' गुगल करताना वापरण्याच्या या ८ टिप्स माहित नाहीत? मग तुमचं बरंच नुकसान होतंय… – InMarathi

गुगल करताना वापरण्याच्या या ८ टिप्स माहित नाहीत? मग तुमचं बरंच नुकसान होतंय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज ‘जगातील सगळ्यात भारी गुरु कोण?’, ‘सगळ्यात स्मार्ट मित्र कोण?’, ‘माहिती मिळवण्यासाठी कुणाची मदत अधिक होते?’ असे प्रश्न जर कुणाला विचारले, तर अनेकांचं उत्तर सारखंच असेल आणि ते म्हणजे गुगल बाबा!

गुगल बाबा म्हणजेच आपलं गुगल सर्च इंजिन हे हल्ली आपल्या खूपच उपयोगी पडतं. अगदी एखाद्या साध्या शब्दाचा अर्थ माहित करून घ्यायचा असो, किंवा एखादा रिसर्च पेपर शोधायचा असो गुगलवर हवी ती माहिती मिळाली नाही असं सहसा होत नाही.

 

google chrome for android inmarathi

 

हवी ती माहिती मिळत नसेल, तर स्मार्ट असणाऱ्या गुगलचा वापर करताना तुमचा स्मार्टनेस कमी पडतोय असं म्हणायला हवं.

या टिप्स वापरल्यात तर तुम्हाला हवी ती आणि तेवढ्याच प्रकारची माहिती तुम्हाला सहज  मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात याच स्मार्ट टिप्स…

१. कोटेशन ब्रॅकेट

गुगलवर काहीही सर्च करत असताना काही विशिष्ट शब्द तुम्हाला त्यात हवेच असतील, तर त्या शब्दांना दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच डबल कोट्स वापरा. उदाहरणार्थ, विराट कोहली हा सर्च रिझल्ट तुम्हाला हवाच आहे, तर गुगल सर्च करताना “विराट कोहली” असं सर्च करा.

 

google search inmarathi

 

असं केल्यास या कोटमध्ये जे शब्द आहेत, ते एकत्रपणे असलेलेच सगळे रिझल्ट मिळतील. फक्त विराट हा शब्द किंवा फक्त कोहली हा शब्द असणारे कुठलेही सर्च रिझल्ट्स मिळणार नाहीत.

२. डॅश ( – ) चिन्हाचा योग्य वापर

तुमच्या सर्चमधून एखादा शब्द वगळायचा असेल, तर त्या शब्दाआधी हायफन म्हणजेच डॅश ( – ) चिन्हाचा वापर करा, म्हणजे तो शब्द सर्चमधून वगळला जाईल.

 

hyphen inmarathi

 

३. Tilde सिम्बॉलचा वापर

एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द अपेक्षित असेल, तर त्या शब्दाआधी tlide ( ~ ) या चिन्हाचा वापर करा… उदाहरणार्थ, dance ~classes असं सर्च केल्यास, classes च्या बरोबरीने, lessons, coaching, अशा शब्दांचा सुद्धा त्या सर्चमध्ये समावेश होईल.

 

tilde symbol inmarathi

 

४. site:

या शब्दाचा वापर एखाद्या विशिष्ट साईटवर काही शब्द शोधायचे असतील तर होतो. उदाहरणच द्यायचं झालं, तर समजा ICC च्या साईटवर तुम्हाला भारतीय संघाबद्दल शोधायचं असेल तर, India team site: icc-cricket.com असा सर्च योग्य ठरेल.

 

google inmarathi
searchenginejournal.com

ही ट्रिक सुद्धा नक्की वापरून बघा. एखाद्या विशिष्ट साईटवर हवी ती गोष्ट शोधण्यासाठी ही ट्रिक उत्तम आहे, नाही का?

===

हे ही वाचा – सावधान! गुगलवर या काही गोष्टी सर्च करत असाल तर होतील गंभीर परिणाम

===

५. उभा दांडा (। )

या चिन्हाचा वापर किंवा या शब्दासारखा होऊ शकतो. म्हणजेच, तुम्ही जर rose | lotus असं सर्च केलंत तर, गुलाब किंवा कमळ अशा दोन्ही गोष्टी असणारे सर्चेस तुम्हाला पाहायला मिळतील…

 

vertical bar keyboard inmarathi

 

६. दोन काळांच्या मधील माहिती

समजा तुम्हाला २००१ ते २०२० या काळातील हिंदी गाणी शोधायची असतील, तर hindi songs 2001..2020 असं सर्च करा आणि मग मज्जा बघा.

 

bollywood songs inmarathi

 

७. location:

हे असंच काहीतरी पहिल्यासारखं वाटतंय ना? हे आणि site: हे दोन्ही एकप्रकारे काम करणारे आहेत असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या विशिष्ट ठिकाणाबद्दलची त्या व्यक्तीची माहिती हवी असेल, तर हे शोधणं सोपं जाईल.

उदाहरण द्यायचं तर, विराट location: मुंबई असं सर्च करून बघा की राव…

 

virat location mumbai inmarathi

८. filetype:

एखाद्या विशिष्ट फाईल टाईपबद्दल काही शोधायचं असेल, तर ही ट्रेक उपयोगी ठरेल. म्हणजेच, olympics filetype: pdf असं सर्च केलंत, तर ऑलिम्पिकबद्दलच्या सगळ्या पीडीएफ्स तुम्हाला सर्चमध्ये दिसतील.

 

olympics inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?