच होते, मात्र त्याचवेळी घरातल्या वडीलधा-या माणसांंनी समुद्रात न जाण्याचा दिलेला सल्ला आठवतो.

यापुर्वी समुद्रात बुडालेल्यांच्या कथाही नेमक्या याच वेळी आठवतात, आणि आपण चटकन मनातल्या इच्छेवर पाणी सोडतो.

पण एखादा असा समुद्र असेल, की जिथे तुम्ही कधीच बुडणार नाही याची खात्री असेल तर!

मृत समुद्र हा जगातील सर्वांत छोटा आणि कमी क्षेत्रफळावर पसरलेला समुद्र आहे. हा इझ्राएल-जॉर्डन या देशांच्या दरम्यानचा एक नैसर्गिक जलाशय आहे. ‘समुद्र’ या अपसंज्ञेने तो ओळखला जातो.

त्याचा नैर्ऋत्य भाग इझ्राएलमध्ये व इतर भाग जॉर्डनमध्ये येतो.

हा समुद्र ६५ किलोमीटर लांब आणि १८ किलोमीटर रुंद आहे. हा समुद्र १३७५ फूट खोल आहे. मृत समुद्राला पृथ्वीचा सर्वांत खालचा बिंदू मानले जाते.

मृत समुद्राला मुख्यत्वे जॉर्डन नदी आणि इतर छोट्या नद्या येऊन मिळतात. हा जगातील सर्वाधिक क्षारता असलेला (साधारण इतर सागरजलापेक्षा ७ ते १० पटींनी अधिक क्षारता) समुद्र आहे.

भूरचनादृष्ट्या हा समुद्र जॉर्डनच्या भल्या मोठ्या खचदरीचा भाग आहे.

 

dead-see-inmarathi

 

शास्रज्ञांच्या मते तृतीयक कालखंडातील पृथ्वीच्या हालचालींमुळे या समुद्राची निर्मिती झाली असावी, हे याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंस असलेल्या डोंगररांगांच्या तीव्र कड्यांच्या अभ्यासावरून दिसून येते.

बायबलच्या जुन्या करारात खारा समुद्र, पूर्व समुद्र, मैदानी समुद्र, मृत्यूचा समुद्र अशी नावे या समुद्राला दिलेली आढळतात.

अरबांचा समुद्र, अस्फाल्टचा समुद्र ही त्याची इतर नावे आहेत. अरब लोक त्यास नियतीचा सागर म्हणत. येथील कुमरान जवळच्या गुहांमध्ये मृत समुद्र लेख आढळले आहेत.

तसं पाहिलं तर प्रत्येक समुद्राचं पाणी खारटच असतं, पण मृत समुद्राचे पाणी इतर समुद्राच्या तुलनेत ३३% अधिक खारट आहे. ह्या कारणामुळेच या पाण्यात जलचारांचे अस्तित्व देखील आढळत नाही.

 

dead sea inmarathi

 

यात मासे किंवा अन्य जलजीव जिवंत राहू शकत नाहीत. पण हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने अंघोळ केली असता कित्येक आजार, रोग नष्ट होतात.

लवण, पोटॅश व ब्रोमीन एवढीच या समुद्रातून मिळणारी उत्पादने होत.

सामान्य पाण्याच्या तुलनेत मृत समुद्राच्या पाण्यात २० पट जास्त ब्रोमीन, ५० पट जास्त मैग्निशियम, आणि १० पटीने अधिक लवण म्हणजेच आयोडीन असते.

यातील ब्रोमीन धमन्यांना शांत करते, मॅग्नेशियम त्वचेची ऍलर्जी दूर करते आणि आयोडीन कित्येक ग्रंथींची क्रियाशीलता वाढविण्याचे काम करते.

सडोम व गमॉर ही प्राचीन शहरे याच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर होती. विद्यमान सडोम येथे मीठ उत्पादन केले जाते.

Sea-salt-inmarathi

 

या समुद्रात क्षाराचे – मीठाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मृतसागरातील पाण्याचे घनत्व अधिक आहे. त्यामुळे या समुद्रात कोणीही बुडत नाही.

आणि अगदी हीच गोष्ट इथे येणारे पर्यटक खूप एन्जॉय करतात…!

या ठिकाणी पाण्यात राहून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता,

जसे की, वर्तमानपत्र वाचणे, मासिके वाचणे, चहा- कॉफी किंवा ज्युसचा आस्वाद घेणे. या वैशिष्ट्यांमुळे इथले पर्यटन विकसित झाले आहे. हा प्रसिद्ध पिकनिक स्पॉट बनला आहे. समुद्रकिनारी हॉटेल्स बांधली गेली आहेत.

 

 

लोकं इथल्या पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटतात. त्याचबरोबर इथली रेती आपल्या शरीरावर घासतात ज्याने उटण्याप्रमाणे त्वचा चमकते.

या सागराचे पाणी खूप गुणकारी आहे. याच्या उपयुक्ततेच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

असं म्हणतात की क्लिओपात्रा देखील या समुद्रातील पाण्याचा वापर आपले सौंदर्य वाढविण्यासाठी करत असे.

 

dead-see-inmarathi

 

मात्र आता हळूहळू या सागराचे पाणी कमी होऊ लागले आहे. या समुद्राला मिळणाऱ्या जलशयांनी आपला पाण्याचा रस्ता बदलला आहे.

याशिवाय मिनरल इंडस्ट्री सुद्धा यातील पाण्याचा बऱ्याच प्रमाणात वापर करत आहे. शिवाय या पाण्याचा वापर करून कॉस्मेटिक इंडस्ट्रीज सौंदर्यप्रसाधने निर्माण करत आहेत.

हे असेच चालू राहिले तर या समुद्रातील पाणी वारंवार उपसले जाऊन एक दिवस या सागराचे अस्तित्वच संपेल…

तसे होऊ द्यायचे नसेल आजपासूनच काळजी घ्यायला हवी.

“मृत समुद्र” खरंच मृत होणार नाही, ह्याची खबरदारी घ्यायला हवी…! नाही का?!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?