' ‘अंडी’ देणाऱ्या या खडकाने वैज्ञानिकांची सुद्धा झोप उडवली – InMarathi

‘अंडी’ देणाऱ्या या खडकाने वैज्ञानिकांची सुद्धा झोप उडवली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात रहस्य कमी नाहीत. हे संपूर्ण जगच नानाविध रहस्यांनी भरलेलं आहे, असं म्हणता येईल. मग, तो पृथ्वीच्या पोटातील लाव्हा असो, किंवा अंतराळातील एलियन; जगातील अनेक गोष्टींमध्ये, अनेक रहस्य दडलेली आहेत.

आपला हा निसर्ग, म्हणजे रहस्यांची खाणच आहे जणू!

विज्ञानाच्या मदतीने, अनेक रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. कित्येक रहस्य सोडवण्यात यश आलेले आहे. मात्र कित्येक रहस्यं अशी आहेत, जी अजूनही आपल्याला सोडवता आलेली नाहीत. दिवसेंदिवस, आणखी नवनवीन रहस्यांचा समावेश यात होत चालला आहे.

या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही न काही वैज्ञानिक कारण असतं, त्याला विज्ञान जबाबदार असतं, असं आपण मानतो. त्यामागील विज्ञान काय हे स्पष्ट करून, वैज्ञानिक या जगात रहस्यमयी असे काही नसतं हे सिद्ध करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण, तरीदेखील या निसर्गाने अजूनही आपल्या पोटात काही रहस्यं लपवून ठेवलेली आहेत. ज्या गोष्टींमागील वैज्ञानिक कारण शोधता शोधता वैज्ञानिकांच्या नाकीनऊ आले, अशा गोष्टींना, आपण रहस्य मानतो.

 

china mysterious cliff04-marathipizza
dwnews.com

 

आज असंच एक रहस्य जाणून घेऊयात. या रहस्याबद्दल तुम्ही आजवर नक्कीच ऐकलेलं नसेल. त्यामुळेच, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल…

 

china mysterious cliff03-marathipizza
AsiaWire

 

अंडी देणारी कोंबडी, किंवा साप वगैरे सजीवांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अनेक पक्षी त्यांच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये अंडी देतात. अगदी कबुतराच्या लहानशा अंड्यापासून, ते शहामृग पक्ष्याच्या भल्याथोरल्या अंड्याविषयी आपण ऐकलेलं असतं.

मात्र, जगात असा एक दगड आहे, जो अंडी देतो, असं जर तुम्हाला सांगितलं तर?

होय, असा दगड अस्तित्वात आहे. हा दगड चीनमध्ये आढळून येतो. चीनच्या कियान्नान बुयेई मियाओ भागात एक हा खडक आहे. या खडकाने, कित्येक वैज्ञानिकांची झोप उडवली आहे.

२० मीटर लांब व ६ मीटर उंचीचा हा खडक दर ३० वर्षांनी दगडाची अंडी बाहेर टाकतो. आता तुम्ही म्हणालं काहीही काय सांगता, तर हे अगदी खरं आहे.

हा खडक बघितल्यावर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. चला तर मग जाणून घेऊ, काय आहे या खडकाच्या अंडी देण्यामागील कहाणी? आणि त्या कहाणी मागील गूढ रहस्य…

 

china-mysterious-cliff-marathipizza
AsiaWire

 

येथील स्थानिक लोक याला दैवी चमत्कार मानतात. त्यांच्या मते ही अंडी सुरवातीला एका कवचाच्या आत असतात. काही दिवसांनी ही अंडी जमिनीवर पडतात. हे खडक चीनच्या दक्षिण-पश्चिम गुझउ बुइए आणि मिआओ ऑटोनोमू या परिसरात आहेत. या खडकाला ‘Chan Dan Ya’ या नावाने ओळखलं जातं.

तसेच याला ‘egg-producing cliff’ देखील म्हणतात. दर ३० वर्षांनी, हा खडक ‘अंडं रुपी खडक’ बाहेर टाकतो.  या अंडाकृती खडकांचा व्यास साधारणपणे १२ ते २४ इंचांचा असतो.

या खडकांचं वजन, तब्बल ३०० किलो सुद्धा असू शकतं. पण, हे असं का घडतं याचा छडा लागत नसल्यामुळे, वैज्ञानिक सुद्धा हैराण आहेत. जेव्हा हे नवीन खडक बाहेर येतात, तेव्हा गावातील लोक ते आपल्या ताब्यात घेतात.

अंड्यांच्या आकाराचे हे खडक, गावकरी आपल्या घरी घेऊन जातात. ही अंडी घरी ठेवली, तर घर समृद्ध होतं, असं ते मानतात. २००५मधील आकडेवारीनुसार, या गावात जवळपास शंभर ते सव्वाशे कुटुंबांचे वास्तव्य आहे. प्रत्येक घरात, असा निदान एक तरी दगड आहे, असं म्हटलं जातं.

china mysterious cliff01-marathipizza
AsiaWire

 

वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, हा खडक ५०० दशलक्ष वर्षांपूर्वी, कैमब्रीयन पिरीयडमध्ये माउंट गैनडेंगपासून बनला आहे. हे मुख्यत्वे काळे आणि थंड खडक आहेत. हे खडक जगातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. भू-वैज्ञानिकांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. त्यांच्या मते पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे या खडकाच्या संरचना आणि त्याच्यातील तत्वांमध्ये बदल घडून आला असावा.

हेच कारण आहे की, यावर विविध आकृती दिसून येतात. पण, ‘या आकृती नेमक्या अंडाकार कशा बनतात?’ यावर अद्याप संशोधन सुरु आहे.

 

china mysterious cliff02-marathipizza
AsiaWire

 

असे ३० वर्षांतून एकदाच होणे हेदेखील आश्चर्यकारक आहे. तेथील स्थानिक लोक या खडकांना ‘गुड लक’ मानून घरी घेऊन जातात. म्हणूनच, आजपर्यंत, असे केवळ ७० खडक वाचविण्यात सरकारला यश आले आहे. इतर चोरी झालेत, आणि काही गायब झाले आहेत. असे सांगण्यात येते.

तरी देखील या खडकाच्या अंडी देण्यामागील गूढ अजूनही कायमच आहे… 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?