' एक विमान चक्क नेहरूंच्या लाडक्या सिगरेटचं पाकीट आणण्यासाठी पाठवलं होतं! – InMarathi

एक विमान चक्क नेहरूंच्या लाडक्या सिगरेटचं पाकीट आणण्यासाठी पाठवलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू यांच्या भोवती सुरुवातीपासूनच वलय होते. त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी, त्यांच्या खास सवयींविषयी, त्यांच्या उंची -शाही आयुष्याबद्दल कायमच लोकांना आकर्षण वाटत आले आहे.

त्यांच्या राजेशाही थाटाविषयी तर अनेक किस्से प्रचलित आहेत.त्यातले काही खरे तर काही निव्वळ अफवा आहेत.

 

nehru featured 2 inmarathi

 

पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे अलाहाबादमध्ये खूप मोठे वकील होते. त्यामुळे पंडित नेहरूंचे बालपण अगदी श्रीमंती थाटात गेले. असे म्हणतात की मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू भारतात वास्तव्यास असून देखील या दोघांचेही कपडे धुण्यासाठी लंडनला जात असत. ते बऱ्याचदा विदेशातून वस्तू मागवत असत. पंडित नेहरू स्वतःच्या दिसण्याविषयी अत्यंत जागरूक होते हे तर आपल्याला त्यांच्या प्रत्येक फोटोतून दिसूनच येते.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्त्रियांकडे मेकअप करण्यासाठी स्वदेशी साहित्य फार उपलब्ध नव्हते. केवळ श्रीमंत स्त्रियाच विदेशातून मेकअप साहित्य मागवू शकत होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी टाटा कंपनीच्या मालकांना जेआरडी टाटा ह्यांना एखादा मेकअपचा ब्रँड सुरु करण्याचा सल्ला दिला. तेव्हा टाटा ऑइल मिल्सने लॅक्मे ही कॉस्मेटिक्स कंपनी सुरु करून भारतीय स्त्रियांना मेकअपचे साहित्य उपलब्ध करून दिले.

 

nehru lakme inmarathi

 

पंडित नेहरूंचे सिगारेटप्रेम सुद्धा सगळीकडे प्रचलित आहे. त्यांचे सिगारेट ओढतानाचे अनेक फोटो आजही सापडतात. त्या काळी सिगारेट पिणे म्हणजे स्टेट्स सिम्बॉल मानले जायचे.

जे पुरुष स्टायलिश अंदाजात सिगारेट ओढतात, त्यांच्याकडे बायका आकर्षित होतात असा एक समज त्या काळी होता. म्हणूनच अभिनेते देखील आवर्जून पाईप किंवा सिगारेट किंवा सिगार ओढताना दाखवले जायचे. अर्थात हे दिसायला जरी सो कॉल्ड “कूल” दिसत असले तरीही त्यांच्या गंभीर दुष्परिणामांची लोकांना जाणीव फारशी नव्हती.

 

nehru 1 inmarathi

 

पंडित नेहरूंना देखील त्यांच्या या व्यसनावर विजय मिळवता आला नाही. त्यांच्या अतिरेकी सिगारेट प्रेमाबद्दलचा एक किस्सा ऐकून आज अनेकांना आश्चर्य वाटेल किंवा काहींना “हे म्हणजे अगदीच काहीच्या काही आहे” असे वाटेल.

पंडित नेहरू कामानिमित्त अनेक वेळा भोपाळला जात असत. असेच एकदा ते भोपाळला गेले असताना ते राज भवन येथे वास्तव्यास होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था बघणाऱ्या त्यांच्या मदतनिसांना लक्षात आले की नेहरूंच्या आवडीचा सिगारेटचा ब्रँड राज भवनमध्ये उपलब्ध नाही.

गंमत म्हणजे त्या ब्रॅण्डची सिगारेट संपूर्ण भोपाळमध्ये त्यावेळी उपलब्ध नव्हती. नेहरूंना जेवणानंतर त्यांची आवडती ‘५५५’ ब्रॅण्डची सिगारेट लागत असे. परंतु ती त्यावेळी तिथे उपलब्धच नव्हती.

 

555 inmarathi
pinterest

 

आता अशावेळी सामान्य माणूस काय करेल? एकवेळ तो तल्लफ भागवण्यासाठी दुसऱ्या ब्रॅण्डची सिगारेट ओढेल किंवा नेहमीचा ब्रँड नसेल तर सिगारेट पिणार नाही. पण नेहरूंची गोष्ट काही औरच होती. त्यांच्यासाठी त्यांची ‘५५५’ सिगारेट चक्क दुसऱ्या शहरातून विमानाने मागवण्यात आली.

मध्यप्रदेशच्या सरकारी वेबसाईटवर सांगितल्यानुसार त्यावेळी त्यांच्या मदतनिसाने नेहरूंसाठी इंदोरहून विमानाने सिगारेट मागवली. त्याने भोपाळहून इंदोरला विमान पाठवले आणि इंदोर विमानतळावर त्यांचे सिगारेटचे पाकीट तयारच ठेवण्यात आले होते.

 

flight inmarathi

हे ही वाचा – “मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा!

एका व्यक्तीला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती की ‘५५५’ सिगारेट विकत घेऊन ती इंदोर विमानतळावर पोहोचवायची. तर असे भोपाळहून विमान निघाले आणि इंदोर विमानतळावरून सिगारेटचे पाकीट घेऊन परत भोपाळला आले.

एकतर सरकारी तिजोरीत कायम दुष्काळ, आणि त्यात मंत्री आणि सरकारी अधिकारी ह्यांच्याकडून पैश्याचा असा खाजगी कामांसाठी अपव्यय असाच पिढ्यानुपिढ्या सुरु आहे आणि सामान्य माणूस फक्त “क्या बात है, मोठ्या लोकांचे शौकच निराळे” किंवा “या सगळ्यांना चपलेने झोडले पाहिजे” असे म्हणण्यापलीकडे काहीही करू शकत नाही हेच खरे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?