' सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी केले जाणारे १० प्राचीन अघोरी उपाय! – InMarathi

सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी केले जाणारे १० प्राचीन अघोरी उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“सौंदर्य” हा प्राचीन काळापासून असलेला चर्चेचा विषय आहे. अनादी काळापासून आपण “सुंदरच दिसायला हवं” ही सगळ्याच स्त्रियांची आणि पुरुषांची सुद्धा – अगदी मनापासून असलेली इच्छा असते.

मनुष्य दिखाव्याकडे पटकन वळतो, सुंदरतेचं मृगजळ किती ही लवकर विरुन जाणारं असलं तरीही त्याच्या मनाला शारीरिक सौंदर्य, सुंदर वस्तू आणि ठिकाणच भावतात. आणि ते सहजीकही आहे, कारण. सुंदरता मनाला प्रसन्न आणि प्रफुल्लित करते. सुंदर वस्तू घेतल्यावर, एखाद्या सुंदर ठिकाणी गेल्यावर आपल्याला भरपूर आनंद होतो म्हणून हेच नियम आपण माणसांवर सुद्धा लादण्याचा प्रयत्न करतो आणि नैसर्गिकरित्या मिळालेलं रूप आणि शरीर हे आपल्याला अवडेनासं होऊ लागतं.

 

tapsee pannu inmarathi
bebeautiful.in

 

मग आपण, अनेक चांगले, अघोरी, चित्र – विचित्र उपाय करू लागतो. असेच काही उपाय पर्वकाळात सुंदरता राखण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी वापरले जात. त्यांचे अक्षरशः ट्रेंड्स त्या काळात आले होते. आणि त्याच ट्रेंड्स विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला सुरु करूया –

 

१) कबुतरांच्या विष्ठेचा उपयोग –

जेरीस येथे, हिपोक्रेटिस ने कबुतरांच्या विष्ठेत जिरं, मुळा, आणि इतर काही सामग्री मिसळून एक मिश्रण तयार केले होते. हे मिश्रण केस गळती थांबवण्यासाठी व टक्कल पडू न देता, केस दाटी मिळवूनदेण्यासाठी वापरलं जायचं.

 

kabutar inmarathi
National audubon society

 

२) हानिकारक धातूंचा वापर –

इजिप्ट मधील लोक काजळाचे प्रचंड दिवाने होते. भरपूर वेळ टीकणारं काजळ तयार करण्यासाठी ते malachite (green ore of copper), galena (lead sulfide) याचा वापर करत. लीडच्या वापरामुळे ते काजळ चमकदार दिसायचं व फार काळ टिकून राहायचं. हे सगळेच घटक अत्यंत विषारी असून त्यांच्या सततच्या प्रयोगाने त्वचारोग व यापेक्षाही मोठे जीवघेणे रोग व्हायचे.

 

mach inmarathi
The crystal council

 

३) भुवया आणि अर्धे केस भादरणे –

१५-१६ व्या शतकात म्हणजेच एलिझाबेथन काळात, राणी एलिझाबेथ I हिला भुवया व दाट केस नसल्याने, तिचे कपाळ मोठे असल्याने, संपूर्ण भुवया व अर्धे केस भदारण्याची कोरून टाकण्याची जशी काही फॅशनच आली होती. त्यामुळे इतर इंग्रज स्त्रिया सुद्धा आपल्या भुवया पूर्णपणे काढून टाकत.

 

eli inmarathi
brainstudy.info

 

४) दात काळे करणे –

१८००च्या दरम्यान जपान मध्ये एक विचित्र पद्धत उदयाला आली, आपले दात काळे करून घेण्याची. त्या पद्धतीनुसार, काळे दात, हे आर्थिक संपन्नता व तारुण्याचं प्रतीक मानले जायी. त्यामुळे, सगळेच श्रीमंत लोक, तरुण पुरुष आणि विशेषतः तरुण स्त्रिया आपले दात काळे रंगवत. त्यासाठी, लोखंडापासून ती पेस्ट आणि रंग बनवले जायी. इतिहासकार असेही सांगतात की दात काळे केल्याने स्त्रियांमध्ये एक विशिष्ट अदब येत असे.

 

black teeth inmarathi
Japan info

 

५) कोर्सेट्सचा वापर –

19व्या शतकात, स्वतःला व्यवस्थित शेप मध्ये असल्याचं दाखवण्यासाठी, स्वतःची फिगर नीट ठळक पणे दिसून आली पाहिजे या साठी, इंग्रज, अमेरिकन सगळेच हे गाऊन घालत ते कोर्सेट्सचा वापर करू लागले.

