' लिंबू-पाणी प्यायल्याने खरंच एकदम झकास फिट होता येतं? यामागचं तथ्य जाणून घ्या!

लिंबू-पाणी प्यायल्याने खरंच एकदम झकास फिट होता येतं? यामागचं तथ्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आजकाल ‘सेलिब्रिटी’ काही करतात म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणार असा समज समाजात रूढ झालेला दिसतो.

टी. व्ही. वर एखाद्या जाहिरातीत सेलिब्रिटी एखादी वस्तू वापरताना आपण बघतो आणि  तीच वस्तू आपण पण बाजारातून घेऊन येतो व त्या वस्तूचा खप वाढवतो.

 

shraddhhakapoor-veet1-inmarathi
behance.net

 

ती वस्तू त्या आवडत्या सेलिब्रिटीने वापरली असावी तर आपणही वापरून पाहायला काय हरकत आहे म्हणून ती आपण खरेदी करतो. त्या वस्तूचा आपल्याला काय फायदा होणार आहे हा विचार त्यावेळी नसतो. ती वापरल्यावर आपल्याला कळणार असते की ती चांगली आहे का निरुपयोगी?

ती जाहिरात आहे आणि त्या वस्तूचा खप वाढावा म्हणून त्या सेलिब्रिटीला त्यासाठी पैसे देऊन बोलावले आहे हा विचार सहज केला जात नाही.

मग कोणी जर आपल्याला सल्ला दिला की रोज सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास लिंबूपाणी पीत जा, चांगलं असतं. तर ते एवढं काही आपण मनावर घेत नाही आणि घेतलंच मनावर तर ते सतत केलं जाईल ह्याचा भरवसा नसतो.

पण जर एखाद्या सेलिब्रिटीने सांगितले की रोज सकाळी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. तर हे ऐकल्यावर आपोआपच आपण लिंबूपाणी प्यायला सुरुवात करतो.

आता तुम्हालाही कळलेच असेल. असे अनेक सेलिब्रिटी आणि निसर्गोपचार प्रेमी आज आपला दिवस एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याशिवाय सुरूच करत नाहीत. त्यामुळे मिळणारे आरोग्याचे फायदे काय आहेत हे त्यांनी जाणून घेतलं आहे.

खरोखर विश्वास बसणार नाही असे फायदे लिंबूपाणी प्यायल्याने आपल्याला मिळतात.

 

lemonade1-inmarathi
hayatouki.com

 

लिंबू हे रोजच्या जेवणात आपण वापरतोच. पण काही लोकांना ते आंबट असते म्हणून आवडत नाही तर काहीना त्यामुळे शरीराला काय उपयोग होतो हे कदाचित माहिती नसावं. मुख्य म्हणजे लिंबू रसातून आपल्या शरीराला ‘सी’ जीवन सत्व मिळते.

लिंबू म्हणजे डाएट करणाऱ्या लोकांचा मित्र असे आपल्याला म्हणता येईल. कारण रोज लिंबूपाणी सकाळी सकाळी घेतल्याने पोटाचा आकार वाढला असेल तर तो कमी करायला लिंबूपाणी मोलाची मदत करते असे – रजिस्टर्ड डाएटिशिअन ‘एरिन पेलींस्की-वादे’ आपल्या “Bally Fat Diet For Dummies”. ह्या पुस्तकातून सांगते.

‘एरिन’ पुढे हेही सांगते की सकाळी काही खाण्यापूर्वी घेतलेले लिंबूपाणी हे तुमचे वजन वाढू न देण्याचे काम करते.

सकाळी एक लिंबू स्वछ धुवून घेऊन कापून त्याचा रस काढून कोमट अथवा थंड पाण्यातून प्यायल्यास आपला “उत्साह” वाढतो. ताजेतवाने वाटते आणि हा उत्साह दिवसभर आपल्याला कार्यरत ठेवतो, म्हणजेच थकवा जाणवत नाही.

अतिशय महत्वाचे म्हणजे लिंबू पाणी पाण्यामुळे आपल्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पचनशक्ती सुधारते.

 

lemonade-benifits1-inmarathi
reckontalk.com

 

आपल्या पोटामध्ये अॅसिडस् तयार होत असतात त्यातल्या नको असलेल्या ऍसिडमुळे एकप्रकारची भिंत तयार होते आणि अन्नाचे पचन नीट होऊ शकत नाही. लिंबू पाणी ह्या ऍसिडला शरीराबाहेर काढते आणि पचन ठीक व्हायला सुरुवात होते.

