' पायातले बूट चोरीला गेले तरीही गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जिद्दी पठ्ठ्याची कथा – InMarathi

पायातले बूट चोरीला गेले तरीही गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जिद्दी पठ्ठ्याची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक खेळाडूला आपल्या वैयक्तिक वस्तू या फार प्रिय असतात. जसं की आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकर त्याची एमआरएफची बॅट असेल किंवा १० नंबरचा टी शर्ट असेल. खेळाडूंसाठी या वस्तू गरज तर असतातच, पण त्या वस्तूंसोबत प्रत्येक खेळाडूचं एक नातं झालेलं असतं.

 

sachin inmarathi

 

काही ठराविक खेळाडूंसाठी आपली ठराविक रॅकेट सुद्धा तिच्यासाठी लाडकी असणारच. जवळपास प्रत्येक खेळाडूचं असं असतांनाही त्यांचं खरं प्रेम हे त्यांच्या त्यांच्या खेळावरच असतं हे ऑलम्पिक १९१२ मधील सहभागी झालेल्या जिम थॉर्प या जिम्नॅस्टिकपटूने सिद्ध करून दाखवलं होतं.

सामन्यात सहभागी होतांना त्याच्या लक्षात आलं होतं की, आपले बूट चोरीला गेले आहेत. तरीही त्याने मॅचमध्ये मोलाची कामगिरी करून दाखवली होती.

कोण होता जिम थॉर्प? त्याच्या सोबत नेमकं काय झालं होतं ? जाणून घेऊयात.

जिम थॉर्प हा अमेरिकेतील ओकलाहोमा येथे राहणारा, मूळचा भारतीय वंशाचा असलेला जिम्नॅस्टिकपटू होता. सर्वात जास्त मैदानी खेळात सहभागी होण्यासाठी जिम हा जगप्रसिद्ध होता.

 

jim inmarathi
india country today

जिम थॉर्प हा ऑलम्पिक १९१२ मधील सामन्यासाठी तयार होत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, आपले बूट चोरीला गेले आहेत. जिम नाराज झाला होता. पण, त्याने खचून न जाता या समस्येतून मार्ग काढायचं ठरवलं.

जिम थॉर्पने आपल्या आजूबाजूला बघितलं. खेळाडूंच्या खोलीबाहेर त्याला एक कचऱ्याचा डब्बा दिसला. या कचऱ्याच्या डब्ब्यात दोन बुट होते. हे दोन्ही बुट वेगवेगळ्या जोडाचे होते. त्यापैकी एक बुट हा आकाराने मोठा होता.

तो बूट पायात बसण्यासाठी जिम थॉर्पने आपण करतो तसा एक ‘जुगाड’ केला. त्याने एकावर एक असे दोन सॉक्स घातले आणि त्या मोठ्या बुटांना आपल्या मापाचे करून घेतले. जिम थॉर्प हा इतकी मेहनत घेऊन कोणतं पदक जिंकू शकला का?

होय. दोन वेगवेगळे बुट घालणाऱ्या जिम थॉर्पने आपल्या देशासाठी २ सुवर्ण पदकांची कमाई केली होती. तत्पूर्वी, १९१२ मध्ये जिम थॉर्प ने १९१२च्या ‘समर गेम्स’ मधील १५ खेळांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि त्यापैकी ८ खेळांमध्ये पदक पटकावलं होतं. या कामगिरी मुळेच जिम थॉर्पची ऑलम्पिकसाठी निवड करण्यात आली होती.

 

jim inmarathi 1
medium

ऑलम्पिक १९१२ मध्ये जिम थॉर्पने ‘पेंटाथलॉन’ या धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन सुरुवात केली होती. या प्रकारच्या शर्यतीत प्रत्येक सहभागी खेळाडू ला एकाच दिवसात एकूण ५ वेळेस १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी व्हायचं असतं. जिम थॉर्पने त्यापैकी ४ स्पर्धांमध्ये आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना ५ सेकंदाच्या फरकाने हरवलं होतं.

एकाच आठवड्या नंतर झालेल्या ३ दिवसीय ‘डीकॅथलॉन’ स्पर्धेत १०० मीटरच्या धावण्याच्या स्पर्धा होणार होत्या. पहिल्या दिवशी ही स्पर्धा जिम थॉर्प ने ११.२ सेकंद इतक्या विक्रमी वेळेत जिंकली होती. ऑलम्पिक १९४८ पर्यंत हा विक्रम अबाधित होता.

