' मराठी वेब सिरीजची नवी नीच पातळी? दोन पुरुषांबरोबर एक स्त्री...!

मराठी वेब सिरीजची नवी नीच पातळी? दोन पुरुषांबरोबर एक स्त्री…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

‘थ्री-सम’ हा शब्द जरी कानावर पडला, तरी नको नको त्याच गोष्टी आधी मनात याव्या ही अगदीच सामान्य बाब! याला मन दूषित असणं म्हणा किंवा इतर काहीही, पण थ्री-सम म्हटलं की पॉर्नच किंवा सॉफ्ट पॉर्नच डोळ्यासमोर येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ.

 

porn 3 inmarathi

 

याबद्दल आत्ता बोलण्याचं कारण असं, की प्लॅनेट मराठी या नव्या कोऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३१ ऑगस्टपासून एक नवी कोरी वेब सिरीज येऊ घातली आहे. सगळ्याच मालिका किंवा वेब सिरीज त्यांच्या नावाला जागल्या, असं कधीही घडत नाही; ही वेब सिरीज मात्र ‘नावाला चांगलीच जागणार’ (!) आहे…

‘सोप्पं नसतं काही’ या नावासह आपल्या भेटीला येणाऱ्या या वेबसीरिजचा प्रोमो पाहिल्यावरच, हे खरंच सोपं नाहीये असं म्हणायची वेळ आली आहे. या वेबसिरीजची नायिका, मृण्मयी देशपांडे हिच्या तोंडी एक संवाद आहे, “एकाची निवड करणं शक्य नाहीये, माझं दोघांवरही प्रेम आहे, आपण एकत्र राहूया.”

 

sopp nasat kahi cast inmarathi

 

आता हा संवाद ऐकून भल्याभल्यांना घाम फुटला नसेल, तरच नवल! ही असली थेरं अजून तरी मराठीत आली नव्हती, असं म्हणणारेही अनेक असतील.

बरं यात अगदीच चूक आहे असंही काही नाही. ‘आणि काय हवं?’ सारखी छान आणि हलकीफुलकी वेब सिरीज देणाऱ्या MX प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मला सुद्धा ‘समांतर’सारख्या कलाकृतीमध्ये किसिंग सिन टाकायची इच्छा झालीच. एवढंच नाही, तर दुसऱ्या भागात पुरेशा इंटिमेट सिनचा भडीमार केला गेला, तो वेगळाच!

समांतरच्या दुसऱ्या भागात तसल्या सिनमध्ये सई ताम्हणकर मॅडम दिसल्या. इथे संधी मिळत नव्हती, तेव्हा हंटर या हिंदी सिनेमात सई दिसली होती. मराठी मंडळींनी अगदी ‘आवडीने’ तो सिन पहिलाच असेल. आता हळूहळू हाच पायंडा ‘मराठी ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर पडू लागला, तर अल्ट बालाजी, उल्लू अशा हिंदी ओटीटीकडे वळावं लागणार नाही(!)च…

 

ott platforms softporn inmarathi

===

हे ही वाचा – प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे! श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त

===

‘सोप्पं नसतं काही’ असं म्हणत, ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या दिसणारे शशांक केतकर, मृण्मयी देशपांडे आणि, अभिजित खांडकेकर हे तिघे जण प्लॅनेट मराठीवर अवतरणार आहेत.

चांगले कलाकार, ‘दोन पुरुषांबद्दल वाटणारं आकर्षण’ असा चांगला विषय अशा चांगल्या गोष्टी घेऊन सुद्धा जर, या अशाप्रकारच्या संवादाच्या आणि तसल्या सिन्सच्या कुबड्या तुम्हाला घ्याव्याशा वाटत असतील, तर त्याला नेमकं म्हणायचं काय? तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता, की थिल्लर चाळे दाखवून प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न…

एक नवरा आणि दुसरा प्रियकर, या दोघांसोबतचं नातं जपण्याचा प्रयत्न करणारी तरुणी असाच काहीसा या वेब सिरीजचा रोख असावा असं या प्रोमोमधून स्पष्ट दिसतंय. विषय खरंच चांगला आहे असं नक्कीच म्हणता येईल. पण तरीही आपली पातळी आणि दर्जा सोडून खालीच घसरत जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं काय करावं ते मात्र कळत नाही.

 

sopp nasat kahi inmarathi

 

नव्याने या व्यवसायात उतरू पाहणाऱ्या प्लॅनेट मराठीकडून अपेक्षा नक्कीच होत्या, पण त्यांनीही सुरुवातीलाच ही अशी स्टेप का घ्यावी असा प्रश्न आता पडलाय. इंटिमेट सिन्स असावेत असा अट्टाहास केला नसता, तर ही कलाकृती मनाला अधिक भावली असती असं प्रोमो बघून तरी वाटतंय.

 

sopp nasat kahi inmarathi

 

‘लिव्ह इन’सारख्या संकल्पनेकडेही अजूनही विचित्र नजरेने पाहणारा आपला समाज, लग्न आणि लिव्ह इन या दोन्हीचा मिलाफ असलेल्या या वेब सिरीजकडे कितपत वळेल, हे येणारा काळ ठरवेलच.

कदाचित, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात आलेला हा नवा फंडा त्यांना भरपूर प्रेक्षकसंख्या मिळवून देईलही; पण अत्रे, पुलं, वपु वगैरे दर्जेदार लेखक ज्या मराठीने दिले त्या मराठीला या अशा कुबड्या यापुढे कायमच वापराव्या लागणार असतील, तर मात्र कठीण आहे. असो… 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?