' नवऱ्याने टाकलं, पदरी दोन मुलं, वाचा, ‘सफाई कामगार कशी बनली कलेक्टर’! – InMarathi

नवऱ्याने टाकलं, पदरी दोन मुलं, वाचा, ‘सफाई कामगार कशी बनली कलेक्टर’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं असतात जी आपल्याला नवी उर्मी, स्वप्नं बघण्याची नवी ताकद देत असतात. अशक्य ते शक्य करून दाखवणारी ही उदाहरणं हा संघर्ष करणार्‍यांसाठी नेहमीच आशेचा दिवा असतो. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आहे आशा कंडार या सफाई कामगार महिलेची. सफाई  कामगार ते डेप्युटी कलेक्टर असा प्रवास केलेल्या आशांनी अनेकांना आशेचा नवा किरण दाखवला आहे.

 

asha inmarathi
indiatimes.com

 

स्वप्नं बघायला पैसे पडत नाहीत त्यामुळे स्वप्न प्रत्येकचजण बघतो. काहीजणांची स्वप्नं ही मुंगेरीलालची असतात तर काहीजण ही स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतात. बरेचदा ही स्वप्नं शक्यप्राय गटातली असतात मात्र जर या स्वप्नांवर आणि स्वत:वर विश्र्वास असेल तर कधी ना कधी ही स्वप्न वास्तव बनून आपल्या समोर उभी रहातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जेव्हा अशी प्रयत्नांनी मिळवलेली वास्तवातली स्वप्नं कोणी साध्य करतो तेव्हा ते यश त्याच्या एकट्याचं नसतं. अनेकांना त्यांची स्वप्नं पूर्ण होऊ शकतात ही उमेद देणारी ही यशोगाथा असते. अलिकडेच अशीच एक यशोगाथा आशा कंडार यांच्यानिमित्तानं समोर आली.

राजस्थानमधील एक सफाई कामगार असणारी आशा कंडार ही महिला अनेकांना आदर्श बनली आहे. १९९७ मधे शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांचं लग्नही झालं. लग्नानंतर लगेचच दोन मुलं झाली आणि २०१२ मधे त्यांचा घटस्फोट झाला.

 

asha inmarathi 3
indiatimes.com

 

मुलांना घेऊन त्या विभक्त होऊन राहू लागल्या. मुलांचं शिक्षण, कुटुंबाचा खर्च आणि तुटपुंजं शिक्षण यामुळे त्यांनी काम काय आहे याचा विचार न करता पडेल ते काम करायला सुरवात केली. मात्र हे करत असतानाच त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचाही निर्धार केला आणि त्यानुसार त्या २०१६ साली पदवीधर झाल्या.

कलेक्टर म्हणजे काय? याचा पत्ताही नसणार्‍या आशांनी चक्क गुगल सर्च करून कलेक्टरपद काय असतं? हे शोधलं आणि कलेक्टर बनण्याचा निर्धार केला. आयएएसच्या वयाच्या मर्यादेची त्यांना कल्पना असल्यानं त्यांनी आरएएसची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

 

ias officer featured inmarathiias officer featured inmarathi
jagran.com

 

आरएएस परिक्षेसाठी घटस्फोटीत महिलांसाठी वयाची अट शिथिल आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यानंतर बाराच दिवसांनी त्यांना सफाई कामगाराची नोकरी मिळाली. जोधपूर नगर निगममधे त्या नोकरीला लागल्या. रोज सकाळी पाच साडेपाच वाजता त्या घर सोडत. सकाळी सहा ते दुपारी दोन असे त्यांचे कामाचे तास होते आणि त्यांना १२ हजार पाचशे रूपये पगार होता.

या पगारातून केवळ कुटुंबाच्या खाण्यापिण्याचा खर्च भागत असे. कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं असं मानणार्‍या आशांनी अक्षरश: पडेल ते आणि मिळेल ते काम करत पैसे कमावणं सुरू केलं. दुसरीकडे परिक्षेचा अभ्यासही चालूच होता. त्यांच्या ॲक्टिव्हामधे कायम पुस्तकं असत.

कामातून जरा फुरसत लाभली की त्या जागा मिळेल तिथे पुस्तक उघडून वाचत बसत. एखादं झाड, बाजूला काठीचा मोठा खराटा आणि पुस्तकात डोकं घालून बसलेल्या आशा हे चित्र जोधपूर नगरनिगम हद्दीत परिचयाचं झालं होतं.

 

asha inmarathi 1
Odisha TV

 

मुलं आणि आई दोघंही बरोबरीनं अभ्यास करत असत. त्यांची मुलगी पल्लवी (२१) आता अखेरच्या वर्षात महाविद्यालयात शिकत आहे तर मुलगा ऋषभ (१९) द्वितिय वर्षात शिकत आहे. मुलांनी आईला जिथे गरज लागेल तिथे मदत करत परिक्षेत मदत केली.

इतर घरात आया मुलांचा अभ्यास घेतात, आशांच्या घरात मात्र मुलं आईचा अभ्यास करवून घेत होती. आशांचं स्वप्न हे केवळ त्यांचं नव्हतं तर त्यांच्या कुटुंबातल्या सहा डोळ्यांनी पाहिलेली ते स्वप्न होतं.

लहान वयात लग्न होऊन संसाराची जबाबदारी अंगावर पडणार्‍या, सततच्या सांसारिक कटकटींनी निराश झालेल्या महिलांसाठी आशा रोलमॉडेल आहेत. आयुष्यात अडचणी येतच रहाणार पण म्हणून स्वप्नं बघणं आणि ती पूर्ण करण्यासाठी झटणं सोडायचं नाही. उलट प्रतिकूल परिस्थिती आपली स्वप्नं पूर्ण करायला आणखिनच बळ देते असं त्यांचं म्हणणं आहे.

 

asha inmarathi 2
Odisha TV

 

घटस्फोट झाला म्हणून, एकटीवर मुलांची, संसाराची जबाबदारी आली म्हणून, शिक्षण अपूरं असल्यानं कमाई कमी म्हणून रडत न बसता त्यांनी एक असं स्वप्न बघितलं जे त्या परिस्थितीत अशक्य होतं. जेंव्हा महापौरांनी सर्व ऑफिस स्टाफच्या उपस्थितित आशांचा फेटा बांधून सन्मान केला तेव्हा त्यांचे सगळे कष्ट तर मागे सरलेच पण तो फेटा आणि तो सन्मान त्यांच्यासारख्या अनेकींसाठी आशेचा किरण ठरला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?