' या टॉपलेस फोटोशूटमुळे डब्यात गेलेलं फिल्मी मॅगझीन लोकांनी ब्लॅकमध्ये विकत घेतलं! – InMarathi

या टॉपलेस फोटोशूटमुळे डब्यात गेलेलं फिल्मी मॅगझीन लोकांनी ब्लॅकमध्ये विकत घेतलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नव्वदचं दशक, अजूनही मध्यमवर्गीय संस्कार असणारं आणि मराठी कुटुंबं, त्यांचे संस्कार, मर्यादा यांचं भान असणारा हा काळ होता आणि याच काळात आजवर हिंदी विशेषत: पंजाबी आणि दाक्षिणात्य नावं ऐकण्याची सवय असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी नावांनी आपली ओळख बनवायला सुरवात केली होती.

बोल्ड ॲण्ड ब्युटीफूल मराठी मुली हिंदीतल्या ग्लॅमरमधे नाव कमावत होत्या. त्यापूर्वी ऐंशीचं दशक संपता संपता किमी काटकर या मराठी नावानं खळबळ माजवली होतीच. मात्र या सगळ्या पलटणीत एक नाव रातोरात चर्चेत आलं आणि ते नाव होतं, अस्सल मराठमोळं, ममता कुलकर्णी.

 

mamta kulkarni inmarathi

हे ही वाचा सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

ममतानं दाक्षिणात्य चित्रपटांतून नाव कमावलं होतं इतकं की चक्क तिकडे तिच्या नावाचं मंदिर उभं करण्यात आलं होतं. मात्र तिचा हिंदीत म्हणावा तसा जम बसला नव्हता. द ग्रेट राजकुमार याच्या तिरंगामधून तिचं हिंदी चित्रपटात पदार्पण झालं. या चित्रपटात तिची अगदीच छोटी भूमिका होती मात्र तिची दखल नक्कीच घेतली गेली होती.

त्यानंतर १९९३ साली प्रदर्शित झालेल्या आशिक आवारानं सुपरहिट होत ममताला तिचा पहिला तिकिट खिडकीवरचा हिट दिला.

ममता कुलकर्णी हे नाव हिंदी इंडस्ट्रीला अगदीच नवीन होतं. तिला इथे फारसं कोणी ओळखतही नव्हतं. स्टारडस्ट हे सिनेमाविषयीचं मासिक चांगलंच लोकप्रिय होतं. चित्रीकरणादरम्यानचे किस्से, गॉसिप यांची माहिती देणारं, सिनेमा या विषयाला वाहिलेलं ते भारतातलं लोकप्रिय सिनेनियतकालिक होतं.

 

stardust inmarathi

 

स्टारडस्ट त्यांच्या कव्हरसाठी अशा चेहर्‍याचा शोधात होतं जो चेहरा फारसा परिचित नसेल. त्यांनी अनेक नवोदित नायिकांशी संपर्क साधला मात्र सगळ्याजणींनी नकार दिला. याचं कारण होतं, स्टारडस्टला हे कव्हर ’टॉपलेस’ शूट करायचं होतं.

लक्षात घ्या, नव्वदच्या दशकातला तो काळ होता. लोक अजूनही स्विमसूट, टुपिस बिकीनिला आणि पडद्यावरच्या थेट चुंबनदृष्याला सरावलेले नव्हते. असं असताना एखाद्या अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो छापणं खळबळ माजवणारं होतंच.

स्टारडस्ट हे नेहमीच आधुनिक आणि प्रगत असं मासिक होतं. मासिकांची कव्हर काय आहेत यावरून ते कसं विकलं जाईल याची गणितं असत. प्रसिध्द छायाचित्रकार जयेश सेठ हा तेव्हा स्टारडस्टसाठी काम करत असे.

काहीतरी धमाकेदार असं कव्हर करण्याविषयी चर्चा चालली असतानाच वस्त्रविरहीत मादक शरीर मात्र निरागस चेहरा असणारी अभिनेत्री कव्हरसाठी घेण्याची कल्पना पुढे आली.

 

madhuri and juhi inmarathi

 

त्याकाळच्या आघाडीच्या माधुरी, जुही अशा या वर्णनात अचूक बसणार्‍या नायिकांना विचारण्यात आलं आणि अर्थात या दोघींनीच नाही तर अनेक बोल्ड नायिकांनी याला नकार दिल्यावर ममताकडे याची ऑफर आली.

