' जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय?

जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज सरकारी अधिकाऱ्यांच्या, पोलिसांच्या तडफडकी बदली करणं हे आता नित्यनियमाचं झालं आहे, अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली, त्यानंतर सुरु झालेलं आरोप प्रत्यारोपाचे राजकरण आजही सुरु आहे.

परमबीर सिंग यांच्या जागी आलेले हेमंत नगराळे, हे वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. मुंबईत लॉकडाऊन असताना देखील लोकं कारणास्तव हिंडत होते म्हणून गाडीच्या काचांवर रंगीत पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या त्या त्या रंगानुसार त्या गाडीची आवश्यकता कळायला हवी यासाठी अशी उपाययोजना सुरु केली होती.

 

vaze parambir inmarathi

 

कालपासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड चर्चेत आले आहेत, अमिताभ यांच्या बॉडीगार्डच्या पगारवरून तर समाजमाध्यमात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. अमिताभ यांच्या बॉडीगार्डचा पगार तब्बल १२ लाख रुपये आहे, हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पगारावरून ते चर्चेत तर आलेच मात्र एक नव्या वादात ते अडकले आहेत..नेमका काय आहे वाद चला जाणून घेऊयात

कोण आहेत जिंतेद्र शिंदे?

अमिताभ बच्चन हे आज खुलेआम फिरू शकतात ते त्यांच्या बॉडीगार्डमुळे, चाहत्यांच्या गराड्यातून त्यांना सहीसलामत नेण्याचे अवघड काम त्याचे बॉडीगार्ड करत असतात. जिंतेद्र शिंदे हे बच्चनजींसोबत सावलीप्रमाणे असतात.

 

amitabh final inmarathi

 

जिंतेद्र शिंदे हे एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत जे २०१५ पासून बच्चनजींना सुरक्षा देत आहेत. देशातील बड्या मंडळींना अगदी नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, सगळ्यांना सरकारकडून त्या त्या व्यक्तीच्या दर्जेनुसार त्यांना सुरक्षा दिली जाते. बच्चनजींना एक्स दर्जाची सुरक्षा दिली जात असल्याने त्यांच्या सोबत कायमच दोन कॉन्स्टेबल दिले जातात.

नेमका वाद काय? 

सरकारी खात्यात काही अधिकाऱ्यांची दर पाच वर्षांनी बदली होती त्याच पद्धतीने पोलिसी खात्यात सुद्धा बदल्या होत असतात. जितेंद्र शिंदे हे पाच वर्षाहून अधिक वेळ बच्चनजींसोबत असल्याने त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

 

hemant inmarathi 2

 

वाद इथपर्यंतच नाही तर शिंदे यांच्या पत्नीच्या नावाने एक सिक्युरिटी एजन्सी चालवतात. जी एजेन्सी सेलिब्रेटी लोकांना सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करते. शिंदे यांची बदली तर केली आहेच त्याचबरोबरीने आता त्यांच्या अतिरिक्त कमाईवरून त्यांना चौकशीला देखील सामोरे जावे लागणार आहे.

बदलीवरून दबाव?

बच्चनजींचे सर्वात विश्वासू बॉडीगार्ड म्हणून ओळख असलेल्या शिंदेंची बदली होऊ नये म्हणून पोलीस खात्यावर दबाव टाकला जात आहे, अशीदेखील चर्चा होत आहे.

 

amitabh bachchan InMarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय?

 • August 27, 2021 at 9:53 pm
  Permalink

  no comenys

  Reply
 • August 27, 2021 at 9:53 pm
  Permalink

  no coment

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?