' अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेला महिनाभर मोठमोठ्या न्यूज चॅनल्सपासून गल्लीतल्या चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे एकच विषय चर्चिला जातोय, तो म्हणजे तालिबानी लोकांनी अफगाणिस्तान काबीज केल्याचा. कशाप्रकारे तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं?

त्यानंतर जागतिक राजकीय वर्तुळात घडणारे बदल आणि एकंदरच तालिबानी लोकांच्या क्रूर कृत्यांचा इतिहास सगळंच समोर येऊ लागलं. या सगळ्यात अमेरिकेने अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य परत बोलावून घेतल्याने या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं?

आणि नुकतंच अमेरिकेने आता पूर्णपणे अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्याचं समोर येतंय, काबूलमधूनही अमेरिकेने पूर्णपणे माघार घेतल्याची बातमी सध्या समाजमाध्यमांवर दिसत असून, अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनीसुद्धा अफगाणिस्तानमधून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचं जाहीर केलं.

आता खऱ्या अर्थाने अफगाणिस्तानवर तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे, त्यांनीदेखील अमेरिकामुक्त अफगाणिस्तान अशी घोषणा केली आहे.

 

american soldiers inmarathi

 

अमेरिकेचं बायडन सरकार मूर्ख आहे का? २० वर्षे अरबो खरबो रुपये खर्च करून इतकी वर्षं अफगाणिस्तानवर कंट्रोल ठेवायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी अचानक तिथून आपलं सैन्य मागे का घेतलं? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जातयात.

या सगळ्यामागे अमरिकेची काही वेगळी खेळी आहे का? याबद्दल जागतिक राजकरणाच्या अभ्यासकांनी त्यांची काही स्पष्टीकरणं मांडली आणि त्यानुसार अमेरिका हे सगळं तैवान सुरक्षित ठेवण्यासाठी करत आहे असा निष्कर्ष काढला जातोय.

 

china taiwan inmarathi

 

अफगाणिस्तानच्या इतिहासावर आपण एक नजर टाकली तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, सोव्हिएत रशिया असो किंवा अमेरिका ज्या कुणी देशाने अफगाणिस्तानच्या राजकारणात लक्ष घातलं त्या देशांची सगळीच गणितं फिसकटली आणि याबाबतीत त्यांना अपयश पचवायला लागलं!

महासत्ता बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या चीनला अफगाणिस्तानच्या या राजकारणात अडकवायचं आणि एकदा का चीन यात अपयशी ठरलं की, २०२२ च्या निवडणुकांत चीनची जनता याचं खापर त्यांच्या सत्ताधाऱ्यांवर फोडेल, यामागची ही अमेरिकेची खेळी असू शकते.

याबरोबरच चीनचं ‘तैवान’वरचं लक्ष विचलित करून त्यांना या वेगळ्याच प्रकरणात अडकवायचा हा डाव अमेरिकेने ठरवून रचला आहे असंही तज्ञांचे मत आहे!

तैवानच्या वेस्ट कोस्ट या सागरी भागाजवळ अमेरिकेने सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केल्याची बातमीसुद्धा नुकतीच बाहेर आली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांचासुद्धा याला छुपा पाठिंबा असल्याचं आणि अफगाणिस्तानमधलं हे नाट्य पद्धतशीरपणे घडवून आणल्याचंही बोललं जात आहे.

 

us army in taiwan inmarathi

 

एकंदरच जागतिक राजकारणाच्या या धुमश्चक्रीत चीनचं लक्ष ‘तैवान’वरुन विचलित करून अमेरिका त्यांची वेगळीच खेळी खेळतीये असाच काही तज्ञांनी निष्कर्ष काढला आहे.

आता यावर चीन नेमकं कशापद्धतीने व्यक्त होतोय? खरंच अमेरिकेची ही खेळी चीनला महागात पडू शकते का? आणि या सगळ्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय पडसाद उमटतील? हे येणारा काळच ठरवू शकेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?