' अफगाणिस्तानमध्ये अरबो रुपये खर्च करूनही अमेरिका सपशेल हरण्याची कारणे

अफगाणिस्तानमध्ये अरबो रुपये खर्च करूनही अमेरिका सपशेल हरण्याची कारणे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अमेरिकेच्या सरकारने आपले सैन्य माघारी बोलावले आणि तिकडे तालिबान्यांनी रिक्षा फिरवावी तसं महाकाय हेलिकॉप्टर फिरवले. सोशल मीडियावर आपण गेले काही दिवस अफगाणिस्तानचे फोटो, व्हिडिओ बघत आहोत. अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याने तालिबान्यांच्या हाती आता संपूर्ण देशाची जबाबदारी आहे.

गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात ठाण मांडून बसले होते. पण अचानक सैन्य मागे घेणे हा अमेरिकेचा काहीतरी नवा डाव असणार असा अंदाज अनेक तज्ञांनी लावला आहे.

 

afganistan inmarathi

 

अफगाणिस्तानचा ‘तो’ प्रस्ताव स्वीकारला असता तर भारताचं चित्र वेगळं असतं!

काबुलवर अवघ्या ७२ तासात कब्जा, ही ४ कारणे अख्ख्या जगासाठी महत्वाची!

 

एकीकडे चीनने आधीच कोरोना सारखा साथीचा आजार देऊन साऱ्या जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली होती. मागील वर्षाचा निर्यातीचा अहवाल बघता सर्वात जास्त निर्यात चीनने केली होती. त्यामुळे साहजिकच त्यांची पाऊले आता महासत्तेकडे वळत असल्याने चीन्यांना रोखण्यासाठी अमेरिकेने ही खेळी खेळली असावी अशी चर्चा आहे.

आपले पाय जर पूर्व आशियामध्ये घट्टपणे रोवायचे असतील तर त्यासाठी दोन- दोन ठिकाणी पाय ठेवून चालणार नाही, हे बहुदा अमेरिकेच्या लक्षात आले असावे, तसेच अमेरिकेने तैवानच्या सागरी किनाऱ्याला आता आपले लक्ष केले आहे. जर चीनने अफगाणिस्तानमध्ये लक्ष घातले तर तिकडे तैवान आणि इतर प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित करता येईल, अशी खेळी खेळण्याचा अमेरिकचा डाव असू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.

 

china inmarathi

 

समाजमाध्यमात यावर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत, अगदी भारतापासून ते आंतरराष्ट्रीय मीडियापर्यंत सर्वत्र अशीच चर्चा सुरु आहे की, अरबो रुपये खर्च करून देखील अमेरिका का अपयशी ठरली? यावर कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील एका प्रतिष्ठित प्राध्यपकाने आपले मुद्दे एका चॅनेलमध्ये मांडले आहेत. नेमके काय आहेत ते मुद्दे चला तर जाणून घेऊयात..

जेफ्री सॅच्स असं त्या प्राध्यपकाचं नाव आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत, या संपूर्ण घडलेल्या प्रकाराला केवळ आणि केवळ अमेरिका जबाबदार आहे असं वक्तव्य केले आहे. स्वतः कट्टर अमेरीकन असून देखील असे धाडसी विधान करणे हे आश्चर्यकारक आहे.

 

अमेरिकेने अरबो रुपये नेमके कोणावर खर्च केले?

 

america featured inmarathi

 

देशाच्या तिजोरीमधील पैसा सर्वात जास्त देशाच्या सुरक्षेवर खर्च केला जातो हे आपण ऐकले असेलच, मात्र दुसऱ्या देशात जर आपण मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असलो तर त्यातून आपल्या देशाला देखील फायदा व्हायला हवा. अमेरिकेने हा सर्व पैसा केवळ आपल्या सैन्यावर खर्च केला आहे. आज अफगाणिस्तान सारख्या देशात रस्ते, चांगली हॉस्पिटल्स, बालमृत्यू असे प्रश्न आ वासून उभे असताना त्या प्रश्नांकडे अमेरिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले.

