'सावधान: बॉडी बनवण्यासाठी "या बेजबाबदार" गोष्टी करत असाल तर शरीराची माती होणार

सावधान: बॉडी बनवण्यासाठी “या बेजबाबदार” गोष्टी करत असाल तर शरीराची माती होणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

हल्ली अनेक लोक सततच्या होणाऱ्या अवेअरनेसमुळे आपापल्या शारीरिक फिटनेसबाबत जागरूक झाले आहेत.

म्हणूनच गल्लोगल्ली उघडलेल्या जिममध्ये रोज अनेक लोक घाम गाळत कॅलरीज जाळताना आणि वजनं उचलून बॉडी बनवताना दिसून येतात.

Handsome powerful athletic man performing push ups at the gym. Strong bodybuilder with perfect back, shoulders, biceps, triceps and chest.
4men.pt

अनेकांचे मनासारखे शरीर कमावण्याचे स्वप्न मेहनत करून साकार होते.

पण अनेकांना मात्र रोज जिम मध्ये घाम गाळून सुद्धा मनासारखे यश मिळत नाही. अशा वेळी आजूबाजूला फुकटचे सल्ले देणाऱ्यांची कमी नसते.

अशावेळी सगळेच तथाकथित फिटनेस एक्स्पर्ट होतात आणि मनाला येईल तसे सल्ले देतात.

अरे तू अमुकतमुक प्रोटीन पावडर घे. त्याशिवाय तुझी बॉडी बनणार नाही.

ह्याच्या उलट काही जण सांगतात,

अरे त्या प्रोटीन पावडरने किडनी वर परिणाम होतो. असे कृत्रिम प्रोटीन घेऊन फक्त शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यापेक्षा तू नॅचरल प्रोटीन घे.

काही लोक सांगतात,

नॉनव्हेज खा त्यातून प्रोटीन मिळेल त्याने जाडी वाढते.

 

gym-marathipizza01
madetopleasure.wordpress.com

असे अनेक लोकांचे अनेक तर्क वितर्क असतात. पण जिम करणारा मात्र ह्याच आशेत सगळे डायेटचे प्रकार करून पाहतो आणि ह्या आशेवर जिम मध्ये घाम गाळत राहतो की आज न उद्या मला माझी ड्रीम बॉडी नक्की मिळेल.

काही जिम ट्रेनर्स तर त्यांच्या कडे जिम ट्रेनिंग घेणाऱ्यांना खुशाल स्टेरॉइड्स घेण्याविषयी सल्ला देतात आणि मग

चांगली बॉडी बनवण्याचा ध्यास घेतलेले तरुण मात्र, स्टेरॉइड्सच्या साईड इफेक्ट्सचा विचार न करता, सरळ डोळे मिटून त्यांच्या ट्रेनरने सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतात.

कारण स्टेरॉइड्स हा बॉडी बनवण्याचा short-cut आहे.

पण अनेक लोकांना हे ठावूकच नसतं की त्यांचे अनट्रेंड ट्रेनर स्टेरॉइड्स घेण्याचा सल्ला देऊन त्यांच्या शरीराशी एक धोकादायक खेळ खेळत आहेत. ज्याचा शरीरावर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो.

सामान्यपणे ह्या स्टेरॉइड्सची सुरुवात Anadrol आणि Dynabol ह्या औषधांपासून होते.

 

gym-marathipizza02

ह्या औषधांनी वजन अचानकपणे वाढते. जर तुम्ही लठ्ठ असाल तर तुम्हाला fat burner च्या नावाखाली काही गोळ्यांचे सेवन करायला सांगितले जाते, ज्याने तुमचे वजन कमी होते.

ह्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या वजनात तर फरक जाणवायला लागतो. पण ह्या सगळ्याचा तुमच्या शरीरातल्या हायड्रेशन लेव्हल वर सुद्धा गंभीर परिणाम होतो.

ह्या गोष्टीकडे मात्र कोणीही फारसे लक्ष देत नाही.

आज आपण अशाच स्टेरॉइड्स बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ह्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

म्हणजे मसल्स दिसण्यासाठी तुम्ही ही औषधे घेणार पण ह्याचा तुमच्या आरोग्यावर मात्र गंभीर परिणाम होणार हे निश्चित!

Testosterone Injection

 

gym-marathipizza03
t-nation.com

सर्वसाधारणपणे काही ट्रेनर जे स्टेरॉइड्स घेण्याचा सल्ला देतात त्यात testosterone injection हा एक प्रकार आहे. तुम्हाला माहितच असेल कि testosterone हे एक होर्मोन आहे जे आपल्या शरीरातच तयार होते.

ह्याचे इंजेक्शन घेतल्यास तुमच्या बॉडी ग्रोथ वर तर तुम्हाला परिणाम दिसेलच.

ह्याने शरीरात इंजेक्शन द्वारे testosterone चे प्रमाण वाढते आणि नैसर्गिकरित्या शरीरात हे होर्मोन तयार होण्याची प्रक्रिया काही काळानंतर थांबते.

