'क्रांतिकारी की कट्टर धर्मांध, अहंकारी शासक? म्हैसूरचा राजा – टिपू सुलतान!

क्रांतिकारी की कट्टर धर्मांध, अहंकारी शासक? म्हैसूरचा राजा – टिपू सुलतान!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

टिपू सुलतान म्हणजेच ‘सय्यद वलशरीफ सुलतान फतेह अली साहब टिपू’ हा म्हैसूर राज्याचा राजा होता. त्याला लोक म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखत असत.

अनेक लोक त्याला टिपू साहब सुद्धा म्हणत असत. त्याने इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध क्रांतिकारी लढा दिला.

इंग्रजांना दक्षिणेत सत्ता स्थापन करण्यासाठी त्याने कडवा विरोध करून तीव्र लढा दिला.

अतिशय पराक्रमी व शूर अशा ह्या राजाचा जन्म १० नोव्हेंबर १७५० रोजी देवानाहल्ली येथे झाला. त्याचे वडील सुलतान हैदर अली हे म्हैसूर राज्याचे सेनापती होते. त्याच्या आईचे नाव फक्र-उन-निसा होते.

सर्व भावंडात तो सर्वात थोरला होता. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या सामर्थ्यावर १७६१ साली म्हैसूर राज्याचा ताबा मिळवला.

एक पराक्रमी आणि शूर शासक असण्यासोबतच टिपू सुलतान हा एक विद्वान व कुशल सेनापती तर होताच शिवाय तो एक उत्तम कवी सुद्धा होता.

 

tipu-sultan-marathipizza
ultans.tipusultanshaheed.com

 

१८ व्या शतकाच्या शेवटी हैदर अली ह्यांचे निधन झाले व टिपू सुलतान म्हैसूर राज्याच्या गादीवर आला.

टिपू सुलतानच्या राज्यकारभार हातात घेण्याने इंग्रजांच्या साम्राज्यवादी नीतीवर मोठा आघात झाला. कारण एका बाजूने इंग्रज भारतावर सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत होते. तेव्हा दुसऱ्या बाजूला टिपू सुलतान इंग्रजांना भारताबाहेर घालवण्याचा प्रयत्न करीत होता.

१७८२ साली टिपू सुलतानने म्हैसूर राज्याचा राज्यकारभार सांभाळण्यास सुरुवात केली.

त्याने आपल्या पराक्रमाच्या व कूटनीतीच्या जोरावर इंग्रजांना दक्षिणेत सत्ता काबीज करण्यापासून रोखले. त्याने आपले राज्य इंग्रजांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

त्याने सत्तेवर येण्या आधीच युद्धविद्या व सैनिकी शिक्षण ह्याचे ज्ञान मिळवले. त्याला अनेक भाषांचे ज्ञान होते असे म्हणतात.

इंग्रज टिपू सुलतान ह्याला एक हुकुमशहा मानतात. तो एक कट्टर व धर्मांध शासक होता असे त्यांचे म्हणणे आहे.

काही लोक असेही म्हणतात कि त्याने त्याच्या राज्यात हिंदुंवर अनेक अत्याचार केले व त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले. तर काही इतिहासकार टिपू सुलतानला क्रांतिकारक म्हणतात.

त्याचे खरे नाव फथ अली असे ठेवले होते. पण त्याने स्वतःचे नाव फकीर टिपू मस्तान अवलिया ह्यांच्या नावावरून टिपू’ असे ठेवले.

टिपू सुलतानचे वर्णन लहान उंची, मोठ्या मोठ्या भारदस्त मिश्या आणि धारदार नाक व भेदक नजर असे अनेक पुस्तकांत केले आढळते.

तो एक मुसलमान शासक असला तरी त्याच्या राज्यात हिंदूंची संख्या अधिक होती. त्याच्या वडिलांनी म्हैसूरचे राज्य एका हिंदू शासकाला नमवून काबीज केले होते.

आज आपण टिपू सुलतान बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या फारशा कोणाला माहित नाहीत.

१. टिपू सुलतान ह्याला वाघ विशेष प्रिय होते.

त्याच्या श्रीरंगपट्टनम येथील महालात त्याने ६ वाघ पाळले होते. त्याने त्याचे सिंहासन सुद्धा वाघाच्या आकाराचेच बनवून घेतले होते व सिंहासनाचे डिझाईन सुद्धा वाघाच्या शरीरासारखे होते.

त्याच्या सैन्यातील सर्वात शूर व पराक्रमी सैनिक सुद्धा वाघाचे चिन्ह असलेले बाजूबंद घालीत असतं.

इतकेच नव्हे तर त्याच्या लहानपणी एक वाघ एका इंग्रजाची मान पिरगळतो आहे, असे दृश्य असलेले हे त्याचे आवडते खेळणे होते.

 

Tipu-Sultan-inmarathi
madrascourier.com

 

टिपू सुलतान च्या तलवारीच्या मुठीवर सुद्धा एका डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे चित्र होते.

टिपू सुलतान नंतर हि तलवार अनेक वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होती. पण नंतर हि तलवार एका लिलावात मद्यसम्राट विजय मल्याने विकत घेतली. आज हि तलवार त्याच्या संग्रही आहे.

२. भारतात रॉकेटची टेक्नोलॉजी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय टिपू सुलतान कडे जाते.

