' गाढवापुढे वाचली..., ढवळ्या शेजारी बांधला...अशा धमाल म्हणींचा फोटो अल्बम बघाच

गाढवापुढे वाचली…, ढवळ्या शेजारी बांधला…अशा धमाल म्हणींचा फोटो अल्बम बघाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मराठी भाषा किती समृद्ध आहे हे पटवणारी असंख्य उदाहरणं देता येतील. मग मराठी भाषेतील व्याकरणाचे नियम असो वा रसाळ काव्य असो…

त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे मराठी ‘म्हणी’! कधी समोरच्याला कोपरखळी मारणारी तर कधी हसवता हसवता चिमटे काढणारी तर काहीवेळा समोरच्याचं तोंडभरून कौतुक करणारी म्हण कधी कोणता अर्थ घेऊन आपल्यासमोर दाखल होते हे सांगता येत नाही.

“खायला खार अन् भुईला भार” म्हणताना समोरचा आपलं कौतुक करतोय की चेष्टा? “नाचता येईना अंगण वाकडं” म्हणताना नेमकी कुणाला कोपरखळी मारली जातीय? “हातच्या कंकणाला आरसा कशाला” म्हणताना नेमकं कुणाचं कौतुक होतंय? या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर मराठी म्हणींचे योग्य अर्थ प्रत्येकाला ठाऊक असायलात हवेत.

शुद्ध, ओघवती भाषा बोलताा यावी, आपल्या संभाषण कौशल्याने इतरांवर छाप पाडता यावी असं वाटत असेल तर मग लिखाणात, भाषणात एखाद्या म्हणीचा वापर हा झालाच पाहिजे. मात्र हा वापर करायचा असेल तर त्यासाठी म्हणींचे अर्थही नीट समजून घेतले पाहिजेत.

थांबा, यासाठी मराठी व्याकरण आणि म्हणींची जड पुस्तक चाळण्यात वेळ दडवण्यापेक्षा अवघ्या काही सेकंदात अनेक म्हणींच्याया रंगीत खजिन्यात डोकवायला काय हरकत आहे?

 

mhan inmarathi

 

म्हणींचा हा गोडवा जितका अविट आहे तितकाच त्याचा ठसकाही भारी आहे हे विसरू नका!

१.

 

mhan 2 inmarathi

 

ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. तुमची भावंडं किंवा एखाद्या मित्रावरून तुम्हाला आईने मारलेला हा टोमणा आठवतोय का? हा टोमणा तुम्हालाही ऐकवला गेला असेल तर तुमची संगत वेळीच तपासा.

२.

 

mhan 3 inmarathi

 

थोडीशी विनोदी वाटणारी ही म्हण ‘शालजोडीतील मारण्यासाठी’ अतिशय प्रभावी आहे. मात्र त्याचा अर्थ नीट जाणून घ्या आणि मगच तिचा वापर करा.

३.

 

mhan 4

 

या म्हणीच्या अर्थाला चपखल बसणा-यांची संख्या काही कमी नाही. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अनेकदा हा अनुभव आला असेल. केवळ मदतीसाठी तुमच्यासाठी गोड बोलणारे आणि काम संपताच पाठ दाखवणा-यांना कधीतरी ही म्हण ऐकवून दाखवाच.

४.

 

mhan 5 inmarathi

 

अनेकदा मित्राच्या किंवा लहान भावंडांच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागते मात्र त्यावेळी पालकांच्या भितीने आपण निरपराध असल्याचं सांगताही येत नाही अशावेळी तोंड दाबून बुक्क्यांचा जोरदार मार सहन करावा लागत असल्याची म्हण तुम्ही वापरली असेल.

तुमच्याबाबत असे कोणते प्रसंग घडले आहेत?

५.

mhan 6 inmarathi

 

अनेकांकडून या म्हणीचा चुकीचा वापर केला जातो. अहोरात्र मेहनत करूनही जेंव्हा मनाजोगते यश मिळत नाही, किंवा अत्यल्प यशावर समाधान मानावे लागलं किंवा एखाद्या गोष्टीचा प्रचंड शोध घेतल्यानंतर त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही तर डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचं दुःख होतं ना?

६.

 

mhan 7 inmarathi

 

आवळा आणि कोहळ्याचं हे खुसखुशीत नातं मराठी म्हणीतून रेखाटलंय. लहानश्या आवळ्याच्या बदल्यात भलामोठा कोहळा काढणं म्हणजेच स्वतःचा अतिरिक्त फायदा करून घेणं.

७.

 

mhan 8 inmarathi

 

नावडतं कारलं खाऊ घालण्यासाठी, त्याचा कडूपणा घालवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते निष्पळ ठरतात कारण कारलं आपला मुळ गुणधर्म कधीही सोडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील काही माणसं देखील आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नाहीत.

कडवट स्वभावाच्या माणसासाठी ही म्हण वापरली जाते. तुम्ही ही म्हण कुणासाठी वापराल?

८.

 

mhan 9 inmarathi

 

एखादी चूक केल्यानंतर लहान भावंडं जसं चूक पकडली जात नाही ना? याची सारखी शंका येते किंवा याचा शोध घेतला जातो तेंव्हा तुम्हीही म्हणत असाल, “चोराच्या मनात चांदणं”.

त्यामुळे भरदिवसा तारे चमकू नयेत असं वाटत असेल तर कोणतीही चूक करण्याआधी सावध व्हा.

९.

 

mhan 10 inmarathi

 

योगायोग ही अटळ बाब आहे. कधी चांगले तर कधी वाईट योगायोग घडतात. मात्र ध्यानीमनी नसताना दोन गोष्ट योगायोगाने एकत्र घडल्या की कावळा आणि फांदी यांची कथा आठवल्याशिवाय रहात नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?