' IT तील मराठी तरुण चक्क पाणीपुरीचा ब्रँड तयार करू शकतो? वाचा!

IT तील मराठी तरुण चक्क पाणीपुरीचा ब्रँड तयार करू शकतो? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पाणीपुरी आवडत नाही अशी व्यक्ती भारतात सापडणं जरा दुर्मीळच! पाणीपुरीबद्दल सोशल मिडिआवर कितीही विनोद फिरले तरी या पदार्थाने भारतीयांच्या जीवनात एक अविभाज्य स्थान कायमचं पटकावलं आहे. असं असलं तरी याची विक्रीची मक्तेदारी काही ठराविक लोकांकडेच आहे आणि हेसुद्धा सर्वमान्य आहे की ‘तशी’ चव घरी होतच नाही.

त्यामुळे एकूणच चाट प्रकारात मोडणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणं हे काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी घटना प्रत्यक्षात आणली आहे इंदोरच्या कुळकर्णी दाम्पत्याने!

 

panipuri-inmarathi03

 

सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी आरती कुळकर्णी आणि एमबीए झालेले प्रशांत कुळकर्णी या जोडीने ‘गपागप’ नावाचा पाणीपुरी ब्रँड बाजारात आणला तो स्वतःच्याच ‘चटर पटर’ या कंपनीद्वारे! छोट्याशा जागेत सुरु केलेला हा ब्रँड थोड्याच दिवसांत इंदोरमध्ये प्रसिद्ध झाला. ही घटना आहे २०११ सालची! त्याचं झालं असं की प्रशांत कुळकर्णी ‘इन्फोसिस’मध्ये नोकरी करत होते.

 

chatar patar inmarathi
mahaMTB

 

नोकरीत लागल्यापासून त्यांना असं वाटत होतं की कोणाच्यातरी ‘हाताखाली’ काम करणं हे त्यांच्या रक्तात नाही. त्यांना स्वतःचं असं काहीतरी वेगळं करायचं आहे, ऑफीसमधून घरी जातांना अनेकदा हे दोघं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विक्रेत्याकडून पाणीपुरी किंवा तत्सम चाट प्रकार खायचे. अशातच एकदा पाणीपुरी खाल्ल्यावर प्रशांतना अन्नातून विषबाधा झाली. त्याचा परिणाम म्हणून ते चार महिने पाणीपुरी खाऊ शकले नाहीत. त्यांना जाणवले की खवय्यांसाठी चार महिने पाणीपुरी न खाणं ही शिक्षाच आहे.

 

panipuri-inmarathi02

 

तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की इतक्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या या पदार्थाचा भारतामध्ये एकही ब्रँड अस्तित्वात नाही आणि त्यातूनच जन्म झाला ‘चटर पटर’चा! ‘गपागप’ हा पाणीपुरीचा भारतातील पहिलाच ब्रँड आहे जो या कुळकर्णी दाम्पत्याने सुरू केला आहे.

 

chatar patar inmarathi 3
twitter

आरती यांनी वेगवेगळ्या प्रयोगांमधून विविध चवींच्या पाककृती तयार केल्या व प्रशांत यांनी त्यांच्या खप, प्रसार यासाठी प्रयत्न केले. खवैयांनी त्यांना भरघोस प्रतिसाद दिला आणि तोंडी प्रचार भरपूर होऊन त्यांच्याकडे अधिकाधिक लोक आस्वाद घेण्यासाठी येऊ लागले.

व्यवसाय वाढायला लागल्यावर शाखा विस्ताराचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्याचवेळी राजकोटमधील एका व्यक्तीने त्यांना फ्रॅन्चायझीबद्दल विचारणा केली. यामुळे त्यांचा जसा उत्साह वाढला तशी जबाबदारीही वाढली.

