' मेंदू तल्लख करण्यासाठी या १० सवयी तात्काळ थांबवा, नाहीतर… – InMarathi

मेंदू तल्लख करण्यासाठी या १० सवयी तात्काळ थांबवा, नाहीतर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपलं शरीर चालतं ते मेंदूच्या कार्यक्षमतेचा जोरावर. त्या मेंदूच्या तल्लखतेच्या जोरावर आपण बऱ्याचदा वरचढ ठरतो. अगदी चव ओळखण्यापासून समोरून येणाऱ्या गाडीची काही क्षणांनंतरची जागा ओळखेपर्यंत मेंदू मदत करतो.

 

human brain inmarathi 2
donegal daily

 

आजकालच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत आपण अश्या काही गोष्टी करतो ज्याने आपल्या मेंदूला त्रास तर होतोच पण त्याची कार्यक्षमता पण कमी होते.

आपल्याकडून नकळत होणाऱ्या ह्या गोष्टी आपण टाळायला हव्यात.

 

१. सकाळचा नाश्ता टाळणे :

आपल्याकडे हा एक मोठा गैरसमज आहे की सकाळी भरपेट नाश्ता करावा, पण मुळात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे!

बाहेरच्या देशांमध्ये हा प्रकार जास्त असतो कारण ती लोकं दुपारच्या वेळेस अगदीच मोजकं खातात किंवा फक्त पेय पितात, उलट आपल्याइथे भरपेट नाश्ता करून सुद्धा लोकं दुपारी ताव मारून जेवतात!

म्हणूनच सकाळी हेवी नाश्ता करणं शक्यतो टाळावे! पण याचा अर्थ असाही होत नाही की तो पूर्णपणे बंदच करावा, त्याने सुद्धा शरीराला अपायच होतो!

सकाळी पोट अगदीच रिकामे राहू नये यासाठी थोडा नाश्ता निश्चितच करावा!

आपण सकाळी जेव्हा नाश्ता टाळतो तेव्हा आपल्या रक्तात शर्करेचे प्रमाण अगदीच कमी होते. त्यामुळे आवश्यक ते पोषक द्रव्य मेंदूपर्यंत पोहोचत नाही. ह्याने ब्रेन ह्यामरेज ची रिस्क वाढते.

 

indian breakfast inmarathi
ndtv food

२. जास्त जेवण करणे :

 

indian thali inmarathi
ng traveller

 

कोणत्याही गोष्टीची अति ही वाईटच असते, मग ते कोणतंही व्यसन असो वा अगदी आहाराचे प्रमाण सुद्धा, तो सुद्धा प्रमाणातच असावा!

आपला आहार प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपलं पोट फुगतं. पण तेवढंच नाही तर त्याने मेंदूला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्या कडक होऊन मानसिक शक्ती सुद्धा कमी करतो.

 

३. धुम्रपान करणे :

 

smoking brain inmarathi
the urban twist

 

आपण तर आजकाल जिथे तिथे या व्यसना विषयी होणारी जनजागृती बघत असतो. अगदी थिएटर मध्ये सिनेमा बघायला गेल्यावर सुद्धा अगदी त्या कॅन्सरवाल्या मुकेशची जाहिरातच लागते!

पण एवढं होऊन सुद्धा लोकं धूम्रपान करायचे कमी करतायत का तर नाही, दिवसेंदिवस हे प्रमाण आणखीनच वाढत चालले आहे! सध्या तर या सवयी अगदी शाळकरी मुलांना सुद्धा लागल्या आहेत!

आजच्या पिढीच्या फॅशनचा भाग असणाऱ्या आणि ‘cool असण्याचं लक्षण’ समजल्या जाणाऱ्या ह्या धुरकांड्या मेंदूपर्यंत नुकसान करतात.

मेंदूच्या बाह्यपटलाचा संबंध सरळ भाषा, स्मरणशक्ती, समज ह्या गोष्टींशी असतो.

धुम्रपान ह्या बाह्यपटलाची जाडी कमी करते आणि ह्याने “Multiple brain shrinkage” चा धोका पण वाढतो.

 

 

smoking inmarathi
AAO.org

 

४. साखरेचे अतिसेवन करणे :

 

sugar inmarathi
the conversation

 

मगाशी आपण पाहिलंच की कोणत्याही गोष्टीची अति ही धोक्याकडेच तुम्हाला नेते, आणि त्यातून साखरेचे अतिसेवन म्हणजे एक प्रकार जीवाला धोक्यात घालण्यासारखेच!

