' अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करणारा 'भल्लालदेव' राणा दग्गुबाटी!

अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करणारा ‘भल्लालदेव’ राणा दग्गुबाटी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सर्वांच्या मनावर ‘बाहुबली’ ह्या चित्रपटाने गारुड केले आहे. भव्य दिव्य असा हा चित्रपट कथा, कलादिग्दर्शन, नेपथ्य ह्या सर्व गोष्टींबाबत उजवा आहेच, शिवाय ह्या चित्रपटातील सर्व पात्रे व ती पात्रं रंगवणारे अभिनेते व अभिनेत्री ह्यांनी सुद्धा उत्तम अभिनय करून सर्वांकडून वाहवा मिळवली आहे. प्रभास, राणा दग्गुबाटी, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णन , सत्यराज ह्यांच्या उत्तम अभिनयाने नटलेला हा चित्रपट आता १००० कोटींच्या स्थानावर जाण्यास सज्ज झाला आहे. इतके उत्तुंग यश पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक चित्रपटाला मिळाले आहे. ह्या चित्रपटात भल्लालदेवची नकारात्मक भूमिका साकारणारा राणा दग्गुबाटी ह्यानेसुद्धा प्रभास इतकीच ह्या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. एका मुलाखतीत त्याने स्वतःबाबतीत एक धक्कादायक गोष्ट उघड केली आहे.

rana-baahubali-marathipizza
राणाचा एक व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर सगळीकडे व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडियो मध्ये त्याने उघड केले आहे की त्याला त्याच्या उजव्या डोळ्याने काहीही दिसत नाही. तो फक्त त्याच्या डाव्या डोळ्याने बघू शकतो. राणा म्हणतो की ,

तुम्ही जो माझा डोळा बघता, तो एका व्यक्तीने मला त्याच्या मृत्युपश्चात दान केलाय. परंतु काही कारणाने ते ऑपरेशन सफल झाले नाही. मी जर माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीही दिसत नाही.

एका तेलुगु कार्यक्रमात त्याने ही माहिती उघड केली. ह्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या एका दृष्टिहीन तरुणीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, तिला तिच्या कलेसाठी उत्तेजन देताना राणाने तिला महत्वाकांक्षी होण्यास सांगितले व असाही संदेश दिला की आपल्यातल्या शारीरिक अक्षमतांना आपल्या स्वप्नांच्या आड आणता कामा नये.

बाहुबलीमधील भल्लालदेवच्या भूमिकेसाठी मेहनत घेताना राणाने सुद्धा त्याच्या शारीरिक अक्षमतेवर विजय मिळवून त्याची भूमिका अतिशय सुंदर व चित्तवेधक वठवली आहे. कॅमेरासमोर त्याचा नैसर्गिक व सहज वावर बघून कोणाला संशय सुद्धा येत नाही की त्याला उजव्या डोळ्याने दिसत नाही.

बाहुबली चित्रपटाच्या आधी राणाने अनेक तेलुगु व तमिळ तसेच हिंदी चित्रपटांत अभिनेता म्हणून काम केले आहे. तसेच ह्या आधी त्याने निर्माता, फोटोग्राफर व visual effects coordinator म्हणून काम केले आहे. २००६ साली Visual Effects producer म्हणून राणाला ‘सैनिकाडू’ ह्या तेलुगु चित्रपटासाठी बेस्ट स्पेशल इफेक्ट्स ह्या विभागात State Nandi Award मिळाले. तसेच त्याला त्याच वर्षी Bommalata – A Bellyful of Dreams ह्या चित्रपटासाठी सहनिर्माता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. २०१० साली त्याने त्याचा पहिला चित्रपट केला. हा चित्रपट तेलुगु होता व त्याचे नाव होते ‘लीडर’. ह्या चित्रपटासाठी राणाला Filmfare Award for Best Male Debut – South हा पुरस्कार मिळाला. त्याचा हिंदीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘दम मारो दम’ .ह्या चित्रपटात त्याने बिपाशा बसू बरोबर काम केले होते. त्याच्या ह्या चित्रपटातील कामासाठी त्याचे समीक्षकांनी कौतुक केले. २०१२ सालच्या क्राईम थ्रिलर ‘कृष्णं वंदे जगद्गुरूम’ ह्या चित्रपटातील कामासाठी राणाने समीक्षकांकडून वाहवा मिळवली.

rana-baahubali-marathipizza01
pinkvilla.com

राणाचा जन्म १४ डिसेम्बर १९८४ साली चेन्नई येथे झाला. त्याचे वडील दग्गुबाटी सुरेश बाबू हे तेलुगु चित्रपटांचे निर्माते होते. त्याच्या आईचे नाव लक्ष्मी दग्गुबाटी आहे. साउथचे सुपरस्टार वेंकटेश दग्गुबाटी हे त्याचे काका आहेत. त्याला एक भाऊ व एक बहीण आहे. त्याचे आजोबा डी. रामानायडू हे प्रसिद्ध निर्माते होते. त्यांच्या तेलुगु चित्रपटसृष्टीतील कामासाठी त्यांना पद्मभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राणाने त्याचे शालेय शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूल येथून घेतले. त्याचा भाऊ नाग चैतन्य हा सुद्धा दक्षिणेत प्रसिद्ध अभिनेता आहे.
बाहुबली चित्रपटाच्या यशानंतर राणा आता तरुणींचा हार्ट थ्रोब झाला आहे. त्याचे चाहते त्याच्या बाहुबली चित्रपटासाठी रांगा लावून आहेत. आणि त्याच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

rana-baahubali-marathipizza02
gqindia.com

राणाला त्याच्या पुढील वाटचाली साठी आमच्या कडून शुभेच्छा! तसेच आपल्या अपंगत्वावर मात करून अथक मेहनत करून यश मिळवणाऱ्या राणाला hats off !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?