' चक्क ‘खरा MJ नाही’ हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे झाली होती ‘DNA टेस्ट’ची मागणी! – InMarathi

चक्क ‘खरा MJ नाही’ हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे झाली होती ‘DNA टेस्ट’ची मागणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

माईकल जॅक्सन म्हणजे डान्सर्सचा देव! ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तसा डान्समध्ये अनेकांचा एकच देव तो म्हणजे मायकल जॅक्सन! काही वर्षांपूर्वी आपण या महान डान्सरला कायमचेच गमावून बसलो. मायकल जॅक्सन पुन्हा होणे नाही, असंच सगळे जण म्हणत होते.

त्याचवेळी ‘तो’ जगासमोर आला होता. एक अशी व्यक्ती प्रकट झाली जी अगदी सेम टू सेम मायकल जॅक्सन सारखी दिसते. मायकल जॅक्सनचे कट्टर चाहते देखील त्याचा फोटो पाहून म्हणतील हा ओरिजिनल माईकल जॅक्सनच आहे.

 

sergio-cortes-marathipizza01

 

या डुप्लीकेट मायकल जॅक्सनचे नाव आहे – Sergio Cortes!

जेव्हा तो रस्त्यांवर फिरायला लागला, तेव्हा लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचा केवळ चेहराच नाही तर त्याची देहबोली, चालण्याची पद्धत, लकब आणि डान्सदेखील अगदी अक्षरश: मायकल जॅक्सन सारखाच आहे.

अर्थात त्याने मायकल जॅक्सनला कॉपी करण्यात बरीच वर्षे मेहनत केली असणार, तेव्हा कुठे आज तो ज्युनियर मायकल जॅक्सन म्हणून जगभर प्रसिद्ध झाला आहे.

ही मेहनत किती फळली याचा पुरावा द्यायचा झाला, तर या तोतया मायकल जॅक्सनकडे चक्क तो खरा MJ नाही हे सिद्ध करण्यासाठी DNA टेस्ट करण्याची मागणी केली गेली आहे.

===

===

त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटचे काही फोटोज आम्ही येथे देत आहोत म्हणजे तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल…!

 

sergio-cortes-marathipizza02

 

तुम्ही वर ज्याचा फोटो पाहिलात तो मायकल जॅक्सन नाहीये बरं… तोच हा sergio cortes! असाच आणखी एक फोटो सुद्धा बघुयात…

 

sergio-cortes-marathipizza03

 

या खालच्या फोटोमध्ये गॉगल लावून रुबाबदार दिसणारा डुप्लिकेट बघायला मिळतोय. त्याच्याकडे बघून कोण म्हणेल, की हा खरा MJ  म्हणून…

 

sergio-cortes-marathipizza04

 

हा एक मिरर सेल्फीसुद्धा बघा की राव… sergio ने खऱ्या खुऱ्या मायकल जॅक्सनचा फोटो असणारा टीशर्ट घालून एक झकास फोटो काढलाय!

 

sergio-cortes-marathipizza05

 

या डुप्लिकेटचा अस्सल मायकल जॅक्सन स्टाईल डान्स पाहण्यासाठी हा व्हिडियो जरूर बघा!

 

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?