' वैज्ञानिक म्हणतात, “कावळे माणसापेक्षा जास्त स्मार्ट असतात” खरंच का? जाणून घ्या… – InMarathi

वैज्ञानिक म्हणतात, “कावळे माणसापेक्षा जास्त स्मार्ट असतात” खरंच का? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अगदी लहान मुलांना सर्वांत जवळचे पक्षी कोणते वाटतात, तर चिमणी आणि कावळा. छोट्या बाळाला भरवताना सुद्धा आई म्हणते खा रे बाळा, एक घास काऊचा, एक घास चिऊचा. त्यामुळे लहानपणी कावळा हा पक्षी तसा जवळचा वाटू लागतो.

कारण एकतर त्याचं दर्शन सहज होत असतं त्यामुळे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनून जातो हेच आपल्याला समजत नाही.

जसजसं मोठे होतो तसतसं मात्र हा पक्षी आपल्याकडून दुर्लक्षिला जातो, पण तो मात्र आपल्याला सतत त्याची आठवण करून देतो.

कधी खिडकीत बसून ओरडून कावकाव करू लागला की, सहज आपल्या मनात विचार येतो, ‘आता कोण येतंय?’ अशी एक दंतकथा आहे की, कावळा आपल्या घराजवळ ओरडला की, कोणीतरी पाहुणा आपल्या घरी येणार.

 

Crow Inmarathi
eBird

हे कितपत खरं आहे देव जाणे, पण या अशा कथांमुळे कावळा मात्र सतत चर्चेत असतो.

अगदी लहानपणापासून ते आपण मरून गेलो तरी दहाव्या दिवसापर्यंत कावळा आपल्या जीवनात असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत दहाव्या दिवशी कावळा पिंडाला शिवणे हे फार मोठं भाग्याचं समजलं जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

जर कावळा शिवला नाही, तर दर्भाचा कावळा वगैरे केला जातो. काही काही वेळा खूप कावळे जमा झालेले असतात, पण अजिबात ते पिंडाजवळ येत नाहीत, तेव्हा मात्र या गोष्टी या नुसत्या कथा नसून काहीतरी तथ्य यात आहे असे मनाला वाटून जाते.

तर मंडळी मुद्दा हा आहे की, हा कावळा हा पक्षी अतिशय चतुर मनाला जातो. कावळा म्हटलं की चतुर म्हणजेच हुशार असंच आपण म्हणतो.

तर पाहुया हा कावळा माणसाएवढाच हुशार असतो की माणसापेक्षा जास्त हुशार असतो.

 

crow at funerals Inmarathi
दृष्टिकोन

कावळा हा पक्षी अतिशय हुशार असतो हे आपण लहानपणीच इसापनीतीच्या गोष्टीत वाचलेलं आहे. ती कथा थोडक्यात अशी एक तहानलेला कावळा पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतो.

तेवढ्यात त्याला एक मातीचं भांड दिसतं, त्यात पाणी आहे का म्हणून तो बघत असतो, पण ते पाणी तर खोल तळाशी गेलेलं असतं मग तो काही खडे आणून त्या भांड्यात टाकतो. हळूहळू खडे खाली जातात आणि पाणी वर येतं.

या कथेमुळे कावळ्याच्या हुशारीबद्दल आपल्याला कुतूहल असतेच, खरंच  कावळा इतका हुशार असतो का? अगदी कधीकधी मनुष्यापेक्षा सुद्धा जास्त? तर हो! खरंच…  

मानवी मेंदूच्या तुलनेत कावळ्याचा मेंदू लहान वाटू शकतो. तरीसुद्धा सात वर्षांच्या लहान मुलाइतकाच कावळ्याच्या मेंदूचा आकार असतो. पण कावळ्याचा मेंदू हा वानराच्या मेंदू एवढा असतो. वानरसुद्धा अतिशय हुशार मनातले जाते.

 

Crow Story Inmarathi
YouTube

म्हणजे इतर पक्षांच्या तुलनेत किंवा त्याच्या शरीराच्या आकारमानाच्या तुलनेत मोठाच असतो. वॉशिंग्टनच्या एव्हिएशन कन्झर्वेशन लॅब विद्यापीठातील प्रोफेसर र्जान मार्झलफ यांच्या म्हणण्यानुसार कावळा हा मूळत: उडणारा माकड आहे.

