' सावरकर द्वेष; काँग्रेसने रेडिओवरून काढून टाकले होते पं. हृदयनाथ मंगेशकरांना! – InMarathi

सावरकर द्वेष; काँग्रेसने रेडिओवरून काढून टाकले होते पं. हृदयनाथ मंगेशकरांना!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय स्वातंत्र्यातील एक असं पर्व ज्यामुळे असंख्य क्रांतिकारक निर्माण झाले. “देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो” असा यथार्थ संदेश देणारे सावरकर ज्यांना कळले त्यांना ते नेहमीच आवडले. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अंदमान मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांचं आयुष्य हे खूप संघर्षमयी होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्यातील काही राजकारण्यांनी ‘सावरकर’ हे अमुक जातीच्या लोकांचे दैवत आहेत असं एक चित्र उभं केलं आहे. पण, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, जर जातीचं असं राजकारण स्वातंत्र्यसैनिकांनी केलं असतं तर भारताला अजूनही स्वातंत्र्य मिळालं नसतं.

 

savarkar inmarathi

 

‘विक्रम संपत’ या लेखकाचं सावरकरांबद्दल इंग्रजीत लिहिलेलं ‘वीर सावरकर, सावरकर : अ कॉन्टेस्टेड लेगसी’ हे पुस्तक २६ जुलै २०२१ रोजी प्रकाशित झालं.

या पुस्तकाच्या विरोधात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पुस्तक न वाचता प्रचंड विरोध नोंदवला आणि पुस्तक विक्रेत्यांना अशी तंबी दिली की, कोणत्याही पुस्तक विक्रेत्याने आपल्या दुकानात स्थान देऊ नये.

 

vikram sampat inmarathi

आपल्या प्रगत महाराष्ट्रात नुकतीच घडलेली घटना आहे. घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अशा वेळेस लोक सोयीस्कररीत्या विसरून जातात.

संगीत क्षेत्राला सुद्धा सावरकर यांच्या काव्यावर गाणं तयार करण्याची एकेकाळी जबर किंमत मोजावी लागली होती. तेही कोणत्या नवोदित गायक, संगीतकाराला नाही तर पंडित हृदयनाथ मंगेशकर सारख्या प्रथितयश संगीतकार व्यक्तीसोबत घडलेला एक खरा किस्सा सांगत आहोत.

काय झालं होतं ?

१९६० च्या दशकातील हा काळ होता जेव्हा १७ वर्षीय हृदयनाथ मंगेशकर या ‘ऑल इंडिया रेडिओ’ मध्ये नोकरी करत होते. नोकरी करत असतांना त्यांनी आपली संगीतकला सुद्धा जोपासली होती.

 

hriday inmarathi
filmfare.com

 

आपल्या बहिणी लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्यासोबत ते नेहमीच वीर सावरकरांनी रचलेल्या कवितांना चाल लावणे, ती गाणे बसवणे अशी कलेची उपासना ते नेहमीच करायचे. “ने मजसी ने परत मातृभूमीला…” या वीर सावरकरांच्या काव्याला त्यांनी एक सुंदर चाल बसवली होती. पण, तत्कालीन काँग्रेसच्या काही नेत्यांना ही गोष्ट अजिबात रुचली नव्हती.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेलं गाणं त्यावेळी केंद्रातील काँग्रेस सरकरपर्यंत पोहोचलं होतं, आणि पंडितजींना नोकरीवरून काढून टाकण्याचे चक्क आदेश काढण्यात आले होते.

 

all india radio inmarathi

 

एक गाणं तयार केलं म्हणून नोकरीवरून काढून टाकणे असे प्रकार आपल्या स्वतंत्र भारतात घडला होता हे आजच्या पिढीसाठी आणि आज ‘पुरोगामी’ म्हणून वावरणाऱ्या लोकांसाठी नक्कीच अविश्वसनीय वाटेल. पण, हा प्रकार स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. या गाण्याची रेकॉर्डिंगसुद्धा करण्यात आली होती. पण, ती ऐकवण्याची परवानगी सुद्धा नाकारण्यात आली होती.

 

 

मंगेशकर घराण्यातील एखाद्या व्यक्तीला इतका त्रास होत असेल तर नवोदित लेखकांना, गायकांना त्या काळात किती त्रास झाला असेल ? हा एक वेगळाच विषय आहे.

विक्रम संपत यांनी ‘टाईम्स नाऊ’ दिलेल्या मुलाखतीत अजून एका मुद्द्याला हात घातला आहे की, महात्मा गांधी यांची हत्या करणारी व्यक्ती ही ब्राम्हण होती म्हणून काँग्रेसने त्या काळात पूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात ‘ब्राम्हण विरोधी वातावरण’ तयार केलं होतं.

या वातावरणाचा त्रास लोकांना तर झालाच, पण त्याचबरोबर वीर सावरकर सारख्या महान व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेला सुद्धा त्याचा त्रास झाला हे वरील दोन्ही उदाहरणांवरून आपण नक्कीच म्हणू शकतो.

विनायक दामोदर सावरकर हे लोकांच्या मनातील स्वातंत्र्याचे ‘नायक’ आहेत आणि ते नेहमीच राहतील. काँग्रेस पक्षाचं वीर सावरकर यांच्याबद्दल असलेलं मत ते बहुमतावर लादू शकत नाहीत हेच मागील काही वर्षात वारंवार समोर आलं आहे.

काँग्रेस पक्षाला अशी भीती आहे की, वीर सावरकर यांची लोकप्रियता वाढली तर ती महात्मा गांधी यांच्यापेक्षा जास्त होईल. पण, राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस पक्ष जितक्या लवकर वीर सावरकरांचं कर्तृत्व मान्य करेल ते त्यांच्याच राजकीय अस्तित्वासाठी फायद्याचं असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?