' तालिबानचं भारतीय कनेक्शन!

तालिबानचं भारतीय कनेक्शन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : डॉ. अभिराम दीक्षित

===

तालिबान वगैरे परदेशी दहशतवादी आहेत, तसा टोकाचा इस्लामी विचार भारतात नाही अशा मुर्खांच्या नंदनवनात कोणीही राहू नये. तालिबानचे वैचारिक मूळ भारतात जन्मले आहे हे समजून घेतले पाहिजे. मोठमोठ्या पुरोगामी विद्वानांना याची कल्पना नाही हे अजून धक्कादायक आहे.

तालिबानचे मूळ, जमात उलेमा इ इस्लाम आणि देवबंदी विचारधारेत आहे. देवबंदी ही कट्टर इस्लामी विचारधारा अस्सल भारतीय आहे. इथे आपण तालिबानचे इंडियन कनेक्शन समजून घेऊया.

 

taliban inmarathi

 

तालिबानचा अर्थ होतो विद्यार्थी. बरं हे कोणते इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचे विद्यार्थी नाहीत. ते आहेत मदरशात शिक्षण घेणारे विद्यार्थी. सो मेक इट क्लियर – तालिबान हि संघटना इस्लामी मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थाची टोळी आहे.

आता इस्लामी मदरसे अनेक प्रकारचे असतात . हिंदूत ज्याप्रमाणे शैव, वैष्णव, अद्वैती, सांख्य अशा वेगवेगळ्या स्कुल्स असतात तशा इस्लाम मध्येही असतात. तालिबान चे विचार आणि त्यांच्या म्होरक्या मुल्ला मुहम्मद ओमर हे देवबंदी मदरशात शिकले होते. देवबंद इस्लाम हा अस्सल भारतीय कट्टरवादी विचार असून त्याची पाळेमुळे थेट मोगलाईत आहेत.

 

mughal force inmarathi

 

देवबंद हे गाव आहे भारतातल्या उत्तर प्रदेशात. त्या गावाला या देवबंद स्कुलचे मुख्य ऑफिस आहे. देवबंद ही धार्मिक शाखा, सुन्नी हनाफी गटात मोडते. मुहम्मद कासीम आणि रशीद अहमद यांनी देवबंद ची स्थापना १८६६ साली केली.

जमाते उलेमा ए हिंद हि भारतीय संघटना आणि तालिबान वर प्रभाव टाकणारी जमाते उलेमा इस्लाम ही पाकिस्तानी पार्टी दोन्ही देवबंदी विचारशाळेतल्या आहेत. देवबंदच्या संस्थापकांनी त्यांचे विचार शाह वलिउल्लाह कडून उधार घेतलेले आहेत.

 

deoband inmarathi
youtube

 

आपले मुख्य प्रेरणास्थान म्हणून देवबंद च्या संस्थापकांनी ज्या शाह वलिउल्लाहचे नाव अभिमानाने घेतले आहे तो नेमका होता तरी कोण? देवबंदची स्थापना १८६६ सालची असली तरी त्यातला इस्लामी पुनरुज्जीवनाचा मुख्य विचार १७६२ साली अल्लाहला प्यारा झालेल्या शाह वलिउल्लाह या इस्लामी धर्मपंडिताचा आहे.

शाह वलिउल्लाह हा इस्लामी धर्म शास्त्राचा प्रकांडपंडित होता. तो पानिपत युद्धाचे कारणही होता. त्याची पुस्तके आणि विचार यांनी भारतातल्या मेनस्ट्रीम इस्लामवर प्रचंड प्रभाव टाकला आहे . शाह वलिउल्लाहचे प्रमुख कार्य म्हणजे काफिर मराठ्याचा बिमोड करायला अफगाणी अहमदशहा अब्दालीला आमंत्रण देऊन भारतात बोलावणे. तेच ते प्रसिद्ध पानिपतचे युद्ध होय . या युद्धात काफिर सदाशिवराव भाऊ पेशव्याचा मृत्यू आणि पराभव झाला.

 

panipat featured inmarathi
quora.com

 

हिंदुस्थानवर आक्रमण करण्यासाठी , शाह वलिउल्लाहने अफगाणी बादशहा – अहमदशहा अब्दालीला लिहिलेले ऐतिहासिक पत्र असे होते-

“मुसलमानेतर लोकांत मराठा नावाचा एक समूह आहे . त्यांचा एक सरदार आहे. या समुदायाने काही काळापासून दख्खनच्या प्रांतात डोके वर काढले आहे व सर्व हिंदुस्तानावर त्यांचा प्रभाव पाडला आहे…..कालांतराने मराठे प्रबळ झाले व अनेकदा इस्लामी नगरे त्यांच्या अधिपत्याखाली आली आहेत. मराठ्यांनी मुसलमान व हिंदू, दोघांकडून ही खंडणी घ्यायला सुरवात केली आहे.

