' “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!” – InMarathi

“मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या सोशल मीडिया वर एकच प्रकरण चर्चेत आहे ते म्हणजे तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेला वादंग. त्या एका जाहिरातीमुळे संपूर्ण सोशल नेटवर्क तनिष्क आणि टाटा या ब्रॅंडवर तुटून पडले.

ह्या जाहिरातीत एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी लग्नं केलं असून त्या मुलीचा डोहाळे जेवणाचा सोहळा हिंदू परंपरेनुसार पार पाडताना दाखवले गेले आहे.

कित्येकांनी अशा जाहिरातीतून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार अशा माध्यमातून होत आहे असा केला आरोप आहे .

त्यामुळे गांधीधाम ह्या गुजरात मधल्या एका तनिष्कच्या ज्वेलरी शोरूमच्या बाहेर याबद्दल खेद व्यक्त करत एक फलक लावला गेला ज्यात त्यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफीदेखील मागितली आहे! तर हा वादंग पेटल्यानंतर या जाहिरातीचं प्रसारण थांबविण्यात आले आहे.

या जाहिरातीमुळे हिंदू संघटनांचा नेहमीच मांडला जाणारा लव्ह जिहादचा मुद्दा नव्यानं चर्चेत आला आहे.

 

tanishq ad 2 inmarathi

 

प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर कित्येक लोकांनी ही जाहिरात म्हणजे हिंदूंचा अपमान असं जाहीरपणे सोशल मीडिया वर व्यक्त केले.

शिवाय फक्त हीच जाहिरात नाही तर रेड लेबलच्या एका जाहिरातीचा आणि अशा कित्येक जाहिरातींचा संदर्भ देत ही मानसिकता कशी रुजवली जात आहे याचे दाखले सुद्धा दिले!

काही वर्षांपूर्वी केरळमध्ये मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह करुन नंतर तिचे धर्मपरिवर्तन केल्याचे अनेक प्रकार समोर आले.

या प्रकाराला ‘लव्ह जिहाद’ संबोधले जाते. सन २००९ पासून अशा प्रकाराविरुद्ध हिंदू संघटनांनी हिंदू समाजात जागृतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. तेव्हापासून ‘लव्ह जिहाद’ हा विषय चर्चेत आहे.

खरं बघायला गेलं तर हिंदू मुस्लिम विवाह हा काही आपल्याला नवीन नाही. भारतात वैचारिक स्वातंत्र्य जेंव्हापासून आलं तेंव्हापासून हे प्रकार होत असताना आपण पाहिले आहेत.

आपल्या घरात सुद्धा आपण इंटरकास्ट किंवा इंटररिलीजन विवाह पाहिले असतील. सध्याचा काळ हा खूप पुढे गेला असून, ह्या सगळ्या गोष्टी खूप किरकोळ वाटू लागल्या आहेत!

आपल्या देशातल्या कित्येक सेलिब्रिटीजची उदाहरणं घ्या. कित्येकांनी इतर धर्मातल्या पार्टनरसोबत लग्न केले आहे.

करीना कपूर सैफ अली खान हे जोडपं, तर हृतिक रोशन आणि सुझेन खान. अशा कित्येक सेलिब्रिटीजनी अशी लग्नं केली आहेत!

ह्या सिनेविश्वातलं सर्वात फेमस आणि सदैव लाईमलाईट मध्ये असणारं जोडपं म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान!

 

shahrukh gauri inmarathi

 

शाहरुख गौरी यांची लव्हस्टोरी तर शाहरुख सुपरस्टार बनण्याआधीपासूनची आहे हे तर जगजाहिरच आहे.

१९८४ मध्ये हे दोघे एकमेकांना भेटले तेंव्हा शाहरुख हा तुमच्या आमच्यासारखाच सामान्य घरातला मुलगा होता. शाहरुखच्या इंडस्ट्री मधल्या घवघवीत यशानंतर त्या दोघांनी १९९१ मध्ये हिंदू परंपरेनुसार लग्न केलं!

शिवाय इंडस्ट्री मध्ये येऊन सुद्धा शाहरुख ने कधीच त्याच्या प्रोफेशनल लाईफचा परिणाम स्वतःच्या पर्सनल लाईफ वर होऊ दिला नाही.

गौरी आणि शाहरुख ह्यांच्या लग्नात सुद्धा काही अडचणी आल्याच असतील. पण तरी त्या अडचणींचा परिणाम त्यांनी त्यांच्या रिलेशन वर होऊ दिला नाही.

कित्येक मीडिया चॅनल्सच्या क्लिप्स मधून तुम्ही पाहिलं असेल शाहरुखच्या घरात एकदम सेक्युलर वातावरण आहे. आपल्या पत्नीच्या धर्माचा आदर तो करतोच शिवाय दोन्ही धर्मातले संस्कार तो त्याच्या मुलांवर करतो.

 

shahrukh family inmarathi

 

एका पंजाबी फॅमिलीच्या बॅकग्राऊंड मधून आल्याने गौरीला ह्या लग्नानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की तू आता मुसलमान धर्म स्वीकारणार का?

कॉफी विथ करण च्या एपिसोड दरम्यान गौरी ला मुस्लिम घरात लग्न केल्याबद्दल प्रश्न विचारल्यावर गौरी ने सांगितले की –

“दुर्दैवाने शाहरुखचे आई वडील आमच्यात नाहीत, ते जर असते तर चित्र निश्चितच वेगळं असतं. त्यामुळे घरातली स्त्री ह्या नात्याने घरात साजरा होणाऱ्या प्रत्येक सणात आम्ही एकत्रच असतो, मग तो होळी असो, दिवाळी असो का ईद!

प्रत्येक गोष्टीत समतोल असणं अत्यंत गरजेचं आहे. मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते याचा अर्थ असा नाही की मी मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे. आपण स्वतंत्र व्यक्ति आहोत त्यामुळे आपण कोणता धर्म फॉलो करायचा आणि नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे!”

खुद्द शाहरुखला सुद्धा अशा प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे. एका टीव्ही शोच्या स्पेशल एपिसोड मध्ये त्याला जेंव्हा या विषयी विचारलं गेलं तेंव्हा त्याने असं सांगितलं की –

“आमच्या घरात आम्ही धर्माबद्दल जास्त चर्चा करत नाही. माझी बायको हिंदू आहे, मी मुस्लिम आहे आणि माझी मुलं हिंदुस्तान आहेत!”

 

shahrukh gauri inmarathi 2

 

हे वक्तव्य महत्वाचे आहे कारण आज ह्याच पब्लिक फिगर कडे बघून कित्येक लोकं इन्सपायर होतात. त्यांच्या ह्या व्यक्तव्यातून सुद्धा आपण अशा कित्येक गोष्टी सहजपणे समजून घेऊ शकतो!

सध्याच्या तनिष्क जाहिरातीच्या वादावरून एकंदरच सोशल मीडिया वर वेगवेगळे लोकं आपआपले विचार व्यक्त करत आहेत. पण तिथेच अशा सुद्धा जोडप्यांची उदाहरणं आपण नक्कीच बघायला हवीत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?