ज्याप्रमाणे मॅकडोनॉल्डस्‌च्या किंवा पिझ्झा हटच्या कोणत्याही शाखेतील पदार्थांची चव निश्चित असते, त्याप्रमाणे चटर पटरच्या पदार्थांचेही असायला हवे या हेतूने त्यांनी आपल्या उत्पादनांचे प्रमाणीकरण केले.

 

chatar patar inmarathi 1
youngitsthan

पदार्थांचे घटक, मसाले असे तयार केले की जे कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्याला सहजपणे वापरता येतील. सध्या भारतामध्ये ‘चटर पटर’ची जरी १००पेक्षा जास्त आउटलेटस असली तरी हे इतकं सोप्पं नव्हतं.

जेव्हा प्रशांतने इन्फोसिसमधील नोकरी सोडून पाणीपुरीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायाचा ठरवलं तेव्हा घरच्यांचे उत्तेजन त्यांना मिळाले नाही. उच्च विद्याविभूषित असणाऱ्या या दोघांनी पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करावा हे घरच्यांना मान्य नव्हते.

एक व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशापेक्षा खूप कमी रक्कम हातात असताना इंदोरच्या रस्त्यावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यांनी व्यवसाय सुरू करतानाच स्वच्छता, चविष्ट आणि नेहमीपेक्षा हटके अशी पाणीपुरी असावी हे ठरवले होते.

 

chatar patar inmarathi 4
Mydala

हे ही वाचा – जेव्हा जसपाल भट्टी “पाणीपुरी” च्या बिजनेसचे शेअर्स विकायला काढतात!

पाणीपुरीबरोबरच त्यांच्याकडे ८० प्रकारच्या भेळ, २७ प्रकारचे वेगवेगळे चाट पदार्थ, पोहे तसेच ११२ चवीच्या पाणीपुरी मिळतात. यात पुदीना, खट्टामिठा, हिंग, ऑरेंज, मॅगी, चॉकलेट अशा वैविध्यपुर्ण चवींचा समावेश आहे.

चाटमध्ये टकाटक भेळ, समोसा चाट, पापडी चाट, दही भल्ला, चॅटिझ्झा, इटालिअन झप्पी असे अनेक लोकप्रिय प्रकार आहेत. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे परंतू त्यामधून बाहेर पडण्यासाठी प्रशांत नवनवीन पर्यायी सेवा उपलब्ध करून देत आहेत. उत्तर भारतीय तसेच दाक्षिणात्य खाद्यपदार्थांसाठी क्लाऊड किचनचा पर्याय शोधून काढला.

गपागपच्या यशानंतर त्यांनी ‘बॉक्स ओ बर्गर ‘ आणि ‘अंडेवाला’ असे दोन नवीन ब्रँड बाजारात आणले आहेत. संपूर्ण भारतात त्यांची ३००हून अधिक आउटलेट असून ३०००पेक्षा जास्त मंडळी त्यांच्याबरोबर काम करत आहेत.

 

burger inmarathi
pinterest

राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांचे फ्रॅन्चायझी असून या तिन्ही ठिकाणी बिग बाजरबरोबर ते व्यवसायाने बांधले गेले आहेत. भारतभर व्यवसायाचे पाय भक्कम रोवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि लंडनमधून फ्रॅन्चायझीसंदर्भात आलेल्या चौकशीचा त्यांनी अजून विचार केलेला नाही. परंतू एक दिवस ‘गपागप’ला जगप्रसिद्धी द्यायची हे त्यांचे स्वप्न आहे. याचेच प्रतिबिंब म्हणून की काय पण हॉवर्ड विद्यापीठाने त्यांच्या ‘गपागप’ पाणीपुरी ब्रँडवर एक केस स्टडी केली आहे.

कल्पकता आणि मेहनत यांच्या बळावर साध्याशा दिसणाऱ्या छोटेखानी व्यवसायाचे रूपांतर मोठ्या उद्योगात करता येते याचे हे मराठी दांपत्याने प्रस्थापित केलेले चविष्ट उदाहरण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?