सर्दी-पडसे ह्या आजारांपासून आपल्याला सुटका मिळते. सर्दी झाल्यावर होणारा त्रास नाहीसा होतो. कारण रोग प्रतिकारक शक्ति वाढलेली असते. त्यामुळे आजारपण दूर जाते.

ऍसिडमुळे पोटातील अन्न पचन नीट न झाल्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव होतो. पोटात जंतूंमुळे इन्फेक्शन होते आणि आपण आजारी पडतो. लिंबू पाणी रोज पिण्यामुळे इन्फेक्शन होत नाही आणि आपण पोटाच्या तक्रारी मुळे आजारी पडत नाही कारण पचन व्यवस्थित होते.

वय वाढत जाण्याने शरीरात काही बदल होत जातात, ऍसिड निर्मिती कमी होत जाते. साधारण वयाच्या ६० वर्षानंतर आवश्यक असलेल्या अॅसिडची निर्मिती कमी झाली की अन्नपचन चांगले होत नाही आणि गॅसेसचा त्रास होऊ लागतो. साधारणपणे ३०% लोकांना हा त्रास होऊ लागतो.

चलन वलन कमी झाले तर गॅसेस वाढतात. ह्यावर उपाय म्हणून कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास हा त्रास कमी कमी होत जातो.

शरीरातली पाण्याची पातळी कमी न होऊ देणे म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरीरातले पाणी उष्णतेमुळे कमी होते. ते कमी होऊ न देणे म्हणजे भरपूर पाणी पिणे.

पण काहीवेळा नुसते पाणी पिणे लोकांना आवडत नाही कारण पाण्याला वेगळी चव नसते. अशावेळी लिंबू सरबत, लिंबूपाणी प्यायला लोकांना आवडते. त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी योग्य राहते आणि उत्साह ही टिकून राहतो.

 

nimbu-pani1-inmarathi
indianstreetfood.co.in

 

पूर्वी सांगितले जायचे की दिवसातून कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. पण आता नवीन अभ्यासाप्रमाणे सांगितलं जातं की आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या हवामानात राहतो त्याप्रमाणे पाणी पिणे आवश्यक आहे.

उष्ण प्रदेशात जास्त तर थंड प्रदेशात थोडे कमी चालते. पण संशोधनात असे पुढे आले की प्रत्येकाने आपल्या युरिनच्या रंगाप्रमाणे पाणी कमी जास्त प्यावे लागते. युरिनच्या रंग पिवळा किंवा जास्त पिवळा असल्यास जास्त पाण्याची आवश्यकता आहे. पारदर्शक पांढरा रंग असल्यास पाणी पिण्याचे प्रमाण योग्य आहे असे ठरवले जाते.

लिंबू पाणी पिण्यामुळे युरिन साफ आणि योग्य प्रमाणात बाहेर टाकली जाते. त्यामुळे किडनीचे कोणतेही विकार होत नाहीत. मुतखडा होणे अथवा वाढणे हे लिंबूपाणी पिण्यामुळे टाळता येते.

आपल्या शरीराला क जीवन सत्वाची रोजच आवश्यकता असते त्या प्रमाणात ते शरीरात गेले पाहिजे ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे म्हणजेच नियमित लिंबूरस पोटात जायला हवा.

क जीवनसत्व शरीरात योग्य प्रमाणात असेल तर ‘स्कर्वी’सारखे रोग होणार नाहीत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे लिंबूरसाचे सेवन झाले पाहिजे.

साधारण पाव कप लिंबूरसातून २३.६ मिलिग्राम क जीवनसत्व मिळते. आपल्याला रोज ह्यातला तिसरा भाग शरीराला आवशयक असतो. त्याप्रमाणे आपण त्याचे नियमित सेवन करायला हवे.

या लिंबूपाणी पिण्यामुळे आपल्या शरीराची त्वचा नितळ होत जाते. स्किनच्या खालच्या पेशी मजबूत होतात. काही प्रमाणात स्किनच्या सुरकुत्या कमी होतात. कारण स्किन निरोगी होत जाते.

 

Lemon drinks InMarathi

 

म्हणजे एकूणच शरीराला लाभदायक असलेल्या या लिंबाचे इतके फायदे आहेत हे जर निष्णात डॉक्टर सांगत असतील तर कुठल्या सेलिब्रिटीने सांगायची गरज आहे का? फायदा आहे ना? मग कराच सुरुवात आजपासून.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?