' गुरुत्वाकर्षणाला ठेंगा दाखवणाऱ्या मायकल जॅक्सनच्या ‘फॉरवर्ड लीन’ चे रहस्य… – InMarathi

गुरुत्वाकर्षणाला ठेंगा दाखवणाऱ्या मायकल जॅक्सनच्या ‘फॉरवर्ड लीन’ चे रहस्य…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

मायकल जॅक्सन ह्या “किंग ऑफ पॉप” बद्दल माहिती नाही असा माणूस सापडणे विरळाच!

एके काळी मायकल जॅक्सनने त्याच्या जगप्रसिद्ध स्टाईलने तरुणांवर जादू केली होती. त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल, त्याचा डान्स ह्या सगळ्यासाठी लोक वेडे होते. चार दशके त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. वयाच्या अकराव्या वर्षापासूनच त्याने गाणे सुरू केले.

त्याच्या पॉप संगीताने जगभरातील लोकांवर मोहिनी घातली होती.

त्याची गाणी जितकी प्रसिद्ध होती तितकेच त्याच्या डान्सच्या स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले होते. त्याच्यासारखा डान्स करणे आजही भल्या भल्यांना जमत नाही. अनेक लोक त्याची कॉपी करू पाहतात पण त्याच्यासारख्या डान्स मुव्ह्ज करणे फार कमी लोकांना जमते.

मायकल जॅक्सनचा मूनवॉक व फॉरवर्ड लीन करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात पण त्याच्यासारखे गुरुत्वाकर्षणाचे नियम मोडीत काढून फॉरवर्ड लीन करणे व मूनवॉक करणे कोणालाही जमले नाही.

मायकल जॅक्सन जमिनीपासून ४५ अंशात फॉरवर्ड लीन करू शकत असे. पण त्याच्या ह्या परफेक्ट स्टेपचे रहस्य काय?

 

 

मायकल जॅक्सनच्या १९८७ साली आलेल्या “स्मूथ क्रिमिनल” ह्या म्युझिक व्हीडीओमध्ये ही स्टेप पहिल्यांदा केली होती.

ही स्टेप करणे अनेक डान्स एक्स्पर्टस ना शक्य नाही. ह्या स्टेपमध्ये मायकल जॅक्सन सरळ उभा राहतो व त्याचे शरीर जमिनीपासून ४५ अंशाच्या कोनात पुढे झुकवतो. ह्याला फॉरवर्ड लीन असे म्हणतात.

मायकल जॅक्सनच्या ह्या स्टेपचा अनेकांनी विचार केला. अनेकांनी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मायकल जॅक्सन असे कसे काय करू शकतो? व हे करताना तो खाली पडत कसा नाही?

अनेकांना वाटले की, त्याने न दिसणाऱ्या वायर्स बांधल्या आहेत.

 

michael jackson 45 degree trick-inmarathi01

ह्याच गोष्टीचे आश्चर्य वाटून काही न्यूरोसर्जन्सने ह्या स्टेपचा अभ्यास केला व असा निष्कर्ष काढला की, मायकल जॅक्सनच्या ह्या जगप्रसिद्ध स्टेपचे रहस्य त्याच्या बुटांमध्ये लपलेले आहे. मायकल जॅक्सन डान्स करताना खास प्रकारचे शूज वापरत असे. त्याच्या शूजमुळे त्याच्या पायांना ताकद मिळत असे.

जर्नल ऑफ न्यूरोसर्जरीमध्ये आपल्या शोधाविषयी मंजुल त्रिपाठी आणि त्यांचे चंदिगढ येथील ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन अँड मेडिकल रिसर्चचे त्यांचे सहकारी लिहीतात की,

“अनेक चांगल्या डान्सर्सचे पाय मजबूत असतात तरीही ते सुद्धा ही स्टेप फक्त २५ ते ३० अंशातच करू शकतात. मायकल जॅक्सनसारखे ४५ अंशापर्यंत पोहोचणे भल्या भल्यांना जमत नाही.”

ज्यांनी ज्यांनी ही स्टेप करण्याचा प्रयत्न केला त्यांना हे लक्षात आले असेल की, ही स्टेप करताना पायच्या मागच्या बाजूस असलेल्या स्नायूंवर ताण येतो परंतु पाठीच्या कण्यावर मात्र तितका ताण येत नाही.

 

michael jackson 45 degree trick-inmarathi

 

मंजुल त्रिपाठी म्हणतात की,

मायकल जॅक्सन प्रमाणे ही स्टेप करू पाहणारे त्याच्यासारखे पुढे वाकू शकत नाहीत, परंतु मायकल जॅक्सन ही स्टेप सहज करू शकत असे. ह्याचे हे कारण आहे की, त्याचे शूज खास ह्या डान्ससाठी तयार करून घेतले होते. त्याच्या बुटांवर ‘व्ही’च्या आकाराचा एक तुकडा/स्लॉट बसवलेला होता.