सुरुवातीला हे कोर्सेट्स, सध्या कापडाचे असायचे पण नंतर मेटलचे कोर्सेट्स बनवल्या जाऊ लागले. कंबर लहान आहे हे दाखवण्याच्या नादात अनेक स्त्रिया हे मेटलचे घट्ट कोर्सेट्स घालायच्या ज्यामुळे त्यांच्या बरगडीच्या पिंजाऱ्याची हाडं मोडून पॅरॅलीसीस होणे, पाठीचा आकार कायमचा बदलणे असे जीवघेणे प्रकार घडू लागले.

 

cors inmarathi
Youtube

 

६) डोळे पाणीदार दिसण्यासाठी नाईटशेडचा वापर –

विक्टोरियन काळात इंग्लडची समाज रचना तर बिघडलीच पण अनेक विचित्र फॅशन ट्रेण्ड सुद्धा आले. त्यातीलच एक हा आहे. त्या काळातील स्त्रिया मुद्दाम “टी. बी.” होऊन अशक्त पणा आल्यावर जसा आपला अवतार होतो, तस करायला बघत. त्यांना अत्यंत नाजूक दिसायचे असायचे आणि डोळे सुद्धा मोठे आणि पाणीदार असायला हवे असायचे.

 

eyes inmarathi

 

त्यामुळे, त्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करीत व आपल्या डोळ्यात, रोज संध्याकाळी एक जीवघेणे मिश्रण घालत. ज्यामुळे सकाळी उठून त्यातून सतत पाणी गळत राही. या  मिश्रणामुळे त्यांना कायमचे अंधत्व येण्याची सुद्धा भीती होती तरीही हे प्रकार त्या स्वतःहून करायचाच.

 

७) चुन्याचा वापर –

राणी एलिझाबेथ I, हि आपल्या चेहऱ्याचा मेकअप करताना एक प्रकारचा चुना लावायची. आणि त्यावर लाल लिपस्टिक, आणि इतर मेकप केला जायचा. हा जो चुना होता, तो सतत लावल्यानेच राणी एलिझाबेथचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. कारण, हे साधा खायचा चुना नसून जास्त स्ट्रॉंग चुना होता.

 

chuna inmarathi
patrika

आपली राणीच हे वापरते म्हटल्यावर, हा एक फॅशन ट्रेंड बनला. अनेक स्त्रिया राणीसारखं दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याला चुना फासून घेत.

 

८) डिंपल मशीन –

१९३० च्या जवळपासच्या काळात, अमेरिकन आणि ब्रिटिश स्त्रिया आपल्या गालांवर खळी पडून घेण्यासाठी “डिंपल मशीन” चा वापर करत. या मशीन ने, गाल दाबले जात, आणि सतत ह्या जोरदार दाबले जाण्याने आपल्या गालावर सुंदर खळ्या पडतील असा त्या स्त्रियांचा एक गैरसमज होता. संशोधनानुसार, पुढे असे आढळून आले की या मशीनने त्वचा दाबून घेतल्याने कॅन्सर सारखा आजार होऊ शकला असता. पण, तो ट्रेंड फार काळ काही टिकला नाही.

 

dimple inmarathi 1
weird universe

 

९) सल्फयुरिक ऍसिड आणि दात –

इंग्लंड मध्ये राजा जॉर्ज असताना, तिथल्या स्त्रिया आपले दात पांढरे शुभ्र दिसावे यासाठी, दातांवर बायकार्बोनेट सोडा आणि cuttlefish चे मिश्रण तयार करून ते आपल्या दातांवर लावत. ह्याने दात तर पांढरे व्हायचे पण ते झिजायचे सुद्धा तितक्याच लवकर, याशिवाय ती पावडर तोंडात इतर कोणत्या ठिकाणी लागली की छाले सुद्धा पडायचे.

 

cu fish inmarathi
wikipedia

 

१०) वजन कमी करण्यासाठीचे उपाय –

जुन्या काळात, इंग्रज, अमेरिकन आणि आसपासच्या इतर देशांतील लोक आपलं वजन कमी करून घेण्यासाठी व रक्त आटून आपण गोरे म्हणजे पांढरे दिसण्यासाठी स्वतःवर जळू चिकटवून घ्यायचे. त्या सगळे रक्त पिऊन टाकायच्या ज्यामुळे अशक्तपणा यायचा व शरीर पांढरे पाडायचे.

याच बरोबर ते लोक आपल्या शरीरात लांब जंत कृत्रिम रित्या टाकून घ्यायचे ज्यामुळे श्रुंरात सगळे प्रोटीन आणि पौष्टिक तत्व ते किडे खाऊन टाकत आणि माणूस दुबळा होऊन त्याचे वजन कमी होत असे.

 

jalu inmarathi
bobhata

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?