' “बघा आली मद्रासीन”, साडीमुळे माझी खिल्ली उडवली जायची! हेमाजींनी सांगितलं… – InMarathi

“बघा आली मद्रासीन”, साडीमुळे माझी खिल्ली उडवली जायची! हेमाजींनी सांगितलं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारत म्हणजे विविधतेत एकता, असं म्हटलं जातं हे आपल्यासाठी नवीन नाही. भारतातील ही विविधता संस्कृतीच्या बाबतीत आहे, पर्यायाने पेहराव सुद्धा निराळा असणं साहजिक आहे.

हल्लीच्या काळात, शर्ट-पॅन्ट, पंजाबी ड्रेस, जीन्स टीशर्ट असे पेहराव अगदी सर्रासपणे वापरले जात असले, तरीही काहींना अजूनही त्यांचे खास पेहराव परिधान करण्याची हौस असते.

 

bollywood actors inmarathi

 

या टिपिकल कपड्यांवरून इतरांकडून थट्टामस्करी सुद्धा केली जात असते, तीदेखील अगदी सामन्यांची सुद्धा! मग असा खास आपल्या संस्कृतीचा पेहराव एखाद्या सेलिब्रिटीने केला तर काय होईल?

हिंदी सिनेविश्वातील उत्तम कलाकार असणाऱ्या हेमा मालिनी यांनी असाच एक अनुभव मध्यंतरी सांगितला होता. कांजीवरम साडी नेसून येणाऱ्या हेमाजींना “वह देखो, मद्रासन आगयी” असं म्हणून हिणवलं जात असे.

 

hema malini kanjivaram inmarathi

 

कांजीवरम साडीची आवड

बऱ्याचशा सोहळ्यांना त्या कांजीवरम साधी नेसूनच हजेरी लावत असत. त्यांना इतर प्रकारचे कपडे परिधान करण्यापेक्षा कांजीवरम साड्या नेसणं अधिक पसंत असल्याने, त्याच पोषाखात सोहळ्यांना उपस्थिती लावणं त्यांना अधिक आवडत असे.

त्यांच्या पोषाखावरून मात्र त्यांना अनेकदा चिडवलं आणि हिणवलं गेलं असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. निर्मात्यांच्या पत्नी त्यांच्या पेहरावावरून त्यांची नेहमीच खिल्ली उडवत असत. यातील बऱ्याचशा बायका या पंजाबी होत्या आणि त्या हेमा यांचा मद्रासन असाच उल्लेख करत असत, असंही हेमामालिनी यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

 

hema malini inmarathi

 

आईच्या प्रेमाखातर

हेमामालिनी यांनी कांजीवरम साडी नेसण्यामागे त्यांच्या आईची इच्छा हे महत्त्वाचं कारण होतं. काहीवेळा कांजीवरम नेसायची नाही, म्हणून त्यांनी आई जया चक्रवर्थी यांचा विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र शेवटी आईची इच्छाच वरचढ ठरली. आईच्या प्रेमाखातर मग हेमामालिनी यांनी नेहमीच कांजीवरम साड्या आणि उंची ब्लाउज परिधान करणं सुरूच ठेवलं.

 

hema malini and her mother inmarathi

 

शेवटी हाच त्यांची खिल्ली उडवण्याचा विषय होऊन गेला. असं असूनही, त्यांनी आईची इच्छा मात्र त्या पूर्ण करत होत्या.

आज मी जे काही आहे ते…

हेमामालिनी या त्यांच्या यशाचं श्रेय त्यांची आई जया चक्रवर्थी यांनाच देतात. शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी आईने खूप मदत केली. त्या मागे लागल्या म्हणूनच हेमामालिनी ही चांगली नृत्यांगना घडली, असं स्वतः हेमाजी अनेकदा सांगतात.

“आजचं यश हे आईमुळेच मिळालं आहे, माझ्या जडणघडणीत तिचा फार मोठा वाटा आहे. आजही अनेकदा ती मला मार्गदर्शन करत आहे, असा भास मला होतो.” अशा भावना सुद्धा हेमामालिनी यांनी अनेकदा व्यक्त केल्या आहेत.

 

hema malini inmarathi

 

मद्रासन म्हणून त्यांना कितीही हिणवलं गेलं असलं, तरीही कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ नये, याची पुरेशी काळजी हेमाजींनी घेतली, हे त्यांच्याकडे पाहिलं की दिसून येतं. त्यांनी त्यांच्या कामातूनच या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?