' पहाटे उठण्याचे हे ६ फायदे वाचाल तर आयुष्य बदलेल, मित्रांना देखील सांगा

पहाटे उठण्याचे हे ६ फायदे वाचाल तर आयुष्य बदलेल, मित्रांना देखील सांगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सांगायची, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे!” आणि ते अक्षरशः खरं आहे.

हेल एलरॉड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा खूप मोठा तोटा झाला, अब्जोपती एलरॉड कर्जबाजारी झाला.

 

sleep inmarathi

 

पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका जवळच्या, यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“ तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या चमत्कारिक सल्ल्याने एलरॉड निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस तो निराशेच्या गर्त्यात अडकत चालला होता. मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली. आणि एलरॉड सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

 

hell inmarathi

 

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का? इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

“S-A-V-E-R-S” हे ६ अल्फाबेट्स म्हणजे आयुष्य बदलुन टाकणार्‍या ६ सवयी आहेत.

चला आज त्या जाणून घेऊया. जर तुम्हाला यात काही तथ्य वाटलं, तुम्हाला त्या आवडल्या तर मात्र पुन्हा-पुन्हा वाचा! एवढेच नव्हे तर तुमच्या जवळच्या सर्व व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना सांगा.

त्या तुम्ही सांगितल्या तर त्या तुमच्या मनावर अधिकच ठसत जातील आणि शेवटी फायदा तुम्हालाच होईल.

चला तर मग सुरुवात करुया.

१) Silence (ध्यान)

शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान; स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान! मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान; मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

 

meditation inmarathi
kairalicenters.com

 

माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान.

अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान!

२) Affirmations (सकरात्मक स्वयंसूचना)

अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद! स्वतः स्वतःला सुचना देणं, प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं. येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना.

स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि सत्यातही उतरतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट,  कल्पनेतून सत्यात उतरतो, खराच होतो.

 

alia happy inmarathi

 

 

आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरेया सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे. एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे? वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या…’!

३) Visualize (चांगल्या कल्पना मनात घोळवणे)

एखादी महत्वाची, तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन! कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.

 

mind-marathipizza01

 

कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं. दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो. ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.

नोबेल पारितोषिक विजेते मायकेल स्मिथ म्हणतात, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो. प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”

४) Exercise (व्यायाम)

शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम! शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!

व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.

stretching exercise inmarathi

 

वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा. शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) Reading (वाचन)

वाचाल तर वाचाल ही म्हण आपण अगदी लहान असल्यापासून ऐकत आलो आहोत. आज धावत्या युगात वाचण्यासाठी वेळ मिळतच नाही अशी अनेकांची तक्रार असते. किंडल सारख्या गोष्टी आज उपलब्ध असल्याने तुम्ही कुठेही असाल तरी वाचू शकता. वाचनाने आपण आणखीन प्रगल्भ होत असतो.

पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात. पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात. वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

 

girl reading

 

६) Scribing (लिखाण / लिहिणे)

एका अत्यंत यशस्वी माणसाने लिहून ठेवलय, “माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.”

 

writing inmarathi

 

 

अनेकांना आजही दैनंदिनी लिहण्याची सवय असते. आज अनेक तणावग्रस्त लोकांना मनातल्या भावना कागदावर उतरवायला सांगतात. असे केल्यामुळे  तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते. लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो. लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.  म्हणून संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

आज अनेक नवनवी क्षेत्र उदयास येत आहेत. असं म्हणतात की सर्जनशील कामं ही रात्री फार उत्तमरीत्या केली जातात. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांची सकाळ ही झोपण्यात जाते. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मंडळीच देखील गणित वेगळंच असत. ही लोकं जरी अपवाद असली तरी सुद्धा आपण निसर्गाच्या चक्रानुसारच चालेले पाहिजे.

सर्जनशील लोकांनी सुद्धा इतर माणसांसारखे दिवसा लवकर उठून जर आपली काम केली तरी नक्कीच ती उत्तमरित्या त्यांच्याकडून घडतील आणि त्यांचे स्वास्थ्य देखील सुधारेल.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?