दुसऱ्या दिवशी जिम थॉर्पचे बुट हरवले होते. त्याच्या कोच ग्लेनने त्याला ‘हाय जंप’ या खेळासाठी दोन वेगवेगळे बुट घालण्याचा सल्ला दिला. कोचने दिलेला हा सल्ला जिमच्या उपयोगी पडला होता. त्याच दिवशी ११० मीटरच्या अडथळा शर्यत सुद्धा होणार होत्या. ही शर्यत जिमने १५.६ सेकंदात जिंकून एक नवा किर्तीमान प्रस्थापित केला होता.

 

jim inmarathi 2

 

तिसऱ्या दिवशी झालेल्या पोल जंपमध्ये सुद्धा विजोड बुटांमध्ये सहभागी होऊन पदकाची कमाई केली होती. आपलं पदक स्वीकारतांना सुद्धा कोणताही संकोच न बाळगता जिम थॉर्प हा दोन वेगवेगळ्या बुटांमध्येच हजर होता.

जिम थॉर्पच्या जिगरबाज खेळण्याची दखल सर्व प्रसार माध्यमांनी घेतली होती. जगप्रसिद्ध ‘व्हिलर’ मासिकाने जिम थॉर्प ची मुलाखत घेऊन तरुणांना हा संदेश दिला होता की, “कोणत्याही परिस्थितीत मैदान सोडू नका. खचून जाऊ नका. तुम्ही मैदानावर नंतर हारत असतात, आधी मैदानाबाहेरच हरलात तर मैदानात जाऊन जिंकणं अशक्य आहे.”

जिम थॉर्पचे बुट ऐनवेळी कसे हरवले? याबद्दल बरेच तर्क कित्येक दिवस सुरू होते. ते कोणी चोरले? की लपवले? पण, त्याचं उत्तर काही जिम आणि कोचला मिळू शकलं नव्हतं. आपल्या सह खेळाडूंना सुद्धा जिमने बुटांबद्दल विचारलं होतं. पण, त्यांनी या सुद्धा याबद्दल काहीच माहीत नसल्याचं सांगितलं होतं.

एका सह खेळाडूच्या केवळ एका पायातील बुट जिम थॉर्पला व्यवस्थित बसला होता आणि दुसरा बुट जिमला कचऱ्याच्या डब्ब्यात मिळाला होता. शांत डोक्याने शोधल्यानेच तो बुट जिमला सापडला आणि त्याने स्पर्धा जिंकली असं म्हणता येईल.

 

jim inmarathi 3

 

जिम थॉर्पला अमेरिकेच्या सर्वात यशस्वी जिम्नॅस्टिक खेळाडूमध्ये गणलं जातं. एका स्पर्धेत बेसबॉल खेळण्यासाठी जिमला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याने ते स्वीकारलं, जे की ऑलम्पिक च्या नियमात बसत नव्हतं.

बेस बॉल खेळण्याची शिक्षा म्हणून जिम थॉर्पचे पदकं हे आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक कमिटीने काही वर्ष काढून घेतली होती. १९८२ मध्ये यावर चौकशी समितीने जिमच्या बाजूने निर्णय देऊन त्याचे पदक त्याला परत केले होते.

 

India-olympics-gold-medals-inmarathi

 

जिम थॉर्पच्या या अनुभवातून आपण एक शिकतो की,

कधीही, कोणत्याही अडचणीमुळे आपल्या आवडत्या कामापासून लांब जाऊ नये. बुट नसणे किंवा सुस्थितीत नसणे ही आपल्या कामावर असलेली निष्ठा तपासण्यासाठी नियती ने घडवून आणलेली ही परीक्षा असू शकते. या परीक्षेला जी व्यक्ती सामोरं जातो तोच खरा विजेता ठरतो.

आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम करायला जाण्यासाठी किंवा आपल्याला दिलेल्या निर्धारित आहाराचं पालन करण्यासाठी काही अडचण आपल्याला वाटत असेल तर जिम थॉर्प चं उदाहरण आठवून आपण स्वतःला त्या परीक्षेसाठी नक्कीच तयार करू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?