ममता स्टारडस्टला हव्या असणार्‍या वर्णनात अचूक बसत होती आणि तिनंही स्टारडस्ट हे नाव ऐकूनच मागचा पुढचा विचार न करता होकार दिला. या होकाराचं कारण असं होतं की जेव्हा तिच्याशी संपर्क साधला तेव्हा तिला याची कल्पनाच देण्यात आली नव्हती.

मात्र जेव्हा तिला कळलं की तिला हे शूट टॉपलेस करायचं आहे तेव्हा ती दचकलीच. नक्की कव्हरवर ह फोटो छापला जाणार आहे का हे तिनं विश्वास न वाटून विचारलं. कारण बोल्ड असली तरीही हे असं शूट प्रथमच होणार होतं, तिचं करियर धोक्यात येण्याची शक्यता होती.

 

mamta 2 inmarathi

 

मात्र जर हे पब्लिकमधे क्लिक झालं, तर करियर विमानाची गती घेऊ शकणार होतं. तिला फोटो कसा असेल, कसा छापण्यात येईल याची पूर्ण कल्पना देण्यात आली. जरी फोटो टॉपलेस असणार असला तरीही तिचे खाजगी अवयव दिसणार नव्हते.

तिने विचार करायल वेळ मागितला. थोडावेळ विचार करून अखेर ती या फोटोशूटसाठी तयार झाली. मात्र तिनं दोन अटी घातल्या, एक म्हणजे फक्त एकदाच हे फोटो प्रसिध्द होतील आणि दुसरी अट म्हणजे शूट केलेल्या फोटोतील केवळ दोन तीन फोटोच छापले जातील.

मासिक आणि ममता यांचं एकमत झाल्यानंतर रितसर लिखित करार झाल्यानंतरच ती शूटसाठी उभी राहिली. मग मात्र एकदम प्रोफेशनल बनत तिनं कॅमेर्‍यासमोर तिनं अगदी बिनधास्तपणे एकाहून एक बोल्ड पोझेस दिल्या. सर्व फोटोपैंकी सर्वानुमते जो फोटो निवडला गेला तो कव्हरवर आला.

 

mamta kulkarni 2 inmarathi

 

मासिक बाजारात आलं आणि त्यानं अपेक्षित खळबळ माजवली. अक्षरश: रातोरात हे मासिक विकलं जाऊन आऊट ऑफ स्टॉक झालं. लोकांत प्रचंड चर्चा झाली आणि अक्षरश: ब्लॅकमधे हे मासिक विकलं जाऊन लागलं. वीस रूपयांचं मासिक लोक शंभर रुपये मोजुनही घ्यायला तयार होत होते.

नव्वदच्या दशकातले शंभर, तेव्हा सिनेमाचं ब्लॅकचं अगदी बाल्कनीतलं तिकीटही पन्नास रूपये म्हणजे डोक्यावरून पाणी असे. एखाद्या चित्रपटाला मिळावं तसं ब्लॉकबस्टर यश तिच्या कव्हरला मिळालं होतं.

प्रत्येकच्या तोंडी हे नाव झालं आणि ममता लाखो दिलो की धडकन बनली. ममताचं हे छप्परफाड यश बघून अनेक नायिकांनी नंतर अशी अर्धनग्न शूट केली मात्र इतिहास बनतो तो एकदाच बनतो नंतर त्याच्या आवृत्त्या येतात.

ममता कुलकर्णीनं घेतलेली रिस्क तिला करियरच्या शिखरावर घेऊन जाणारी ठरली. तिच्याकडे सिनेमांच्या ऑफर्सची रांग लागली. मात्र हे इतकं सोपंही नव्हतं. कारण हे कव्हर आक्षेपार्ह असल्याचं सांगत तिच्यावर खटला भरण्यात आला. तिच्या विरोधात विविध महिला संघटनांचे मोर्चे निघाले.

 

mamta 3 inmarathi

 

ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त आयुष्यावर बिलाल सिद्दकी यांनी “द स्टारडस्ट अफेअर” नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकाचे हक्क निर्माता निखिल द्विवेदीनी घेतले असून अद्याप अधिकृतरित्या काही बातमी आली नसली, तरीही लवकरच यावर एखाद्या चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता आहे. कव्हरगर्ल ते गुन्हेगारीतली गॉडमदर असा प्रवास असणार्‍या ममताचं आयुष्य फिल्मी चढउतारांनी भरलेलं आहे.

===

हे ही वाचा ‘सॉफ्टपॉर्न’च्या जाळ्यात अडकलेले OTT प्लॅटफॉर्म आणि सेन्सॉरची कात्री, वाचा परखड मत

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?