' शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता ते कोंबडी चोर - राणेंच्या या नावामागचा खास इतिहास!

शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता ते कोंबडी चोर – राणेंच्या या नावामागचा खास इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही दिवसात कट्ट्यांपासून ते घरातल्या चर्चांपर्यंत आणि शिळोप्याच्या गप्पांपासून ते ऑफिसमधील गॉसिप्सपर्यंत, कुठेही राजकारण हा विषय एका नावाशिवाय संपत नाहीये. ते नाव म्हणजे नारायण राणे!

 

narayan rane 1 inmarathi

 

भाजपच्या या केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना काही चुकीचे शब्द उच्चारले आणि मग अटक नाट्य, कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि गलिच्छ राजकारण या सगळ्यांना उधाण आलं. यात नेहमीप्रमाणेच बॅनरबाजीलाही ऊत आला, आणि एका रात्रीत दिसू लागलेल्या एका बॅनरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो आणि त्याच्या बाजूला लिहिलेले केवळ दोन शब्द, ‘कोंबडी चोर’… या बॅनरने सगळीकडेच धुमाकूळ घालून द्यायला सुरुवात केली.

 

narayan rane kombdi chor banner inmarathi

 

सोशल मीडियापासून ते चहाच्या टपऱ्यांपर्यंत ‘कोंबडी चोर’ या शब्दाचा उल्लेख बोलण्यामध्ये येऊ लागला. कुणी समर्थकांनी या शब्दावर आक्षेप घेतला, तर विरोधकांनी त्याचा वापर राणेंना हिणवण्यासाठी करायला सुरुवात केली. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज त्याबद्दलच माहिती घेऊयात.

नारायण राणे यांना कोंबडी चोर हे नाव मिळण्यामागे दोन वेगवेगळ्या ऐकीव गोष्टी चर्चेत आहेत. यात त्यांचा थेट कोंबडी चोरण्याशी असलेला संबंध आणि त्यांचं कोकणी असणं या दोन गोष्टी सांगितल्या जातात.

 

narayan rane inmarathi

===

हे ही वाचा – राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय…

===

मित्रासोबत खरंच चोरल्या आहेत कोंबड्या

नारायण राणे आणि त्यांचे मित्र हनुमंत परब हे चेंबूर परिसरात असलेला त्यांचा दारारा आणि भाईगिरी या गोष्टींसाठी ओळखले जातात. तरुण वयात ते गुंड होते, असं आजही म्हटलं जातं. याला अनेकांकडून दुजोरा देण्यात येतो.

 

naryan rane inmarathi 1

 

याच वयात त्यांनी मित्रांच्यासोबतीने खरोखरंच कोंबड्यांची चोरी केली असल्याचं म्हटलं जातं. या कोंबडी चोरीत ते पकडले गेले, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राणेंना शिवसेनेत आणण्यात महत्त्वाचा वाटा असणारे लीलाधर ढाके त्यांना सोडवत असत असं सांगितलं जातं. अर्थात, असं असूनही त्यांच्या नावाने कोंबडी चोरल्याचा एकही गुन्हा दाखल नाही.

असंही म्हटलं जातं की…

गुंडगिरी करत असणाऱ्या नारायण राणे यांच्यासाठी भांडण, हाणामाऱ्या या अगदीच सामान्य गोष्टी होत्या, असंही काही जणांचं म्हणणं आहे. हे असले भलते उद्योग करणाऱ्या, उडाणटप्पू व्यक्तीला कोकणात ‘कोंबडी चोर’ किंवा कोंबडीच्या असं म्हटलं जातं. याच कारणामुळे नारायण राणेंना सुद्धा हे नाव पडलं असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

 

narayan rane inmarathi

 

बाळासाहेब सुद्धा म्हणायचे ‘कोंबडी चोर’!

एकेकाळी नारायण राणे हे बाळासाहेबांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. आज भाजपमध्ये असणाऱ्या नारायण राणे यांनी सेना सोडली आणि मग काँग्रेसमध्ये  प्रवेश केला.

नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर, त्यांचे शिवसेनेशी असलेले संबंध बिघडतच गेले. विरोधी पक्षाचा भाग झाले म्हटल्यावर, त्यांच्यावर शिवसैनिकांकडून टीका होणं साहजिक होतं.

त्यानंतर मग खास ‘ठाकरी शैलीत’ स्वतः बाळासाहेब सुद्धा त्यांचा समाचार घेत असत. यावेळी नारायण राणे यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांनी सुद्धा ‘कोंबडी चोर’ या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला आहे.

 

balasaheb and narayan rane inmarathi

 

काय मग मंडळी, कसा वाटला ‘कोंबडी चोर’ नावाचा इतिहास, ते कॉमेंट्समधून सांगा, आणि हो तुमच्या ओळखीतल्या इतर लोकांनाही सांगण्यासाठी शेअर सुद्धा नक्की करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?