 

सामान्यांनी पाठ फिरवली :

सरकार कुठले ही असो त्याला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हा लागतोच, आपल्या देशात लोकशाही असल्याने सर्व सामान्य नागरिकांचा विचार केला जातो. जम्मू काश्मिरमधल्या स्थानिकांमध्ये आणि आपल्या सैन्यामधील वाद आपण ऐकतच आलो आहोत.

 

afgani inmarathi
pew research center

 

अजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान”

अफगाणिस्तानचे भूतपूर्व मंत्री सय्यद अहमद आता बनले आहेत पिझ्झा डिलिव्हरी बॉय!

 

अफगाणिस्तानात देखील सामान्य जनतेचे आणि अमेरिकन सैन्याचे फारसे सूत जमलेले दिसून आले नाही. अमेरिकन सैन्याबद्दल असलेला जनतेचा राग हे देखील एक कारण असू शकते. अमेरिकन सैन्य देखील सामन्यांचा विश्वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडले.

मिलिटरी राज :

जेव्हा आशिया – आफ्रिकेतील देश हे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होते तेव्हा अमेरिका नवनव्या शोधात व्यस्त होती. अमेरिकेने सर्वप्रथम आपले सैन्यबळ प्रगत केले. अफगाणिस्तानच्या आधी सुद्धा अमेरिकेने व्हिएतनाममध्ये केलेल्या कारवाया, कंबोडियामधील संहार, साऊथ अमेरिकेमधील हस्तक्षेप, आखाती देशातील युद्ध . सिरीयाला संपवण्यासाठी केलेली छुपे कारस्थानी यामूळे तेथिल स्थानिकांच्या मनात अमेरिकेबद्दल असंतोष आहेच.

फॉरेन पॉलिसीत गडबड :

“प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे युद्ध नव्हे हे अमेरिकेला कळायला हवे” असे धाडसी विधान प्रा. जेफ्री सॅच्स यांनी केले आहे, ते पुढे असेही म्हणाले की, “देशाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. कारण फॉरेन पॉलिसी म्हणजे मिलिटरी पॉलिसी नव्हे.

अमेरिकेन लोकांचे दुर्लक्ष :

केवळ अमेरिकन संस्कृती या जगात अस्तित्वात आहे, बाकी कोणतीच संस्कृती आपल्याला माहिती नाही, अशा अविर्भात तिकडची जनता राहत असल्याने, साहजिकच त्यांना इतर जगाबद्दल अज्ञान आहे. भारतासारख्या देशात हत्ती, वाघ रस्त्यावर फिरतात अशा विचारसरणीची काही लोक आजही आहेत.

अमेरिका प्रगतीच्या दिशेने धावत असताना त्यांना जगाच्या इतिहासाबद्दल, भूगोलाबद्दल चांगलाच विसर पडलेला आहे तसेच अमेरिकन नेते देखील जनतेप्रमाणे आत्ममग्न असल्याने त्यांना इतर जगाची माहिती घेण्यात रस नाही.

मुलाखतीमध्ये प्रा सॅच्स स्वतः अमेरिकन असूनही त्यांनी अमेरिकेचे वाभाडे काढले आहेत, वरील मुद्दे त्यांनी प्रकर्षाने मांडले आहेतच त्याचबरोबरीने भ्रष्टाचाराचा मुद्दा देखील जाताजाता सांगितला आहे.

काही वर्षांपूर्वी जगावर राज्य करायला निघालेले ब्रिटिश लोक आज कोरोनामुळे पूर्णतः हतबल झाले आहेत. अमेरिकेने दिसेल त्याला पकडून लसी दिल्या त्यामुळे आता पुन्हा एकदा ते जगाच्या राजकरणात आणि इतर देशांमध्ये ढवळाढवळ करायला सुरवात करतील हे येत्या काही दिवसात कळेलच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?