' काबूलमधला 'शेवटचा हिंदू पुजारी' जीव धोक्यात घालून तिथेच थांबलाय, कारण...

काबूलमधला ‘शेवटचा हिंदू पुजारी’ जीव धोक्यात घालून तिथेच थांबलाय, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेले दोन दिवस सगळीकडे चर्चा सुरु आहे, ती फक्त आणि फक्त एकाच विषयाची, आणि तो म्हणजे तालिबानी संघटनेकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेला कब्जा! काल तर एकीकडे भारत स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, दुसरीकडे अफगाणिस्तान मात्र पारतंत्र्यात जात असल्याच्या चर्चा आपल्याही देशात रंगल्या होत्या.

 

indian flag inmarathi

 

अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलवर तालिबानी झेंडा फडकला आणि त्यांच्या राष्ट्रात नुसतीच धावाधाव सुरु झाली. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन देश सोडून जाण्यासाठी हालचाल करू लागला. जीव वाचवायचा तर देश सोडायला हवा, हे प्रत्येकच अफगाणी नागरिकाने जाणलं असल्याचं पाहायला मिळतंय.

काबुल विमानतळावर झालेला गोंधळ, एकूणच देशातील भयावह स्थिती पाहता, येत्या काही दिवसांमध्ये काय घडेल त्याविषयी आज बोलणं निव्वळ अशक्य आहे. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे, की खुद्द राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी सुद्धा देशाबाहेर पळ काढलाय.

 

ashraf ghani inmarathi

 

अशावेळी सुद्धा अफगाणिस्तानमधील ‘शेवटच्या पुजाऱ्याने’ देश सोडायला नकार दिलाय. या पुजाऱ्याचं नाव आहे, पंडित राजेश कुमार.

यामागील कारण असं की…

‘सर सलामत तो पडगी पचास’ ही म्हण आपण नेहमीच ऐकलेली असते. त्यानुसारच प्रत्येक अफगाणी नागरिकाने सध्या स्वतःचा जीव वाचवणं, हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे. पंडित राजेश कुमार यांचे विचार मात्र काहीसे वेगळे असल्याचं पाहायला मिळतंय.

पंडित राजेश कुमार यांना काबुल सोडून येणं सहज शक्य होतं. त्यांच्यासाठी अनेक हिंदूंनी मदतीचा हात पुढे केला. त्यांना काबुलमधून बाहेर पडण्यासाठी लागणारी सगळी मदत, सगळा खर्च करण्याची तयारी दाखवली. तरीही काबुलमधील रतन नाथ मंदिराच्या या पुजाऱ्याने तिथून निघण्यास नकार दिला आहे.

 

rattan nath temple inmarathi

 

प्रवासाचा आणि राहण्याचा सगळा खर्च करण्याची तयारी हिंदू मंडळींनी दाखवून सुद्धा काबुल ना सोडण्याचा घेतलेला निर्णय, म्हणजे राजेश कुमार यांची सेवेची भावना आहे.

त्यांच्या पूर्वजांनी सुद्धा याच मंदिरात पुजारी म्हणून काम पाहिले आहे. गेली शंभर वर्ष, राजेश कुमार यांचे कुटुंबीय या मंदिरातील पुजारी म्हणून सेवा करत आहेत. त्यामुळेच तालिबानींच्या हस्ते येणारा मृत्यू हादेखील त्याच सेवेचा एक भाग असेल, असं पंडित राजेश कुमार यांचं म्हणणं आहे.

 

talibanis inmarathi
bbc.com

 

काबुलमध्ये राहणारा शेवटचा ज्यू, झाबूलोन सीमांतोव्ह यानेही देश सोडण्याचा निर्णय घेतला. अवघा बालपण अफगाणिस्तानात घालवलेल्या झाबुलोनने, जीव वाचवण्याला प्राधान्य दिल्याचं दिसतंय. कधीकाळी ज्यू लोकांची वस्ती असणारे अफगाणी प्रदेश सुद्धा इस्लामी हुकुमतीमुळे नामोहरम झाले आहेत.

झाबूलोन यांच्या जाण्याने अफगाणिस्तानमधून ज्यू लोकांचा खऱ्या अर्थाने खात्मा झाला आहे. या आधी सुद्धा त्यांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पुन्हा एकदा काबुलमध्ये परतण्याची हिंमत सुद्धा दाखवली होती.

 

kabul inmarathi

 

अशा पार्श्वभूमीवर, पंडित राजेश कुमार यांनी सेवा भावनेने घेतलेला निर्णय नक्कीच श्रेष्ठ ठरतो, यात शंकाच नाही. केवळ आपल्या धर्मासाठी, त्यांनी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी दाखवली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?