मग ते एक चांगलं माकड असो किंवा ‘द विझार्ड ऑफ ऑझ’ मधील प्रियकरासारखे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कावळ्याशी किंवा त्याच्या इतर बांधवांशी कसे वागला असाल त्याप्रमाणे तो तुमच्याशी वागतो. म्हणजे तो तुम्हाला ओळखू शकतो.

तुम्ही एखाद्याला खात्रीने सांगू शकाल का? की हाच तो कावळा रोज माझ्या खिडकीत येतो किंवा रोज मला दिसतो. मी घातलेली भाकरी, पोळी खातो. असं आपण सांगू शकणार नाही, पण कावळा मात्र वैयक्तिक तुम्हाला ओळखू शकतो.

त्याला मानवी चेहर्‍याची बरोबर ओळख असते.

मार्झलफच्या टीमने कावळे पकडले, त्यांना टॅग केले आणि सोडले. टीममधील सदस्यांनी वेगवेगळे मुखवटे घातले. कावळे बरोबर त्या लोकांना ओळखतात, फक्त जर त्या व्यक्तीने मुखवटा घातला असेल तर मात्र ते थोडे गोंधळतात.

तेव्हा सावधान! जर तुम्ही एखाद्या कावळ्याचं नुकसान केलं असेल तर तो येऊन तुम्हाला टोचा मारून जाऊ शकतो.

 

Crow harm Inmarathi
anathema.soulsrpg.com

जर दोन कावळे आपल्याकडे पाहात आहेत आणि एकमेकांकडे पाहून काहीतरी कावकाव करत आहेत तर ते तुमच्याबद्दलच बोलत आहेत हे नक्की. मार्झलफच्या अभ्यासानुसार जे कावळे शास्त्रज्ञांकडून पकडले गेले नव्हते त्यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्ला केला.

म्हणजेच इतर कावळ्यांनी त्यांच्याबद्दल काहीतरी त्यांना सांगितले असावे. कावळ्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे व हल्लेखोरांचे वर्णन कसे केले असेल? कावळ्यांची भाषा आपल्याला कळत नाही, पण कावळ्यांची तीव्रता, लय आणि कालावधी यामुळे संभाव्य भाषेचा त्याला आधार असल्याचे समजते.

कावळ्यांच्या पुढच्या पिढ्याही जर त्यांना तुम्ही त्रास दिला असाल तर त्याचा बदला घेतात. कारण कावळ्यांच्या पुढच्या पिढीनेही ज्यांनी त्यांना पकडले होते त्यांना त्रास दिला.

कावळे सर्व लक्षात ठेवतात. मंडळी, तुम्हाला खोटं वाटेल, पण खरंच आहे हे! यावर विश्‍वास बसण्यासाठी पुढची घटना वाचा. आँटेरिओमधील चथम या भागात सुमारे पन्नास दशलक्ष कावळे त्यांच्या स्थलांतरावेळी या मार्गावरून जाताना चथममध्ये थांबत असत.

त्यामुळे शेतकरी समुदायाच्या पिकांना धोका निर्माण झाला होता. नगरच्या महापौरांनी कावळ्यांना शोधून त्यांना ठार मारण्यासाठी गोळीबार केला. तेव्हापासून कावळ्यांनी चथमला जाणे सोडून दिले.

 

firing at group of Crows Inmarathi
Amon Carter Museum of American Art

या मार्गावरून जाताना ते गोळीबार होऊ नये म्हणून उंचावरून जातात, पण जाताना विष्ठा टाकण्यास मात्र विसरत नाहीत. म्हणजेच ते झालेल्या गोळीबाराचा बदला घेतात. मग कसं काय आपण म्हणून शकू की, कावळा विसरतो किंवा कावळा आपल्यापेक्षा हुशार नाही असे?

कावळे घर बनवण्यासाठी नवीन नवीन साधनांचा वापर करतात. चिमण्या मात्र वर्षानुवर्ष एकच साधन वापरून घर बनवतात. कावळे अगदी हुक बनवण्यासाठी वायरचा पण वापर करतात.

वैज्ञानिकांनी एक चाचणी घेतली हे पाहण्यासाठी की कावळे खरंच इसापनितीतील कथेप्रमाणे हुशार आहेत का हे बघण्यासाठी. त्यांनी एका खोल ट्यूबमध्ये पाण्यात काही खाद्यपदार्थ ठेवले.

