' “हमे माधुरी दे दो”, पाकड्या सैनिकांच्या गलिच्छ मागणीला मेजर विक्रमचं सडेतोड उत्तर – InMarathi

“हमे माधुरी दे दो”, पाकड्या सैनिकांच्या गलिच्छ मागणीला मेजर विक्रमचं सडेतोड उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलिवूडमधील देखण्या तारखांची भुरळ कुणाला पडत नाही? त्यांचं रुप, अदा, नृत्य या सगळ्याचे ‘दिवाने’ असलेले प्रेक्षक देशासह परदेशातही हमखास सापडतात.

 

bollywood actresses in saree inmarathi

 

आपली लाडकी हिरॉइन एकदा तरी आपल्याला भेटावी हे स्वप्न पाहणं काही गैर नाही, मात्र या स्वप्नाला महत्वकांक्षा बनवणं किंवा एखाद्या अभिनेत्रीकडे घाणेरड्या नजरेने पाहणं, तिची मागणी करणं ही विकृती आहे आणि भारतीय अभिनेत्रींबद्दल अशी गलिच्छ मागणी पाकिस्तानी लोकांनी केली तर?

तळपायाची आग मस्तकातं जाईल, रागाने मुठी आवळल्या जातील, तोंडात असंख्य शिव्या येतील. हो ना?

ज्या प्रसंगाची कल्पनाही करणं कठीण, अशा प्रसंगाला शहीद मेजर विक्रम बत्रा यांनी कसं तोंड दिलं असेल? युद्धाच्या प्रसंगात मृत्यू डोळ्यासमोर दिसत असतानाही जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी मराठमोळ्या अभिनेत्रीची मागणी केली तेंव्हा मेजर विक्रम यांना काय वाटलं असेल? त्यांनी हा हल्ला कसा परतवून लावला असेल? हा किस्सा वाचल्यानंतर प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानेने भरून येईल.

 

major vikram inmarathi

 

नुकत्याच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपट ‘शेरशहा’ या चित्रपटातून शहीद मेजर विक्रम बत्रा यांचा जीवनपट उलगडला. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

shershaha inmarathi

 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री कियारा अडवाणी यांची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटाचं कौतुक होत असताना दुसरीकडे याच चित्रपटातील एक सीन पाहताना भारतीयांच्या मुठी आपोआप आवळल्या जात आहेत.

मेजर विक्रम बत्रा पॉइंट ४८७५ वर आपल्या टीमसह लढत होते. समोर मृत्यू पाकिस्तानी सैनिकांच्या रुपात उभा होता. अहोरात्र सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिहल्ला करत असताना भारतीय जवानही थकत नव्हते.

हा हल्ला केवळ शस्त्रांचा नव्हता तर पाकिस्तानी सैनिक आपल्या संभाषणातूनही भारतीय जवानांना वारंवार डिवचत होते.

अशातच एका पाकिस्तानी सैनिकाने मेजर विक्रम यांच्याकडे एक विकृत मागणी केली. “तुमची माधुरी दीक्षित आम्हाला द्या, मग आम्ही लगेच सीमेवरून परत फिरू” , पाकिस्तानी सैनिकाच्या या वाक्यावर इतर सैनिकांनीही हसून माना डोलावल्या. त्यासह माधुरी दीक्षितचे आम्ही किती मोठे चाहते आहोत हे सांगत त्यांनी या सोज्वळ अभिनेत्रीवर अश्लिल टिप्पणीही सुरु केली.

आपल्या सोज्वळ रुपासह उत्तम अभिनय, नृत्य यांच्या बळावर रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवलेल्या माधुरी दीक्षित यांच्याबद्दलचे बोल ऐकणं भारतीय जवांनासाठी शिक्षा ठरत होतं.

 

madhuri dixit

 

भारतीयांचे रक्षण करणा-या मेजर विक्रम यांना भारताच्या या लेकीबद्दलचे हे बोल ऐकणं कठीण जात होतं. केवळ देशाचीच नव्हे तर देशवासियांची सुरक्षितता आणि इभ्रतीचेही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचे ते सांगत होते.

त्यांनी शांतपणे पाकिस्तानी सैनिकांची ही मागणी ऐकून घेतली, माधुरीच्या रुपाबद्दल सुरु असलेल्या चर्चाही त्यांनी शांततेने ऐकल्या आणि संयम ठेवत त्यांनी बत्रा उद्गारले, “माधुरी मॅडम तर सध्या दुस-या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे तुम्ही सध्या सीमेवर आहेत त्यांच्यावरच समाधान माना”.

 

vikram batra inmarathi
www.galatta.com

 

विक्रम बत्रा यांच्या या सडेतोड उत्तरावर पाकिस्तानी सैनिक खवळले, मात्र त्यांच्याकडून कोणताही हल्ला होण्यापुर्वीच प्रसंगावधान राखलेल्या मेजर बत्रा यांनी पाकिस्तान्यांचे सगळे बंकर उडवले.

माधुरी दीक्षितबाबत घाणेरडी मागणी करणा-या प्रत्येकाला कंठस्नान घालताना विक्रम बत्रा म्हणाले, “माधुरी दीक्षित नाही, तर त्यांची ही भेट तुमच्यापर्यंत पोहचवत आहे”.

 

vikrama inmarathi

 

२०१७ साली विक्रम यांचे बंधू विशाल यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगतला होता. आता चित्रपटाच्या माध्यमातून या घटनेला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आल्याने शहीद मेजर विक्रम बत्रा यांच्याबद्दलचा अभिमान द्विगुणित होत आहे.

सुरक्षा आणि प्रत्येक भारतीयांची इज्जत यांच्यासाठी दक्ष असलेल्या मेजर विक्रम यांचं कौतुक यानिमित्तानं केलं जात आहे.

यंदाच्या स्वातंत्र्य दिनी ‘शेरशहा’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारताचा हा विक्रमी लढा प्रत्येकाला अनुभवता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?