शरीर testosterone चे उत्पादन बंद करते किंवा जरी testosterone शरीरात तयार झाले तरीही त्याच्या क्वालिटी मध्ये खूप फरक पडलेला दिसून येतो.

पोटातून घ्यायच्या गोळ्यांमध्ये सुद्धा स्टेरॉइड्स असतात.

अनेक जिम ट्रेनर आणि जिम करणारे लोक छातीठोकपणे सांगतात की पोटातून घ्यायच्या ज्या गोळ्या असतात त्या विटामिन्स च्या असतात आणि त्यात स्टेरॉइड्स नसतात. परंतु हे एक असत्य आहे.

ह्या गोळ्यांचा सुद्धा शरीरावर अतिशय घातक परिणाम होऊ शकतो.

जरी असे मानले की ह्या गोळ्यांमध्ये स्टेरॉइड्स नसतात. तरीही जास्त प्रमाणात विटामिन्स शरीरात गेल्याने सुद्धा अनेक आजार उद्भवू शकतात.

थोड्या थोड्या अंतराने स्टेरॉइड्स घेतल्यास काही दुष्परिणाम होत नाही.

 

gym-marathipizza04
health.usnews.com

काही ट्रेनर असे बिनधास्त संगतात की काही महिन्यांच्या अंतराने स्टेरॉइड्स घेतल्यास शरीरावर त्याचा दुष्परिणाम होत नाही. पण हे योग्य नव्हे.

विष हे विषच असतं. ते तुम्ही एकदम घ्या, रेग्युलर घ्या कि थोड्या थोड्या अंतराने घ्या.

शेवटी ते विषच आहे व त्याचा शरीरावर दुष्परिणामच होतो. स्टेरॉइड्स काही अंतराने घेणे म्हणजे स्वतःच्याच आरोग्याशी खेळ आहे.

एकदा बॉडी बनवल्यानंतर स्टेरॉइड्स घेणे एकदम सोडून देणे

स्टेरॉइड्स घेणे हे एखाद्या व्यसनासारखे आहे. जसे एकदा लागलेले सिगारेटचे व्यसन सुटणे कठीण जाते. तशीच एकदा स्टेरॉइड्स घेण्याची सवय लागली, तर ती सोडणे अतिशय कठीण आहे.

जर तुम्ही प्रोफेशनल बॉडी बिल्डर असाल तर ठीक आहे, नाहीतर एकदा स्टेरॉइड्स घेणे सुरु केले तर हळू हळू त्याची शरीराला सवय लागते आणि नंतर ती सवय सोडणे कठीण होवून बसते.

तुम्ही जर का असा विचार करत असला कि ,“एकदाच फक्त बॉडी बनेपर्यंत मी स्टेरॉइड्स घेईन आणि नंतर बॉडी बनल्यावर सोडून देईन” तर मित्रांनो तुम्ही वेळीच स्वतःला आवरा आणि स्टेरॉइड्सच्या पाठी लागू नका.

स्टेरॉइड्स थोड्या प्रमाणात घेणे सुद्धा हानिकारक

तुम्हाला काही लोक असेही सांगणारे भेटतील की स्टेरॉइड्स थोड्या प्रमाणात घेतले, तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत. पण हे खरे नाही.

जसे विष थोड्या प्रमाणात काय अन जास्त प्रमाणात काय, ते कसेही घेतले तरी त्याने नुकसानच होणार. तसेच स्टेरॉइड्सचे सुद्धा आहे. काही स्टेरॉइड्स हे थोड्या प्रमाणात सुद्धा शरीरासाठी घातक ठरू शकतात.

Nandrolone Decanoate (Deca) सुद्धा हानिकारकच आहे

 

 

gym-marathipizza05
euroanabolex.com

 

जे लोक रेग्युलर जिमला जातात त्यांना Nandrolone Decanoate म्हणजेच Deca हे नाव ऐकून तरी नक्की माहिती असते. अनेक लोक Deca घेणे सुरक्षित समजतात. कारण हे औषध Anemia आणि सांधेदुखीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना सहसा डॉक्टर देतात.

एका मर्यादेपर्यंत ह्या औषधाचा डोस घेणे ठीक आहे.

परंतु ह्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. कारण डॉक्टर सुद्धा हे औषध फक्त आजारी असतानाच घ्यायची परवानगी देतात.

तुम्हाला जर बॉडी बनवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मगच स्टेरॉइड्स घेण्याचा विचार करा.

कारण नुसतेच मसल्स दिसून उपयोगाचे नाही, त्याचबरोबर तुमचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहायला हवे, तुमचे शरीर फिट राहायला हवे.

हे देखील वाचा : (Gym ला जात असाल तर या गोष्टी बिलकुल करू नका!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सावधान: बॉडी बनवण्यासाठी “या बेजबाबदार” गोष्टी करत असाल तर शरीराची माती होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?