' फक्त ही परदेशी गाणी नाही तर इज्राईलचं राष्ट्रगीत सुद्धा अनु मलिकने चोरलय!! वाचा

फक्त ही परदेशी गाणी नाही तर इज्राईलचं राष्ट्रगीत सुद्धा अनु मलिकने चोरलय!! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नव्वदच्या दशकातील अनेक संगीतकारांवर धून चोरीचा आरोप होत असे. यात अनु मलिकचं नाव यादीत वरच्या स्थानावर असे. अलिकडे पार पडलेल्या टोकियो ऑलम्पिकमधे इस्त्रायलच्या स्पर्धकानं पदक जिंकलं आणि अनु मलिकची जुनी चोरी नव्यानं पकडली गेली. या चोरीमुळे अनु मलिक सोशल मिडियावर भरपूर ट्रोलही झाले.

 

anu inmarathi
Webduniya

 

नव्वदच्या दशकातील हिट संगीतकारात ज्यांची गणना केली जाते त्या अनु मलिक यांच्यावर धून चोरीचा अरोप काही नवा नाही. वेळोवेळी पुराव्यानिशी हे सिध्दही झालेलं आह की त्यांनी परदेशी गाण्यांच्या धूनवर हिंदी गाणी रचली आहेत. त्यांची अनेक लोकप्रिय गाणी ही मूळची त्यांनी बांधलेली चाल नसून परदेशी गाण्यांचे उचललेले तुकडे आहेत.

नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षितचं गाजलेलं मोरा पिया घर आया ओ रामजी हे गाणं मूळ नुसरत फ़तेह अली खान यांच्या गाण्यावरून उचलण्यात आलेलं आहे.

 

 

नुसरतजींची ही कव्वाली ऐकली, याचा अंदाज नक्कीच येऊ शकतो…

 

 

बाजीगर या चित्रपटातील ये काली काली आंखे गाणं आधी बघा

     

 

हे आहे त्याच मूळ गाणं मोरी कांते  यावरून अंदाज येईलच

 

 

आमिरचा अकेले हम अकेले तुम आठवतोय ना? त्यातले हे गाणं एक  दिल मेरा चुराया क्यों,

 

 

आता या गाण्याची मूळ आवृत्ती एका इंग्लिश अल्बममधून घेण्यात आली आहे बघ कशी ते

 

 

याच चित्रपटतील आणखीन एक सुपरहिट गाणं म्हणजे राजा को रानी से प्यार हो गया,

 

 

गॉडफादर सिनेमा सगळ्यांनीच बघितला असेल त्यातली थीम पुन्हा एकदा ऐका..

 

 

मल्लिक्का शेरवत आणि इम्रान हाश्मीचा मर्डर हा सिनेमा बोल्ड सीन्समुळे चर्चेत होता तसेच त्यातल्या गाण्यांमुळे सुद्धा तो लक्षात राहिला त्यातले एक गाणे भिगे होठ तेरे

 

 

आता एक पंजाबी भाषेतील हे मूळ गाणं ऐका

 

 

अर्थात परदेशी गाणी चोरणं वेगळं आणि थेट राष्ट्रगीत उचलणं वेगळं. अनु मलिक यांच्या य धाडसाला खरंतर दाद द्यायला हवी आहे. विनोदी मीम्सचा मारा करत मायक्रोब्लॉगींग साईटवर ही दाद देण्यातही आली.

टोकियो ऑलंपिकमधे इस्त्रायलनं पहिलं सुवर्ण पदक पटकवलं आणि रितीनुसार देशाचं राष्ट्रगीत- हतिकवाह- त्याला पुरस्कार प्रदान करताना वाजविण्यात आलं. हे राष्ट्रगीत ऐकलं मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ही चाल परिचित होती.

 

 

इस्त्रायलच्या राष्टगीताची चाल चक्क नव्वदच्या दशकात आलेल्या अजय देवगण अभिनीत दिलजले चित्रपटातील एका गाण्याला आहे असं अनेकांच्या लक्षात आलं आणि अनु मलिकला ट्रोल करणार्‍या ट्विटचा महापूर आला. दिलजलेतील मेरा मुल्क मेरा देश या कुमार सानू आणि उदित नारायण यांनी गायलेल्या गीताची चाल इस्त्रायलच्या राष्ट्रगीताची आहे.

 

 

अर्थात धून चोरी आणि अनु मलिक यांचं नातं जुनं आहे. आजवर असंख्य वेळेस अनु मलिक यांच्यावर पुराव्यानिशी आरोप झालेले आहेत मात्र ते नेहमीच या वादातून बाहेर पडतात आणि पुन्हा एकद एखादी परदेशी धून चोरून त्यावर सुपरहिट हिंदी गाणं बनवितात.

हे गाणं मग ट्रकपासून लग्नांपर्यंत सर्वत्र वाजत रहातं. अनु मलिक ट्रोल होतच रहातात, धून चोरी करतच रहातात आणि लोक त्यांची गाणी डोक्यावरही घेत रहातात. हा सिलसिला असाच अखंड चालू आहे आणि बहुदा तो संपणारही नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?