हा तुकडा जमिनीवर असलेल्या एका खाचेत तंतोतंत फिट होत असे. म्हणूनच तो ४५ अंश कोनात न पडता शरीराचा बॅलन्स कायम ठेवून वाकू शकत असे. ह्या स्टेपचा मायकल जॅक्सनने आधी कमरेला दोऱ्या बांधून खूप सराव केला.

ज्या बुटांमुळे त्याला ही स्टेप करणे शक्य झाले ते बूट अंतराळवीरांच्या बुटांपासून आयडिया घेऊन बनवून घेतले होते.

 

michael jackson 45 degree trick-inmarathi02

 

अंतराळवीरांचे हे खास बूट कुठल्याही पृष्ठभागावर चिकटून बसतात आणि शून्य गुरुत्वाकर्षण असतानाही व्यक्तीला जमिनीवर उभे राहण्यास मदत करतात. परंतु हे बूट घालून सुद्धा ही स्टेप करणे इतके सोपे नाही. त्यासाठी तुमचे पायांचे स्नायू, पाठीचा कणा तसेच कंबरेचे स्नायू मजबूत असणे गरजेचे आहे.

तुमच्या शरीराचे वजन पेलण्यासाठी तसेच बॅलन्स कायम ठेवण्यासाठी तुमचे पाय व पाठीचा कणा तितकाच मजबूत आणि लवचिक असायला हवा. ह्याशिवाय ह्या स्टेपचा भरपूर सराव करणे सुद्धा आवश्यक आहे.

इतके असून सुद्धा काही उत्तम डान्सर्स ही स्टेप करायला गेले आणि तोंडावर आपटल्याचे कबूल करतात.

मायकल जॅक्सनच्या ह्या खास शूजचे त्याच्या व त्याचा डिझायनर डेनिस टॉम्पकिन्सच्या नावे १९९२ साली पेटंट करण्यात आले. त्याचे हे खास शूज नेहमीच त्याची स्टेप परफेक्ट व्हायला मदत करत असत.

पण १९९६ साली मॉस्को येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये ह्या शूजची हिल त्या खाच्यातून निसटली आणि मायकल जॅक्सन पडता पडता वाचला.

हा असा अपघात परत घडू नये म्हणून त्याच्या डिझायनरने शूजवर परत काम केले. त्याचे हे खास शूज सध्या मॉस्को मधील हार्ड रॉक कॅफे मध्ये आहेत. मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर हे शूज लिलावात काढले होते ते हार्ड रॉक कॅफेवाल्यांनी ६,००,००० डॉलर्सना विकत घेतले.

तसेच मायकल जॅक्सनसारखा मून वॉक करणे सुद्धा सोपे नाही. त्याने पहिल्यांदा मूनवॉक “बिली जीन” च्या गाण्यात केला. मूनवॉक करणारा तो पहिलाच डान्सर नाही. त्याच्या आधी अनेकांनी ही स्टेप केली. ही स्टेप मार्सेल मार्कस्यू ह्या फ्रेंच कलाकाराने पहिल्यांदा केली असे म्हणतात.

परंतु मायकलने ही स्टेप जगप्रसिद्ध केली. ज्या सहजतेने तो ग्लाईड करतो ते बघून आपल्यालाही वाटत की ह्या! हे तर सोप्पं आहे.

 

michael jackson 45 degree trick-inmarathi03

 

मोजे घातले आणि गुळगुळीत फरशीवर पाठमोरं ग्लाईड केलं की झालं! आपण हे करायला जातो आणि आपला प्रयोग फसतो. ही स्टेप सुद्धा सोपी नाही. मायकल जॅक्सन ही स्टेप करताना पेनी लोफर्स हे शूज घालायचा जेणे करून ग्लाईड करताना स्टॅटिक फ्रिक्शन कमी होईल आणि त्याला सहज ग्लाईड करता येईल.

सहज ग्लाईड करण्यासाठी फ्रिक्शन कमी करणे आवश्यक आहे. ह्यासाठी एक म्हणजे जमीन गुळगुळीत हवी व तुमच्या शूजचे सोल सुद्धा गुळगुळीत असायला हवे.

मोजे घालून ही स्टेप करणे तुलनेने सोपे जाते. मायकल जॅक्सन जे लोफर्स घालून ही स्टेप करायचा त्या शूजचे सोल हे चामड्याचे होते.

प्लॅस्टिकचे सोल घालून ही स्टेप करायला गेल्यास ही स्टेप नीट करता येत नाही. म्हणजेच मायकल जॅक्सनच्या ह्या दोन स्टेपचे रहस्य त्याच्या शूज मध्ये लपलेले आहे. परंतु नुसते शूज घालून कोणी त्याच्या सारखा डान्स करू शकत नाही. त्यासाठी उत्तम सराव व लवचिक पण मजबूत स्नायू असणे आवश्यक आहे.

मायकल जॅक्सनने त्याच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त गोष्टी केल्या. परंतु डान्सर्स साठी मात्र त्याने चॅलेंज निर्माण करून ठेवले.

त्याच्यासारखे फॉरवर्ड लीन व स्मूथ मूनवॉक करणे डान्सर्सचे स्वप्न असते जे जमणे आजही अवघड आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?