' गोल्डन बॉय नीरज चोप्रामुळे चर्चेत आलेले रोड मराठा आहेत तरी कोण?

गोल्डन बॉय नीरज चोप्रामुळे चर्चेत आलेले रोड मराठा आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात तेवीस वर्षापूर्वी जन्मलेला पोरगा सगळ्या जगाला माहीत झालाय, ते त्याच्या कर्तृत्वामुळे आणि देशाला मिळवून दिलेल्या सुवर्णपदकामुळे!

नीरज चोप्राने 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला रोड रोड मराठा असल्याचा अभिमान आहे. आणि म्हणुनच सगळीकडे आता एकच चर्चा चालू आहे की नीरजचे कनेक्शन महाराष्ट्राच्या मातीशी आहे.

 

Neeraj Chopra in Army INMarathi

 

शेवटी हे महत्त्वाचं की तो एका विशिष्ट जातीचा म्हणून अभिमान बाळगण्यापेक्षा तो एक भारतीय म्हणून त्याने बजावलेल्या कामगिरीचा अभिमान बाळगावा.

पण या निमित्ताने हे जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सध्या प्रचंड चर्चेत आलेली ही रोड मराठा समाजाची कल्पना नेमकी आहे तरी काय?
चला आज जाणून घेऊया.

१७६१ मध्ये घडलेलं, पानिपतचे युद्ध म्हणजे संपूर्ण भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि महत्वाचे युद्ध युध्दाचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे हे अफगाणिस्तानच्या अब्दाली कडून पराभूत झाले या युद्धात माहितीच्याआकड्यानुसार ४० ते ५० हजार सैनिक मारले गेले असं म्हटलं जातं.

रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले.

युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे पानिपतामध्येचं राहिली.  युद्ध भूमीच्या आजूबाजूला सुरक्षित वाटेल तिकडे निघून गेले तर काही सैनिकांनी आजूबाजूच्या परिसरात काही काळासाठी आश्रय घेतला आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले.

स्थायिक लोकांपासून कसलाही धोका होऊ नये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी आपली मराठा ओळख लपवली आणि आम्ही एक राजा रोडच्या समाजाचे आहोत असे सांगायला लागले. बऱ्याच लोकांनी तेथील स्थानिकांची नावे लावायला सुरुवात केली; तिथे पानिपत सोनिपत करनाल रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड समाजाची बरीच मोठी संख्या आहे

आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.

 

road-maratha-samaj-marathipizza04

स्रोत

 

युद्धाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला.

पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले.

आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही.

अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत.

पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.

road-maratha-samaj-marathipizza01

स्रोत

 

गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या  शौर्याचा विसर पडला आहे, पण या रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे. त्यांच्या मते,

युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे.

हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो.

ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.

 

road-maratha-samaj-marathipizza02

स्रोत

 

परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे.

Rod maratha inMarathi

 

कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?