मराठ्यांचे प्रभुत्व नष्ट करणे तसेच दीनदुबळ्या मुसलमानांची मुसलमानेतर लोकांच्या विळख्यातून मुक्तता करणे हे प्रमुख कर्तव्य जनाब-ए-आली, तुमच्याच खांद्यावर आहे. अल्लाह न करो पण काफिरांचे अधिपत्य जर असेच चालू राहिले तर मुसलमान इस्लामला विसरून जातील आणि काही काळातच असे होईल की हे मुसलमान असे वागतील की मुसलमान व मुसलमानेतर यांच्यात काही अंतरच उरणार नाही.

 

panipat inmarathi
webduniya

 

हे सुद्धा एक प्रचंड मोठे संकट आहे, हे संकट दूर करण्याची योग्यता बा-फज्ल-ए-खुदावंदी जनाब, तुमच्या शिवाय इतर कोणाकडे ही नाही. आम्ही हिन्दुस्तानचे रहिवासी रसूल-ए-खुदासल्ले अल्लाह आली वसल्लम (मुहम्मद) ला प्रेषित मानतो आणि महान परमपूज्य अल्लाहच्या नावाने याचना करतो की धैर्याचे सौभाग्य लाभलेल्या वीराला (अब्दाली)

या दिशेला वळवावे जेणे करून तो बंडखोरांचा सामना करेल आणि अल्लाह च्या दारी त्याच्या सत्कृत्यांच्या सूचीत मोठी नोंद केली जाईल. तसेच काफिरांशी युद्ध करणारे (मुजाहिदीन) अल्लाहकडे जाणाऱ्या वाटेवर गेल्याची नोंद केली जाईल, तसेच जगातील असंख्य वरदाने मिळतील आणि मुसलमान काफिरांवर वरचढ ठरतील.”
—————————————
पत्राचा संदर्भ : मूळ पत्र १३ – १४ पानी आहे. याचा उर्दू अनुवाद श्री खलीक अहमद निजामी यांनी १९५० च्या सुमारास, “शाह वलीउल्लाह देहलवी के सियासी मकतूबात” पृष्ठ : ९७ – ११०
—————————————

शाह वलिउल्लाह च्या विचारातून देवबंद आणि देवबंदीच्या विचारातून तालिबान चा जन्म झाला आहे हे समजून घ्या. फाळणी नंतर देवबंदीची पाकिस्तानी शाखा किंचित वेगळी झाली तरी भारतीय इस्लामी कट्टरतेने – म्हणजे शाह वलिउल्लाहने अफगाणी आक्रमकांना आधीही पानिपतवर आमंत्रण दिले होते. हे विसरून चालणार नाही.

 

shaha inmarathi
pakistani stories

हे ही वाचा – ३० तालिबानी आणि ‘तो’ एकटाच: गोरखा सैनिकाचे अतुलनीय साहस! नक्की वाचा…

थोडक्यात, तालिबान म्हणजे मदरशातले विद्यार्थी होय. अफगाण तालिबान हे देवबंदी मदरशाचे विद्यार्थी आहेत. देवबंदचे मुख्य ऑफिस भारतात आहे. देवबंदचे मुख्य प्रेरणा स्थान शाह वलिउल्लाह हे देखील भारतीय मुसलमान होते. त्यांनी काफिर मराठ्यांना बुडवायला अफगाणी जिहादी पानिपत वर बोलावले होते . तालिबान अफगाण आणि भारतीय इस्लामचे असे घट्ट नाते आहे.

स्त्रियांना बुरखा , काफ़िरांच्या ( हिंदू – शीख ) स्त्रिया लुटणे , बामियान मधील बुद्धमूर्ती फोडणे वगैरे तालिबानी कृत्ये आज परक्या देशात घडत आहेत . कारण ती कृत्ये करण्याइतकी शक्ती आणि लोकसांख्या त्याची त्या देशात आह .

 

muslim namaz inmarathi
patrika

आज भारतातले साधारण १५% मुसलमान या देवबंदी स्कुलचे आहेत . या देवबंद स्कुल ने आपल्या इस्लामी मागण्या मान्य करण्यासाठी काही काळ काँग्रेसशी सहकार्य केले होते. स्वातंत्र्य पूर्व काळात जो काँग्रेस बरोबर असेल त्याला -. “राष्ट्रीय” म्हटले जायचे. त्यामुळे आजही काही काफिर हिंदू देवबंद ला “राष्ट्रीय मुसलमान” आणि तालिबानला परराष्ट्रीय मुस्लिम समजतात . अल्लाह आणि त्याचा संदेश एकच असतो हे काफिरांना कधी कळावे ?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?