साखरेमुळे डायबीटीस होतो हे आपल्याला माहीत आहेच, पण साखर तुमच्या मेंदूवर सुद्धा परिणाम करते!

साखर जास्त खाल्ल्यामुळे मेंदूपर्यंत बाकीचे पोषक द्रव्य पोहोचत नाहीत किंवा कमी पोहोचतात. त्याने मेंदूच्या विकासाची प्रक्रिया disturb होते आणि पुढे अल्झायमर्स ची रिस्क निर्माण होते.

 

५. हवा प्रदुषण :

 

air-pollution-740x410

 

सध्या चांगली हवा, निरोगी हवा मिळतिये तरी कुठे, त्यातून कोरोना सारख्या विषाणूने साऱ्या जगाला विळखा घातला आहे! दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या प्रदूषणाच्या पातळीमुळेच ह्या निसर्गाचा ऱ्हास होतोय!

मेंदूचा मुख्य खुराक म्हणजे Oxygen. वातावरणाच्या प्रदूषणामुळे कमी Oxygen मेंदूपर्यंत पोहोचतो आणि सरळ मेंदूच्या कार्यक्षमतेला एकदम कमी करतो.

 

६. झोप कमी होणे :

 

indian guy yawn inmarathi
istock

 

जास्त काम करण्याच्या धडपडीत आपण झोपेला गृहीत धरतो. पण झोपेत आपलं शरीर दिवसभरात तयार झालेल्या अपायकारक गोष्टींना संपवण्यात व्यस्त असतं.

अपुरं झोपल्याने, आपण नेमकं त्यात अडथळे निर्माण करतो. ज्याने अपायकारक द्रव्याचा निचरा होण्याची प्रोसेस थांबून टॉक्सिक वेस्ट (विषारी कचरा!) तसाच रहातो. ह्या टॉक्सिक वेस्ट मुळे ब्रेन सेल्स मरतात.

 

७. डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे :

 

sleep inmarathi
Getty Images

 

आपल्यातील अनेकांना ही सवय आहे. ह्या सवयी मागची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. पण नुकसान मात्र सर्वांचं एकसारखंच होतं!

झोपतांना जेव्हा आपण डोक्यावरून पांघरून घेतो तेव्हा श्वासावाटे, Oxygen कमी आणि कार्बन डाय ऑक्साईड, जास्त घेतो. त्याने मेंदूचं मुख्य खाद्य – Oxygen पुरेसं पोहोचत नाही.

 

८. आजारपणाकडे दुर्लक्ष करणे :

 

symptoms-inmarathi
sicklecellanemiaawareness.weebly.com

 

बऱ्याचशा लोकांना सवय असते, की आपल्याला काहीच होत नाही आपण अगदी फिट आहोत यामुळेच अशी लोकं छोट्या छोट्या आजाराकडे दुर्लक्ष करतात!

पण नंतर हीच गोष्ट त्यांना खूप महागात पडू शकते!

बऱ्याचदा आपण आपलं आजारपण “काही नाही होत” म्हणून अंगावर काढतो. त्याने आपण खरं तर वेळेवर कामाची efficiency वाढवत असतो पण आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर अपायकारक परिणाम करत असतो.

 

९. विचारांची कमतरता :

विचार करणे हे मेंदूचं खरं काम आहे. जोवर त्याला हे काम मिळतंय तोवर तो fit and fine आहे. पण जेव्हा त्याला नवनवीन कल्पना, विचार येणं, करणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते.

 

म्हणून – वाचन, मनन, काव्य-शस्त्र-विनोद ह्यावर थोडा वेळ द्यायलाच हवा.

 

Reading Habit Inmarathi

 

१०. कमी बोलणे :

 

Less talkative InMarathi

 

आजकाल समोरच्यावर आपली authority गाजवायची असल्यास कमी बोला पण मोजकं बोला असं सांगितलं जातं. पण जेवढं जास्त बोलाल, वाद-प्रतिवाद, चर्चा कराल तेवढा मेंदू तल्लख आणि वेगवान होतो.

अर्थात, ह्याचा अर्थ वायफळ बडबड करा असा नसून – आवश्यक तेव्हा, आपलं म्हणणं योग्य शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो ह्या अश्या काही गोष्टी आहेत ज्या तश्या छोट्या आहेत पण त्यांचा मेंदूरवर होणार परिणाम फार मोठा असतो.

विचार करा आणि ठरवा ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपण करतोय आणि सहज टाळू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?