आज भारताने अवकाशात एकाच वेळी अनेक उपग्रह सोडून एक रेकॉर्ड केला आहे.

१५ फेब्रुवारी २०१७ साली एकाच सिंगल रॉकेट मधून १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विक्रम भारतीय अवकाश संशोधन केंद्राने केला आहे. ह्या आधी मिशन मंगळयान सुद्धा यशस्वी करून दाखवले आहे.

 

Tipu-Sultan-inmarathi01
darulumoor.org

 

पण भारतात रॉकेटची टेक्नोलॉजी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय टिपू सुलतान कडे जाते.

त्याच्या तलवारीतून तलवारी निघत असत. त्याचीच टेक्नोलॉजी वापरून फ्रान्स चा लोकांनी पहिले रॉकेट बनवले होते.

३. टिपू सुलतान एक कट्टर मुसलमान राजा होता. (याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत.)

त्याने अनेक हिंदू व ख्रिस्ती लोकांचे जबरीने धर्मांतर केले होते. त्यासाठी त्याने त्यांच्यावर अनेक अत्याचार सुद्धा केले होते असे म्हणतात.

ज्यांनी ज्यांनी धर्मांतर करण्यास विरोध केला त्यांना टिपू सुलतानने ठार करवले होते.

 

Tipu-Sultan-inmarathi02
thestatesman.com

 

त्याने इंग्रजांपासून त्याचे राज्य वाचवले असले तरी त्याने अनेक मंदिरे व चर्च नष्ट केले. त्याने अनेक वर्ष दक्षिण भारताला इंग्रजांची सत्ता येण्यापासून वाचवले आणि त्याचे नाव ‘टिप्पू साहब’ असे पडले.

४. नेपोलियन बोनापार्ट व टिपू सुलतान ह्यांनी युती केली होती.

कारण दोघांचाही शत्रू एकच होता, तो म्हणजे इंग्रज!

भारतीय लोक जगात शूर म्हणून गणले जात असत म्हणूनच सिकंदर पासून ते नेपोलियन पर्यंत सर्व लोक भारतीयांना पराक्रमी मानत असत.

 

Tipu-Sultan-inmarathi03
debretagneensaintonge.eklablog.fr

 

नेपोलियनला भारतीय राजांशी मैत्री कायम ठेवायची होती. पण इंग्रजांविरुद्ध टिपू सुलतान व नेपोलियन हे दोघेही जिंकू शकले नाहीत.

५. टिपू सुलतान एक कट्टर मुसलमान शासक असला तरी त्याचे भविष्य जाणण्यासाठी तो हिंदू ज्योतिष्यांकडे जात असे.

तो अतिशय अंधविश्वासू होता. तसेच तो अतिशय हट्टी, हेकेखोर व अहंकारी होता असेही म्हटले जाते. त्याने त्याच्या दरबारात वेळोवेळी भविष्य जाणून घेण्यासाठी काही ज्योतिष्यांची नियुक्ती केली होती.

 

tipu-sultan-marathipizza02
indiatimes.com

 

६. टिपू सुलतानला पुस्तक वाचण्याची भयंकर आवड होती

जसे वेगवेगळ्या तलवारींचे वेड होते, तसेच त्याला पुस्तक वाचण्याची सुद्धा आवड होती. अनेक पुस्तके त्याच्या संग्रहात होती. त्याचे स्वतःचे एक ग्रंथालय होते.

 

tipu-sultan-inmarathi

 

त्याचे ग्रंथालय भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय होते. त्याच्या नंतर त्याची बरीच पुस्तके इंग्रज त्यांच्याबरोबर घेऊन गेले.

७. टिपू सुलतानला शाही थाट पसंत नव्हता

इतर शासकांसारखी सोने, हिरे, जड जवाहिऱ्यांची विशेष आवड नव्हती. तसेच इतर शासकांसारखे त्याला शाही हमामात अंघोळ करणे पसंत नव्हते.

इतर राजांसारखा त्याला अंघोळीचाही सोहळा करणे आवडत नव्हते.

८. टिपू सुलतानला बागकामाची व झाडांची खूप आवड होती.

लालबाग येथे त्याने एक मोठी बाग वसवली होती. आज आपण त्या बागेला बोटेनिकल गार्डन म्हणून ओळखतो.

 

Tipu-Sultan-inmarathi04
holidify.com

 

असा हा टिपू सुलतान अतिशय पराक्रमी व शूर राजा होता. त्याने त्याच्या काळात अनेक नवीन गोष्टी सुरु केल्या.

युद्धात रॉकेटचा वापर केला. त्याने नवीन पंचांग (दिनदर्शिका, कॅलेंडर) सुरु केले. तसेच नवीन नाणी चलनात आणली. त्याच्या शासनात सात नवीन सरकारी विभाग सुरु केले. त्याची नौसेना सुद्धा अतिशय शक्तिशाली होती.

असा हा टिपू सुलतान ४ मे १७९९ साली इंग्रजांविरुद्ध झालेल्या लढाईत श्रीरंगपट्टण येथे मारला गेला.

अनेक लोक त्याचे क्रांतिकारक व पराक्रमी राजा म्हणून वर्णन करतात, तर अनेक लोक त्याला धर्मांध, क्रूर व अहंकारी शासक मानतात.

काहीही असले तरी तो त्याच्या काळातील एक बलाढ्य व पराक्रमी शासक होता ह्यात शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?