जोवर कावळे तिथे पोचतील तोवर तो पदार्थ पाण्यात विरघळला असता, कावळ्यांनी त्या पदार्थाकडे दुर्लक्ष केले. जसे सात वर्षांपर्यंतच्या मुलाला खंड विस्थापन समजते तसे कावळ्यांनी ते समजून घेतले.

माणसाप्रमाणेच पक्षीसुद्धा भविष्याची चिंता करतात. चिमण्या अन्न साठवून ठेवतात, पण कावळे भविष्याची चिंता करत नाहीत तर इतर कावळ्यांचा विचार करतात. जेव्हा एखादा कावळा अन्न मिळवतो, तो आजूबाजूला बघतो.

crows inmarathi

 

जर दुसरा कोणता प्राणी बघत असेल तर तो ते अन्न आपल्या पंखाखाली लपवतो. नंतर तो उडून जातो आणि एखादं ठिकाण शोधतो. एक कावळा दुसर्‍या कावळ्यापासून आपले अन्न लपवत नाही. नवीन फळ शोधण्यासाठी ते एकमेकांचे अनुकरण करतात.

कावळे हे मनुष्याप्रमाणेच वर्तन करतात. झालेल्या बदलानुरूप ते वागतात. आपण जसं वागतो तसे ते वागतात. ट्राफिकची शिस्त, लाइटचे सिग्नल देखील ते पाळतात असे दिसून आले आहे.

रस्त्यावर चालणार्‍या पादचार्‍यापेक्षा ते स्मार्ट असतात, व वाहतुकीचे नियम पाळतात.

रेस्टॉरेंटचे वेळापत्रक आणि वाया गेलेलं अन्न टाकण्याच्या वेळा लक्षात ठेवण्यासाठी ते ओळखले जातात. त्या वेळेचा फायदा ते बरोबर घेतात. कावळा हा पाळीव प्राण्यांपेक्षाही हुशार असतो.

मांजर आणि कुत्रा समस्या सोडवू शकतात, पण ते साधनं वापरू शकत नाहीत.

कावळा साधनं वापरू शकतो. जर तुम्ही पोपट पाळला आहात तर कावळा आणि त्याची बुद्धी समान आहे. बुद्धिमत्ता मोजणं कठीण आहे, पण पोपटाला वाकडी चोच असते त्यामुळे साधनं वापरणं त्यालाही जरा अवघडच आहे.

कुत्रा, मांजर साधनं वापरत नाही, पण आपल्या गरजांसाठी त्याने माणसाला जवळ केलं आहे.

 

Pet animal Inmarathi
PetMD

आधुनिक शास्त्रज्ञांनी ओळखले आहे की, वेगवेगळ्या प्रजातींमध्ये बुद्धिमत्ता लागू करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण या सर्व गोष्टी त्यांच्या मेंदूइतक्याच त्यांच्या शरीरावर आणि वास्तव्यावर अवलंबून असतात.

तरीही मानवी बुद्धिमत्ता मोजण्यासाठी वापरल्या समान मानकांद्वारे असा निष्कर्ष काढला जातोय की कावळे माणसापेक्षा स्मार्ट आहेत.

काही महत्त्वाचे मुद्दे :

* वैज्ञानिक कावळ्यांच्या बुद्धिमत्तेची तुलना सात वर्षांच्या मुलाशी करतात.

* कावळे कोणत्याही प्रकारचे प्राथमिक शिक्षण नसताना साधनं वापरून कोरीव काम करू शकतात.

* कावळे अमूर्त तर्क, गुंतागुंतीच्या समस्येचं निराकरण आणि सांघिक निर्णय घेण्यात सक्षम असतात.

 

crow inmarathi
perky pet

तर मंडळी असं आहे हे काकपुराण.

म्हणजे अजून काही काळानंतर दाराबाहेर लटकलेल्या पिंजर्‍यात कावळा दिसला तर आश्‍चर्य वाटायला नको.

कदाचित तो आलेल्या पाहुण्यांचे ‘या बसा’ असं बोलून पोपटाप्रमाणे स्वागत करणार नाही. पण तुम्ही आल्याची वर्दी मात्र हमखास मालकाला देईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?